पनीर
पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे.[१] आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा आहे.[२] दुधाखेरीज सोयाबीन पासूनही पनीर तयार केले जाते. याला टोफू असे म्हणतात.[३]
प्रक्रिया
[संपादन]पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, व्हीनेगर सायट्रीक आम्ल किंवा योघर्ट वापरतात.[४] गरम दूधात यापैकी एक आम्ल टाकल्यामुळे ते नासते. तलम कपड्याने ते गाळल्यावर जास्तीचे पाणी निघून जाते.हे तयार झालेला पनीर मग २-३ तास अति थंड पाण्यात ठेवण्यात येतो.या पायरीनंतर,वेगवेगळ्या प्रदेशात, त्याच्या वापरानुसार मग त्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती बदलतात. जास्तीत जास्त पद्धतीत,दही हे एका तलम कपड्यात ठेवून मग त्यावर २-३ तासासाठी वजन ठेवल्या जाते.या घट्ट झालेल्या पनीरचे मग एकसारखे तुकडे कापण्यात येतात. पूर्व भारतीय व बांग्ला देशातील व्यंजनात दही हे हाताने घोटल्या जाते, किंवा आपटुन मग त्याचा भिजविलेल्या कणिकेसारखा घट्ट गोळा केल्या जातो.त्यास 'छना' असे बंगालीत म्हणतात.
पनीर वापरून तयार केल्या जाणा-या वेगवेगळ्या पाककृती
[संपादन]भारताच्या विविध प्रांतात पनीरचा वापर करून विविध पाककृती तयार केल्या जातात.[५] यातील काही पाककृती या पारंपरिक असून काही पाककृती आधुनिक काळात तयार झालेल्या दिसतात.[६] बंगाल मध्ये पनीर वापरून विविध पदार्थ तयार करण्याची पारंपरिक पद्धती प्रचलित आहे.[७] पुढील काही पाककृती भारतात प्रसिद्ध आहेत-
- पालक पनीर
- मटर पनीर
- पनीर साग
- शाही पनीर
- पनीर भूर्जी
- पनीर टिक्का
- कढई पनीर
- चिली पनीर[८]
- पनीर पकोडा
- रसमलाई
- रसगुल्ला
चित्रदालन
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Puri, Neena. Paneer Hungama (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-288-0519-6.
- ^ MumbaiMay 7, Tiasa Bhowal; May 7, 2021UPDATED:; Ist, 2021 13:40. "Build Your Immunity to Fight Covid: Three vegetable creamy paneer soup". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-05-25 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Tofu is like a blank canvas from which you can create masterpieces". Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-25 रोजी पाहिले.
- ^ "How to make paneer from excess milk – recipe | Waste not". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2021-05-22. 2021-05-25 रोजी पाहिले.
- ^ Kapoor, Sanjeev. Paneer (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-330-7.
- ^ Dalal, Tarla (200?). Paneer (इंग्रजी भाषेत). Sanjay & Co. ISBN 978-81-86469-90-3.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ Shurtleff, William; Aoyagi, Akiko (2010-12). History of Soybeans and Soyfoods in South Asia / Indian Subcontinent (1656-2010): Extensively Annotated Bibliography and Sourcebook (इंग्रजी भाषेत). Soyinfo Center. ISBN 978-1-928914-31-0.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Making Chilli Paneer Was Never This Easy; Try This Yummy Recipe With Secret Trick Today". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-25 रोजी पाहिले.