पनीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पनीर चिली. पनीर वापरून केला जाणारा लोकप्रिय पदार्थ
पनीर

पनीर हा दुधापासून तयार केला जाणारा पदार्थ आहे.[१] आहारात प्रथिनांचा समावेश असावा यासाठी पनीरचा वापर भोजनात केला जातो. प्रथिनांचा प्रमुख स्रोत म्हणून पनीर हा पदार्थ आहारशास्त्रदृष्ट्या महत्त्वाचा आहे.[२] दुधाखेरीज सोयाबीन पासूनही पनीर तयार केले जाते. याला टोफू असे म्हणतात.[३]

प्रक्रिया[संपादन]

पनीर तयार करण्यासाठी,लिंबाचा रस, व्हीनेगर सायट्रीक आम्ल किंवा योघर्ट वापरतात.[४] गरम दूधात यापैकी एक आम्ल टाकल्यामुळे ते नासते. तलम कपड्याने ते गाळल्यावर जास्तीचे पाणी निघून जाते.हे तयार झालेला पनीर मग २-३ तास अति थंड पाण्यात ठेवण्यात येतो.या पायरीनंतर,वेगवेगळ्या प्रदेशात, त्याच्या वापरानुसार मग त्यावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती बदलतात. जास्तीत जास्त पद्धतीत,दही हे एका तलम कपड्यात ठेवून मग त्यावर २-३ तासासाठी वजन ठेवल्या जाते.या घट्ट झालेल्या पनीरचे मग एकसारखे तुकडे कापण्यात येतात. पूर्व भारतीयबांग्ला देशातील व्यंजनात दही हे हाताने घोटल्या जाते, किंवा आपटुन मग त्याचा भिजविलेल्या कणिकेसारखा घट्ट गोळा केल्या जातो.त्यास 'छना' असे बंगालीत म्हणतात.

पनीर वापरून तयार केल्या जाणा-या वेगवेगळ्या पाककृती[संपादन]

पनीर टिक्का

भारताच्या विविध प्रांतात पनीरचा वापर करून विविध पाककृती तयार केल्या जातात.[५] यातील काही पाककृती या पारंपरिक असून काही पाककृती आधुनिक काळात तयार झालेल्या दिसतात.[६] बंगाल मध्ये पनीर वापरून विविध पदार्थ तयार करण्याची पारंपरिक पद्धती प्रचलित आहे.[७] पुढील काही पाककृती भारतात प्रसिद्ध आहेत-

चित्रदालन[संपादन]

मटार पनीर
पालक पनीर
पनीर बटर मसाला
पनीर टिक्का मसाला
कोलकाता येथील चिली पनीर
पनीर आणि इतर भाज्यांची टोपिंग असलेला पिझ्झा

संदर्भ[संपादन]

  1. ^ Puri, Neena. Paneer Hungama (इंग्रजी भाषेत). Diamond Pocket Books (P) Ltd. ISBN 978-81-288-0519-6.
  2. ^ MumbaiMay 7, Tiasa Bhowal; May 7, 2021UPDATED:; Ist, 2021 13:40. "Build Your Immunity to Fight Covid: Three vegetable creamy paneer soup". India Today (इंग्रजी भाषेत). 2021-05-25 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
  3. ^ "Tofu is like a blank canvas from which you can create masterpieces". Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-25 रोजी पाहिले.
  4. ^ "How to make paneer from excess milk – recipe | Waste not". the Guardian (इंग्रजी भाषेत). 2021-05-22. 2021-05-25 रोजी पाहिले.
  5. ^ Kapoor, Sanjeev. Paneer (इंग्रजी भाषेत). Popular Prakashan. ISBN 978-81-7991-330-7.
  6. ^ Dalal, Tarla (200?). Paneer (इंग्रजी भाषेत). Sanjay & Co. ISBN 978-81-86469-90-3. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  7. ^ Shurtleff, William; Aoyagi, Akiko (2010-12). History of Soybeans and Soyfoods in South Asia / Indian Subcontinent (1656-2010): Extensively Annotated Bibliography and Sourcebook (इंग्रजी भाषेत). Soyinfo Center. ISBN 978-1-928914-31-0. |date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  8. ^ "Making Chilli Paneer Was Never This Easy; Try This Yummy Recipe With Secret Trick Today". NDTV Food (इंग्रजी भाषेत). 2021-05-25 रोजी पाहिले.