ब्रह्मपुरी
?ब्रम्हपुरी महाराष्ट्र • भारत | |
— शहर — | |
![]()
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • समुद्री किनारा |
२१.९२ चौ. किमी • त्रुटि: "नाही" अयोग्य अंक आहे किमी |
हवामान तापमान • उन्हाळा |
• ४२%-४७% °C (अभिव्यक्ती त्रुटी: अनोळखी उद्गारवाचक चिन्ह "४" °F) |
जवळचे शहर | नागपूर |
प्रांत | विदर्भ |
विभाग | नागपूर |
भाषा | मराठी |
संसदीय मतदारसंघ | गडचिरोली-चिमूर (लोकसभा मतदारसंघ) |
विधानसभा मतदारसंघ | ब्रम्हपुरी |
तहसील | ब्रम्हपुरी |
पंचायत समिती | ब्रम्हपुरी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी • आरटीओ कोड |
• ४४१२०६ • +०७१७७ • +३४ |
ब्रम्हपुरी हे भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातील एक अतिमहत्त्वाचे शहर आहे. हे शहर जिल्ह्यात अतिशय शांत शहर म्हणून ओळख असलेले हे शहर, जिल्ह्याच्या ईशान्य सीमेवर वसले आहे. शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, परिसरात शिक्षणाचे माहेरघर अशी ब्रम्हपुरी शहराची ओळख आहे. या शहराची लोकसंख्याही झपाट्याने वाढत आहे. जवळपासच्या ग्रामीण तथा शहरी लोकांसाठी ब्रह्मपुरी शहर हे वैद्यकीय सोयी-सुविधांसाठी खूपच छान आहे. आठवडी बाजार, उत्तम बाजारपेठ, भव्य कापड दुकान ,सुंदर आणि स्वच्छ शहर.
इतिहास[संपादन]

१८५४मध्ये जेव्हा स्वतंत्र चांदा (सध्याचे चंद्रपूर) जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली, तेव्हा १८७४मध्ये ब्रम्हपुरी तालुक्याची बनला. सुरुवातीला चांदा जिल्ह्यामध्ये केवळ वरोरा, मूल, ब्रम्हपुरी आणि चांदा तालुक्यांचाच समावेश होता. त्यानंतर १९०५ मध्ये चांदा आणि ब्रम्हपुरी तालुक्यातील जमीनदारी मालमत्ता हस्तांतरित करून गडचिरोली हा नव्या तालुका निर्माण झाला.
ब्रम्हपुरी शहरामध्ये इंग्रजांच्या काळातील टेनिस क्लब आहे. तसेच ब्रिटिश काळातील अनेक वास्तू शहराच्या पारतंत्र्यापूर्वी असणाऱ्या त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देत मोठ्या थाटात उभ्या आहेत. या शहराच्या चारही बाजूंनी १०० कि.मी.पर्यंत कोणतेही मोठे शहर नाही.
गेल्या अनेक दशकांपासून चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नव्या ब्रम्हपुरी जिल्ह्याची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी जोर धरत आहे.
१९८२ मध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे विभाजन करून नव्या ब्रम्हपुरी जिल्ह्याच्या निर्मितीची घोषणा करण्यात आली होती. परंतु राजकीय दबावामुळे असो, वा प्रशासकीय सोयीसाठी एका रात्रीतूनच निर्णय बदलला गेला आणि ब्रम्हपुरी ऐवजी गडचिरोली हा नवा जिल्हा बनला.
ब्रम्हपुरी तालुक्याचे अनेक वेळा विभाजन करण्यात आले. त्यावेळी नव्या गडचिरोली तालुक्याची स्थापना, नव्या सिंदेवाही - सावली - नागभीड तालुक्यांची स्थापना झाली. ब्रम्हपुरी येथे चंद्रपूर जिल्ह्याचा प्रशासकीय उपविभाग आहे. यामध्ये पूर्वी नागभीड, सिंदेवाही आणि सावली आणि ब्रम्हपुरी तालुक्यांचा समावेश असायचा; परंतु आता त्यात केवळ नागभीड आणि ब्रम्हपुरी हे तालुके आहेत.
