लिंबू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कागदी लिंबू हे भारतीयांच्या अन्‍नात रोजच्या वापरात असलेले एक आंबट चवीचे फळ आहे. हे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळ्या रंगाचे होते. हे एक आंबट फळ आहे. कागदी लिंबाचे अनेक उपयोग आहेत. याचे सरबत, लोणचे इत्यादी करतात.

लिंबाचे झाड[संपादन]

लिंबाच्या झाडाला लिंब किंवा निंब म्हणतात. हे झुडुप असते. पान जेथे देठाला चिकटते, तेथे एक लहानसा पंख असतो. देठाला लहान काटे असतात. पानाच्या बेचक्यात फूल आणि फळ येते. लिंबाचे सालीवरून अनेक प्रकार होतात, ते असे-. जाड दाल, पातळ साल, पिवळी साल, हिरवी साल, सपक साल आणि खरखरीत साल.बगदाद येथे दुप्पट आकाराची आणि तांबूस फळे देणारा एक प्रकार आहे. सिसिली बेटात लिंबाचे अमाप पीक येते अमेरिका आणि इंग्लंड या देशांत सिसिलीची लिंबे जातात.

लिंबाच्या अनेक जाती आहेत, महाळुंग, ईडलिंबू, जंबीर, वगैरे.

लिंबू सेवनाचे फायदे[संपादन]

१. लठ्ठपणा कमी करण्यासाठी :- दररोज सकाळी उपाशी पोटी गरम पाण्याबरोबर लिंबू सेवन केल्यास अतिरिक्त चरबी कमी होते.

२. पित्त झाले असल्यास रोज लिंबाचे सरबत घ्यावे. त्याने भूक वाढते. अन्न पचते व शौचास साफ होते.

3.वाळलेले लिंबू मधात घालून चाटण म्हणून घेतल्यास उचकी तसेच ओकारी थांबण्यास मदत होते. अंगाला कंड सुटत असल्यास लिंबाचा रस खोबरेल तेलात मिसळून अंगास चोळावा व ऊन पाण्याने स्नान करावे. कंड कमी होतो.

4.नायटे व डोक्यातील खवडे यावरही लिंबाचा रस चोळल्याने चांगला परिणाम होतो.

5. सुंदर केसांसाठी लिंबू जर आपले केस किंवा टाळूवरची त्वचा तेलकट असेल तर त्यावर लिंबू लावा. जास्त प्रमाणात लावू नये, कारण त्यामुळे केस बिल्च होतील. मात्र थोडासा लिंबाचा रस हाताने केसांच्या मुळास लावणे योग्य असेल. रोजचा किंवा सतत लिंबाचा उपयोग केसांवर करू नये. गरजेनुसार उपयोग करावा. मरगळलेल्या केसांना लिंबाचा रस चमक आणि तजेलदार बनवतात. कृत्रिम उत्पादनांचा वापर न करता केस सुंदर आणि सुगंधी होतात. गरमीच्या दिवसात घामाने आणि धुळीने केस घाण होतात. त्यामुळे आपण केस वारंवार धुतो. लिंबाचा वापर केसांना चमकदार व गुळगुळीत बनवतो. लिंबू रस किंवा लिंबूचा वापर योग्य प्रमाणात करावा. जास्त उपयोग केल्यास केस कोरडे होऊ शकतात.

लिंबाची अन्य भाषांतली नावे[संपादन]

  • इंग्रजी- ॲसिड सोअर लाईम, लेमन
  • कानडी- निंबे, लिंबे
  • गुजराथी- निंबू, खटलिंबू
  • शास्त्रीय नाव- Citrus aurantifolia (सायट्रस ऑरंटिफोलिया, जात ॲसिडा), Limon aurantifolia; Variety- acida)
  • संस्कृत- आम्लसार, निम्‍बु, निम्बुक, रोचना, लिम्पका, शोधना
  • हिंदी- कागज़ी निंबू, निंबू, नेबू, लिंबू, लेबू

लिंबाच्या महाळुंग नावाच्या जातीची अन्य नावे[संपादन]

  • कानडी- मदाला, महाफल, रूचक
  • गुजराथी- तुरंज, बालंक, बिजोरू
  • मराठी- महाळुंग. मवालुंगा
  • शास्त्रीय नाव- Citrus medica
  • संस्कृत- अम्लकेशर, महानिंम्बू, मातुलुंग, फलपूरक, बीजपूरक (पहा : उपायानार्थमागच्छ गृहीत्वा बीजपूरकम्‌ - मालविकाग्निमित्र ३.१), रूचका
  • हिंदी- कुतला, तुरंज, बिजौरा, बोरा निंबु

लिंबाच्या ईडलिंबू नावाच्या जातीची अन्य नावे[संपादन]

  • इंग्रजी- लेमन
  • कानडी- देवमादला, दोड्डा गाजा, दोड्डा निंबा, माटुंगा, मातालुंगा, समहानिंबू, हराली
  • गुजराथी- मोटालिंबा, दोडिंगा
  • मराठी- ईडलिंबू, थोरालिंबू
  • शास्त्रीय नाव- Citrus medica, Variety Limonum
  • संस्कृत- दंतशठ
  • हिंदी- जंबिरा, पहाडी निंबु, बडानिंबु



Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.