नाशिकराव तिरपुडे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

नाशिकराव तिरपुडे (जन्म - १६ जाने १९२१, मृत्यू १९ मे २००२) हे एक भारतीय राजकारणी असून वसंत dada patil यांच्या मंत्रिमंडळात ते महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री होते.[१]

ते काँग्रेस पक्षाचे होते. जानेवारी १९७८ मध्ये जेव्हा इंदिरा गांधींनी पक्षात मतभेद निर्माण केले तेव्हा त्यांनी इंदिरा गांधींना पाठिंबा दर्शविला. पुढील महिन्याच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस (इंदिरा) ने चांगले कामगिरी करून काँग्रेस (मुख्य गट) यांच्या संयुक्त विद्यमाने सरकार स्थापन केल्यानंतर ते नव्या युतीत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले.[२][३][४][५]

त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२१ रोजी गणेशपूर येथे एका दलित कुटुंबात झाला होता. ते आंबेडकरी बौद्ध होते.[२][३][४][५]

१९८६ मध्ये त्यांनी स्वतंत्र विदर्भाची मागणी केली आणि विदर्भ आंदोलन सुरू केले.त्यांनी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती साठी केलेल्या प्रयत्नाचा भाग म्हणून नसिकरव तिरपुडे यांच्या चिरंजीव श्री राजकुमार तिरपुडे यांनी विदर्भ माझा पक्ष स्थापन केला. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती साठी स्व. नासिकरव तिरपुडे यांचा स्मृतिदिन विदर्भ संकल्प दिवस म्हणून पाळला जातो.[३][४][५] १९९५ मध्ये अखिल भारतीय इंदिरा काँग्रेस (आता विलीन) स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. ते कार्यकारी समिती केंद्रीय संसदीय मंडळाचे सदस्य आणि महाराष्ट्र प्रदेश इंदिरा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते.[३][४][५]

१९ मे २००२ रोजी त्यांचे निधन झाले.[३][४][५]

संदर्भ[संपादन]

  1. ^ Jaffrolet, Christophe (2002). Rise of the Plebeians?: The Changing Face of the Indian Legislative Assemblies. ISBN 9781136516610.
  2. ^ a b "OPINION | How Farmer Suicides Turned Maharashtra Into a Battleground For Caste Politics". News18. 9 जाने, 2018. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  3. ^ a b c d e Ananth, Venkat (28 ऑक्टो, 2014). "A brief history of Maharashtra's chief ministers". mint. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  4. ^ a b c d e "About Us – Tirpude Group Of Institutions".
  5. ^ a b c d e "महाराष्ट्रातल्या उपमुख्यमंत्रिपदाचा विचित्र योगायोग; इतिहास काय सांगतो? | eSakal". www.esakal.com. Archived from the original on 2020-12-05. 2021-02-27 रोजी पाहिले.