पालक पनीर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पालक पनीर
Palak Paneer (Cottage cheese in spinach gravy).jpg
पालक पनीर
पर्यायी नावे पालक पनीर
प्रकार डिश
जेवणातील कोर्स मुख्य
उगम भारत
प्रदेश किंवा राज्य पंजाब
द्वारे निर्मित अज्ञात
शोध लावला अज्ञात
अन्न बनवायला लागणारा वेळ 15 मिनिटे ते 20 मिनिटे
अन्न वाढण्याचे तापमान गरम गरम
मुख्य घटक पालक, पनीर, हिरवी मिरची, लसूण
सामान्यतः वापरले जाणारे साहित्य जिरे, धने, गरम मसाला,
भिन्नता सामान्य
अन्नाद्वारे प्राप्त ऊर्जा
(प्रती 100 ग्रॅम )
183 किलो कॅलरी (766 किलो जुल)nutritionix
पौष्टिक मूल्य
(प्रती 100 ग्रॅम)
प्रथिने 7.5 ग्रॅम
स्निग्धांश 5.5 ग्रॅम
कर्बोदके 5 ग्रॅम
तत्सम पदार्थ आलू पालक

पालक पनीर हा पालकपनीर वापरून केलेला पंजाबी खाद्यपदार्थ आहे.

साहित्य :

  • तेल
  • पालक १ जुडी
  • जिरे पूड
  • धणे पूड
  • हळद
  • लाल तिखट
  • गरम मसाला
  • मीठ
  • पनीर
  • कसुरी मेथी

कृती :

एक चमचा तेल तव्यामध्ये गरम करावे. लहान आकाराचे टोमॅटो बारीक करून त्यामध्ये घालावे व एक हिरवी मिरची बारीक चिरून त्यामध्ये घालावी. नंतर त्यावर झाकण घालून मंद आचेवर शिजू द्यावे. २-३ मिनिट मिश्रण मऊ होईपर्यंत मंद आचेवर ठेवावे.

पालकाची पाने स्वच्छ धुऊन बारीक कापून घ्यावी व ती कढईमध्ये टाकावी. अर्धा कप पाणी घालावे व ३-४ मिनिट मंद आचेवर शिजवून घ्यावे. थोड्या वेळाने ते थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे.

नंतर जिरे पूड १/२ चमचा, धणे पूड १ चमचा, हळद १/२ चमचा, लाल तिखट १ चमचा, गरम मसाला १ चमचा, मीठ चवीपुरते मिसळून घ्यावे व त्यामध्ये ४-५ चमचे पाणी मिसळून त्याचे मिश्रण बनवावे. तव्यात १ चमचा तेल घालून त्यामध्ये हे मिश्रण मंद आचेवर तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे तसेच १ चमचा जिरे घालावे, १ चमचा लसूण पूड घालावी व पालक बारीक केलेला त्यामध्ये मिसळून मंद आचेवर ठेवावे व दोन मिनिट परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ घालावे, २ चमचे बटर घालावे. २ चमचे साय घालावी. ते मिश्रण मंद आचेवर पारतून घ्यावे. २५० ग्रॅम पनीर घालावे व मंद आचेवर १०-१५ मिनिट ठेवावे. तुमचे पालक पनीर तयार झाले.