मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

इतिहास[संपादन]

१९८४ : भारतामध्ये दूरचित्रवाणी प्रसारणाची सुरुवात झाल्यानंतर मराठी भाषेमध्ये प्रथम इ.स. १९७२ मध्ये मुंबईच्या दूरदर्शन केंद्रामधून ३ तासांचे मराठी प्रसारण दूरदर्शनने सुरु केले. इ.स. १९८४ पर्यंत मुंबई दूरदर्शन वरुन ६ तासांचे मराठी भाषिक प्रसारण Terrestrial प्रकारात सुरु झाले.

१९९४ : २४ तास प्रसारित होणारी मराठी वाहिनी दूरदर्शन मराठी ची सुरुवात वर्ष १९९४ मध्ये सुरु झाली. ही पहिली मराठी उपग्रह वाहिनी होय. ही वाहिनी प्रथम DD-10 या नावाने लोकप्रिय होती, त्यानंतर या वाहिनीचे दूरदर्शन सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. दामिनी, घरकुल, Hello सह्याद्री, Hello इन्स्पेक्टर, गजरा, किलबिल यासारखे त्यावेळचे दूरदर्शनवरील कार्यक्रम जनमानसात लोकप्रिय होते.

अल्फा मराठी (१९९९)[संपादन]

१९९९ मध्ये मराठी प्रेक्षकांसाठी दूरचित्रवाणीचे नवे रुप समोर आले, ते पहिल्या खाजगी उपग्रह वाहिनी अल्फा मराठी च्या साथीने. २००४ मध्ये या वाहिनीचे नाव झी नेटवर्कने झी मराठी असे केले.

ई टीव्ही मराठी (२०००)[संपादन]

ई टीव्ही मराठी ही वाहिनी सन २००० मध्ये हैदराबाद येथील रामोजी राव यांच्या ई टीव्ही नेटवर्क द्वारे सुरू झाली. २०१५ मध्ये ही वाहिनी हिंदी टेलिव्हिजन वाहिनी कलर्सच्या व्हायाकॉम १८ यांनी घेतली व तिचे नाव कलर्स मराठी असे करण्यात आले.

मी मराठी (२००७)[संपादन]

मी मराठी वाहिनीची सुरुवात सन २००७ मध्ये झाली. मुंबई येथील श्री अधिकारी ब्रदर्स हे या वाहिनीचे संस्थापक होते. ह्या वाहिनीचे प्रोमो सॉंग खूपच लोकप्रिय होते.

वृत्त वाहिनी[संपादन]

एकेकाळी टीव्हीवरुन मराठी भाषेत केवळ १ किंवा २ तास बातम्या दाखविल्या जायच्या, तेथे आता संपूर्ण २४ तास वृत्तप्रसारण करणार्‍या वाहिन्या सुरु झाल्या आहेत. मराठी भाषेतील २४ तास बातम्या देणारी झी २४ तास ही पहिली मराठी वृत्तवाहिनी २००७ साली सुरू झाली.

त्यानंतर जून २००७ मध्ये दुसरी वृत्तवाहिनी स्टार इंडियाने स्टार माझा ह्या नावाने सुरु केली आणि ०१ जून २०१२ नंतर या वाहिनीचे नाव एबीपी माझा असे बदलण्यात आले. न्यूज १८ आणि लोकमत या दोन कंपन्यांनी मिळून आयबीएन लोकमत ही वृत्तवाहिनी २००८ साली सुरु केली आणि नंतर या वाहिनीचे नाव न्यूज १८ लोकमत करण्यात आले.

साम टीव्ही ही वाहिनी प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र समूह सकाळने २००८ साली सुरु केली. यानंतर २००९ मध्ये एबीसीएल ग्रुपने टीव्ही ९ मराठी ही वाहिनी चालू केली. २०१३ मध्ये सहावी मराठी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र सुरु झाली.

चित्रपट वाहिनी[संपादन]

झी टॉकीज [१] ही पहिली मराठी चित्रपट वाहिनी नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती व प्रसारण ह्या वाहिनीद्वारे केले जाते.

संगीत वाहिनी[संपादन]

९x झकास [२] ह्या पहिल्या २४ तास चालणार्‍या मराठी संगीत वाहिनीची सुरुवात दिनांक ३१ ऑक्टोबर २०११ रोजी झाली. दुसरी मराठी संगीत वाहिनी १८ सप्टेंबर २०१५ रोजी संगीत मराठी या नावाने सुरू झाली.

DTH (डायरेक्ट टू होम)ची उपलब्धता[संपादन]

कोड सेवा पुरवठादाराचे नांव
TS टाटा स्काय
BG रिलायन्स डिजिटल TV
VD व्हिडिओकॉन D2H
AT एअरटेल डिजिटल TV
SN सन डिरेक्ट
DS डिश TV
DD DD डिरेक्ट+
O/I ऑनलाइन/इंटरनेट
सर्व सर्व सेवापुरवठादार ( DD डिरेक्ट वगळता)

वाहिन्यांची यादी[संपादन]

मनोरंजन वाहिन्या[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ दूरदर्शन सह्याद्री प्रसार भारती दूरदर्शन १९७२
०२ झी मराठी झी नेटवर्क १९९९
०३ झी युवा झी नेटवर्क २०१६
०४ स्टार प्रवाह स्टार इंडिया २००८
०५ कलर्स मराठी व्हायाकॉम १८ २०००
०६ सोनी मराठी सोनी नेटवर्क २०१८
०७ फक्त मराठी एंटर १० २००७

वृत्त वाहिन्या[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ झी २४ तास झी नेटवर्क २००७
०२ एबीपी माझा एबीपी न्यूज नेटवर्क २००७
०३ न्यूज १८ लोकमत न्यूज १८ नेटवर्क २००८
०४ टीव्ही ९ मराठी एबीसीएल नेटवर्क २००९
०५ जय महाराष्ट्र साहना मीडिया २०१३
०६ साम टीव्ही साम नेटवर्क २००७

चित्रपट वाहिन्या[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ झी टॉकीज झी नेटवर्क २००७
०२ मायबोली २०४
०३ शेमारू मराठी बाणा शेमारू नेटवर्क २०२०

संगीत वाहिनी[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ ९x झकास आयएनएक्स नेटवर्क २०११
०२ संगीत मराठी त्रिवेणी मीडिया २०१५

HD वाहिनी[संपादन]

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ स्टार प्रवाह HD स्टार इंडिया २०१५
०२ कलर्स मराठी HD व्हायाकॉम १८ २०१५
०३ झी टॉकीज HD झी नेटवर्क २०१६
०४ झी मराठी HD झी नेटवर्क २०१६

संदर्भ[संपादन]

  1. ^ [ http://www.zeetalkies.tv zeetalkies.tv]
  2. ^ [9X Jhakaas]