भांडवलशाही अर्थव्यवस्था

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात,वस्तूसेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारांमार्फत होते व त्यांच्या किंमती बाजार यंत्रणे करवी ठरतात,अशा अर्थव्यवस्थेला " भांडवलशाही अर्थव्यवस्था " असे म्हणतात.[१]

वैशिष्ट्ये[संपादन]

 1. उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्ये आहे.
 2. उद्योग - व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी या संबंधीचे निर्णय मालक स्वतः स्वतंत्रपणे घेऊ शकतात.
 3. ग्राहक हे " सार्वभौम " असतात,कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात.
 4. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते.
 5. येथे नफा मिळवण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते.[२]

दोष[संपादन]

 1. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सांपत्तिक विषमता वाढते.
 2. जास्तीत जास्त नफा कमविणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने गरिबी,बेरोजगारी,कामगार कल्याण,पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही.
 3. चैनीच्या व निम - चैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो.
 4. अशा अर्थव्यवस्थेत तेजी - मंदीची व्यापारचक्रे येत असतात.तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदीदरम्यान बेरोजगारीत वाढ होते.[३]
 1. ^ Capitalist economy
 2. ^ Characteristics of the capitalist economy
 3. ^ The fault of the capitalist economy