भूगोल व हवामान[संपादन]
ब्रम्हपुरी शहर समुद्रसपाटीपासून २३० मीटर उंचीवर आहे. शहराचे हवामान सामान्यतः उष्ण व कोरडे आहे. उन्हाळ्यामध्ये तापमानाचा पारा ४७°C पर्यंत जातो तर हिवाळ्यामध्ये ७°C पर्यंत खाली घसरतो. ब्रह्मपुरीची जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून2022 मध्ये नोंद घेतली गेली.
ब्रम्हपुरी शहरामध्ये पर्जन्याचे प्रमाण खूप आहे, एका दिवसात २०२ मिलिमीटर पर्जन्याचा विक्रम १३ जुलै २०१३ रोजी नोंदविण्यात आला, यापूर्वी २४ तासातील केवळ १३१ मिलिमीटर पावसामुळे संपूर्ण चंद्रपूर शहर पाण्याखाली आले होते, तेव्हा ३०० मिमी पेक्षा जास्त पाऊस पडूनही ब्रम्हपुरी शहरामध्ये पुराची स्थिती निर्माण झाली नाही, इथे कितीही पाऊस पडला तरी ब्रम्हपुरीत पूरस्थिती उद्भवत नाही हे ब्रम्हपुरी शहराचे वैशिष्ट्य आहे.
लोकसंख्या[संपादन]
सन २००१ च्या शिरगणतीनुसार ब्रम्हपुरीची लोकसंख्या ३१,२०७ इतकी आहे.
पर्यटन[संपादन]

पर्यटनाच्या बाबतीत हा परिसर मागासलेला असला तरी गेल्या काही वर्षातील घडामोडी लक्षात घेता महाराष्ट्र शासन सुद्धा या भागामध्ये पर्यटनाचा विकास करण्यात उत्सुक आहे असे दिसते. ब्रम्हपुरी शहराच्या वायव्य सीमेवर वसलेल्या धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी नामक संस्थेला महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळाचा दर्जा दिला आहे. त्या क्षेत्राचा विकासही पर्यटन स्थळ म्हणून होताना दिसत आहे. धम्मभूमी परिसर हा उपवन संरक्षक, वनविभाग ब्रम्हपुरी यांच्या सरकारी बंगल्याच्या मागे शिवाजी नगर मार्गावर आहे.
शहरामध्ये तीन तलाव आहेत. ब्रम्हपुरी नगर परिषद क्षेत्रामध्ये दाट वस्ती असल्यामुळे शहरात एकही मोकळे मैदान नाही, की जिथे उद्यान करता येईल.
ब्रह्मपुरी -नागपूर मार्गावर अड्याळ टेकडी येथे गीताचार्य तुकाराम दादा यांची समाधी आहे. ही भूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहे. शेकडो गुरुदेव अनुयायी या ठिकाणी येऊन भेट देत असतात.
उत्सव[संपादन]
हिंदू, बौद्ध व इस्लाम हे शहरातील लोकांचे प्रमुख धर्म आहेत. तसे असले तरी या शांतताप्रिय शहरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकमेकांच्या सण - उत्सवांमध्ये सहभागी होत असतात.
गणपती उत्सव[संपादन]
ब्रम्हपुरीमध्ये गणेश उत्सव खूप वर्षापासून उत्साहाने साजरा केला जातो. माननीय बाबा खानोरकर हे या उत्सवाचे जनक आहेत . हा उत्सव जवळजवळ १० दिवस चालतो .या गणपती उत्सवाला "ब्रम्हपुरीचा राजा" असे म्हणतात. गणेश उत्सव हा ब्रम्हपुरीकरांसाठी खूप मनोरंजनाचा आणि उत्साहाचा असतो, या उत्सवामध्ये लाखोंच्या संख्येने नागरिक असतात. ब्रम्हपुरी, नागभीड ,सिंदेवाही, सावली तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा ,देसाईगंज, आरमोरी ,भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर त्याचप्रमाणे सभोवतालील नागरिक हा गणेशोत्सव बघायला येतात.
