Jump to content

महायुती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

महायुती ही महाराष्ट्रात इस २०१४ मध्ये स्थापन झालेली एक राजकीय युती आहे.[] सध्या या युतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या तीन प्रमुख पक्षांसह भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले), राष्ट्रीय समाज पक्ष आणि इतर अनेक लहान भागीदारांचा समावेश आहे.

भाजप - शिवसेना या दोन प्रमुख पक्षांमध्ये दीर्घकालीन वैचारिक संबंध असल्याने या युतीमध्ये यांचे विशेष योगदान आहे. शिवसेनेच्या प्रादेशिक प्रभावाचा आणि भाजपच्या राष्ट्रीय आवाहनाचा फायदा घेऊन त्यांची एकत्रित ताकद वाढवण्याचे या युतीचे उद्दिष्ट होते.

महायुती बॅनरखाली, युतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ जिंकणे आणि राज्यातील लोकसभेच्या ४८ पैकी ४१ जागा मिळवणे यासह लक्षणीय यश मिळवले. तथापि, अंतर्गत ताणतणाव आणि सत्तावाटपावरून मतभेद यामुळे यातून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली २०१९ मध्ये शिवसेना बाहेर पडली.[]

परंतू २०२२ मध्ये महाविकास आघाडी पुरस्कृत राज्य सरकार विसर्जित झाल्यावर, ही युती पुन्हा पुनरुज्जीवित झाली.[] यात शिवसेनेचा एक गट महायुती मध्ये सामील झाला आणि बंडखोर शिवसेनेकडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन केले. तर देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. नंतर सन २०२३ साली महाराष्ट्रातील राजकीय पेचामध्ये महाविकास आघाडी मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचा एक गट अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली फुटला आणि महायुती सरकारमध्ये सामील झाला. यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या युतीला २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आणि २४ जागा गमावून ४८पैकी फक्त १७जागा मिळवता आल्या.

युतीचे विद्यमान सदस्य

[संपादन]
पक्ष चिन्ह ध्वज महाराष्ट्र विधानसभेतील आमदार महाराष्ट्र विधान परिषदेतील आमदार लोकसभेतील खासदार राज्यसभेतील खासदार
भारतीय जनता पक्ष
१०२ / २८८
२० / ७८
९ / ४८
८ / १९
शिवसेना
३८ / २८८
५ / ७८
७ / ४८
१ / १९
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
४० / २८८
६ / ७८
१ / ४८
३ / १९
बहुजन विकास आघाडी
३ / २८८
० / ७८
० / ४८
० / १९
प्रहार जनशक्ती पक्ष
२ / २८८
० / ७८
० / ४८
० / १९
राष्ट्रीय समाज पक्ष
१ / २८८
० / ७८
० / ४८
० / १९
महाराष्ट्र नवनिर्माण सेना
१ / २८८
० / ७८
० / ४८
० / १९
भारतीय रिपब्लिकन पक्ष (आठवले)
० / २८८
० / ७८
० / ४८
१ / १९
Total
२०२ / २८८
३४ / ७८
१७ / ४८
१२ / १९

निवडणूक कामगिरी

[संपादन]
वर्ष जागा जिंकल्या/



जागा लढवल्या
जागांमध्ये बदल व्होटशेअर (%) +/- (%) लोकप्रिय मत
2024
१७ / ४८
<div style="background-color: लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.; width: 35%; height: 100%;">
</img> २४ 43.55% </img> ७.७९% २४,८१२,६२७

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल

[संपादन]
वर्ष जागा जिंकल्या/



जागा लढवल्या
जागांमध्ये बदल व्होटशेअर (%) +/- (%) लोकप्रिय मत
2024
००० / २८८
<div style="background-color: लेखन त्रुटी:"Political party" असा कोणताच विभाग नाही.; width: 0%; height: 100%;">

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "2014 saw return of BJP-Sena regime in Maharashtra after 15 years". The Economic Times. 18 December 2014. ISSN 0013-0389. 2 October 2024 रोजी पाहिले.
  2. ^ Team, ThePrint (11 November 2019). "Is Shiv Sena taking a huge political risk by separating from BJP in Maharashtra?". ThePrint (इंग्रजी भाषेत). 2 October 2024 रोजी पाहिले.
  3. ^ "Maharashtra: The political crisis brewing in India's richest state" (इंग्रजी भाषेत). 22 June 2022. 2 October 2024 रोजी पाहिले.