माणिकराव ठाकरे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माणिकराव ठाकरे (जन्म २२ ऑगस्ट १९५४)[१] महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे वर्तमान प्रदेशाध्यक्ष (२१ ऑगस्ट २००८ ते वर्तमान), महाराष्ट्रातील राजकारणी महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे वर्तमान सदस्य[२][३][४], माजी गृह राज्य मंत्री (१९९२-१९९५ आणि १९९९-२००३) [५], माजी उर्जाराज्यमंत्री (२००३-२००४)[६] विधान सभेचे माजी सदस्य.

जनजागरण विकास यात्रा[संपादन]

१९ नोव्हेंबर २००८ -१५ जानेवारी २००९ (चाळीस दिवस) शिर्डी येथून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने जनजागरण विकास यात्रा गावागावांत मंत्री नेण्याचा उपक्रम आरंभली.[७][८][९]

ग्राम ते सेवाग्राम झेंडा मार्च अभियान आणि अर्थिक नियोजना बाबत विवाद[संपादन]

काँग्रेस स्थापनेच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त, झेंडा मार्च दलात सात हजार कार्यकर्त्यांच्या सहाय्य्याने महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकवणे ,ग्रामस्वच्छता, कचरा व्यवस्थापन, प्रभात फेरी, चौकसभा असे विविध कार्यक्रम, आणि ग्रामसमृद्धीचा संदेश देणारी अभियानाची अंतिम समारोप सभा १५ ऑक्टोबर रोजी वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथील "बापू कुटी'शेजारील परिसरात "झेंडा मार्च अभियाना'चा समारोप; या वेळी 5 ते 10 लाख कार्यकर्ते हजर करण्याचा मानस असे या कार्यक्रमाचे प्रस्तावित स्वरूप होते.[१०].समारोप कार्यक्रमास कार्यक्रमास काँग्रेस कार्यकर्यांना उपस्थित रहाता यावे यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस तसेच ठाणे येथून विशेष रेल्वेची[११] व्यवस्थेचे नियोजीत केली गेली.

या अभियानाच्या निमित्ताने आयोजित माणिकराव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेत माध्यमांनी प्रसारीत केलेल्या त्यांच्या तथाकथित वक्तव्यांमूळे अभियान कार्यक्रमावर होणाऱ्या खर्चाचे औचित्य आणि निधी संकलनाची पद्धतीची साधन शुचिता यात काँग्रेस पक्षाची महात्मा गांधींना अभिप्रेत आणि प्रत्यक्ष संस्कृतीतील तफावत तसेच सत्तेतील काँग्रेसचे मुख्यमंत्री व मंत्र्यांच्या सहभागाबद्दल काही मराठी माध्यमांकडून प्रश्नचिन्ह उपस्थीत केलेगेले [१२].[१३][१४][१५]

शेतकरी सहकारी सूतगिरणी,बोरी अरब[संपादन]

मौजे बोरी अरब, तालुका दारव्हा जिल्हा यवतमाळ येथील शेतकऱ्यांकडून ८७ लाख ३५ हजार भागभांडवल जमा करून सरकारकडून ८ कोटी ८६ लाख रुपये भागभांडवल घेऊन कार्यान्वित होऊ न शकलेल्या शेतकरी सहकारी सूतगिरणीचे(स्थापना:१९९१) माणिकराव ठाकरे संस्थापक अध्यक्षसुद्धा आहेत. स्थानिक शिवसेना नेते संजय राठोड गटाशी तडजोड ( जूलै २००९ ?/२०१०? सुयोग्य वर्ष ठेवा अयोग्य वर्ष वगळावे) करून माणिकराव ठाकरे यांनी बिनविरोधपणे सूतगिरणीचे अध्यक्ष पद टिकवले [१६][१७][१८] .

हेसुद्धा पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. Manikrao Thakre. (2010, October 15). In Wikipedia, The Free Encyclopedia. Retrieved 07:59, October 15, 2010, from http://en.wikipedia.org/w/index.php?title=Manikrao_Thakre&oldid=390831145
 2. Google's cache of http://63.254.226.34/A55ADC/aikya/aikyasite.nsf/16a1cd28b1b42ed665256f8d003985fc/2c323e3728c602eb652a706a004f7891!OpenDocument. It is a snapshot of the page as it appeared on 19 Sep 2010 09:18:24 GMT.
 3. Manikrao Thakare is Maharashtra PCC chief. The Hindu (August 18, 2008). 2009-09-26 रोजी पाहिले.
 4. Manikrao Thakare. Maharashtra Pradesh Congress Committee. 2010, 19 January रोजी पाहिले.
 5. "State Ministers get portfolios, six axed". Indian Express. October 31, 1999. (आधीच्या मूळ आवृत्तीत त्रूटी जाणवल्याने विदागारातील आवृत्ती दिनांक जुलै २०१४ रोजी मिळविली). 2009-09-26 रोजी पाहिले. 
 6. Shinde drops 22 ministers in Maharashtra. rediff.com (July 6, 2004). 2009-09-26 रोजी पाहिले.
 7. Google's cache of http://www.deshdoot.com/news.php?news=1650&cid=&region=. It is a snapshot of the page as it appeared on 22 Sep 2010 02:48:21 GMT.
 8. Google's cache of http://www.ibnlokmat.tv/showstory.php?id=18731. It is a snapshot of the page as it appeared on 2 Oct 2010 04:56:18 GMT.
 9. http://archive.is/20121205221512/http://webcache.googleusercontent.com/search?q=cache:KI1QWHwa2HoJ:www.esakal.com/esakal/20100807/5115120270631234036.htm+%22%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%A3+%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8+%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%22&cd=10&hl=en&ct=clnk&gl=in&client=firefox
 10. Google's cache of http://www.esakal.com/esakal/20100807/5115120270631234036.htm. It is a snapshot of the page as it appeared on 21 Sep 2010 12:29:03 GMT.
 11. http://www.esakal.com/esakal/20100927/5667405651185960006.htm as viewed on 15th October 2010 12.42 pm
 12. http://www.starmajha.com/NewDiscussionReply.aspx?ForumID=13880
 13. http://www.esakal.com/esakal/20101015/4819484544424074376.htm
 14. http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6751318.cms as viewed on 15th October 1.09 pm
 15. http://www.maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6751279.cms as viewed on 15th october 1.11 pm
 16. Google's cache of http://loksatta.com/old/daily/20090303/raj02.htm. It is a snapshot of the page as it appeared on 25 Jul 2010 13:48:18 GMT.
 17. Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=82646:2010-07-02-15-15-25&Itemid=1 [मृत दुवा]. It is a snapshot of the page as it appeared on 15 Sep 2010 23:34:12 GMT.
 18. Google's cache of http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=78651:2010-06-17-15-15-04&catid=49:2009-07-15-04-02-32&Itemid=60. [मृत दुवा]It is a snapshot of the page as it appeared on 30 Sep 2010 14:52:57 GMT.
 19. Google's cache of http://marathi.webdunia.com/newsworld/news/regional/0808/21/1080821017_1.htm. It is a snapshot of the page as it appeared on 24 Sep 2010 16:29:41 GMT.