बौद्ध सण व उत्सव[संपादन]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती व समता सैनिक दल, ब्रम्हपुरी यांच्या विद्यमाने भीमा कोरेगाव शौर्य दिन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, बुद्ध जयंती, धम्मचक्र प्रवर्तन दिन वर्धापन सोहळा वगैरे दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तर धम्म प्रचार केंद्र, धम्मभूमी, ब्रम्हपुरीद्वारे धम्म कार्यशाळा यांचे आयोजन केले जाते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहराच्या प्रत्येक भागातून रात्री भव्य फेऱ्या काढल्या जातात व ब्रह्मपुरीतल्या भीमनगर येथील डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला वंदन करून परत जातात. तर गेल्या काही वर्षांपासून या दिवशी २४ तास अभ्यासस्पर्धेचे आयोजन केले जाते.
ख्रिस्ती सण व उत्सव[संपादन]
शहरातील लोकांना ख्रिस्ती सणांचे कायम आकर्षण राहिले आहे. शहरामध्ये ख्रिस्ती लोकसंख्या अतिशय विरळ असली, तरी नाताळाच्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्तांचे दर्शन घेण्यासाठी चर्चमध्ये खूप गर्दी असते. ख्रिस्तानंद एज्युकेशन सोसायटीद्वारा संचालित ख्रिस्तानंद कॉन्व्हेंट स्कूल आणि ख्रिस्तानंद रुग्णालयात ख्रिस्त जन्मानिमितत्त भरलेल्या प्रदर्शनात बघ्यांची गर्दी असते.
हिंदु सण व उत्सव[संपादन]
ब्रम्हपुरीकरांचा प्रमुख उत्सव म्हणजे गणेशोत्सव. सर्व ब्रम्हपुरीकर गणेशोत्सवाची वर्षभर वाट बघत असतात. माजी आमदार बाबासाहेब खानोरकर यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, तर माजी नगराध्यक्ष अशोक भैय्या यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेले ने. हि. गणेशोत्सव मंडळ ही दोन प्रमुख गणेशोत्सव मंडळे आहेत. तर धुम्मनखेडा येथील गणेशोत्सव सर्वांना जास्त आवडत असून याच्या विसर्जनाची शहर वासी आवर्जून वाट बघत असतात.
त्याचप्रमाणे प्रत्येक चौकामध्ये होळी पेटवून होळी, रंगपंचमी ,बैलपोळा, दिवाळी, नागपंचमी, नवरात्री उत्साहाने साजरे करतात .
मुस्लिम सण[संपादन]
मुस्लिम बांधवांची संख्या शहरामध्ये बरीच आहे. हे मोठे मोठे व्यवसायिक आहेत. त्यामुळे ईद हे उत्सव मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. तसेच इतर मुस्लिम सण सुद्धा येथे साजरे केले जातात.
शहराबद्दल[संपादन]
- ब्रम्हपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार हे आहेत.
- ब्रम्हपुरीचे नगराध्यक्ष रिताताई ऊराडे आहेत.
- ब्रह्मपुरी शहर हे वैद्यकीय आणिि शैक्षणिक सुविधांसाठी अति उत्तम आहे
शिक्षण[संपादन]
ब्रह्मपुरी शहराला शिक्षणाचे माहेरघर मानले जाते. तर शहरात भांडवलदारांचे शिक्षण संस्था स्थापन करण्या त आलेल्या असून जन सामान्यांना चांगला शिक्षण घेने अश्यक्य झाले आहे.
शिक्षणसंस्था[संपादन]
- नेवजाबाई हितकरिणी महाविद्यालय
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय
संदर्भ[संपादन]
http://timesofindia.com/city/nagpur/Record-rainfall-in-Bramhapuri/articleshow/21063111.cms
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |