पिझ्झा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेपरोनी पिझ्झा

पिझ्झा हा जगातील एक लोकप्रिय इटालियन खाद्यपदार्थ आहे. पिझ्झा बनवण्यासाठी मैद्याच्या गोल लाटलेल्या पोळीवर टोमॅटो पेस्ट व चीझ फासून त्यावर विविध तर्‍हेची टॉपिंग्स[मराठी शब्द सुचवा] कापून ठेवली जातात व भट्टीमध्ये भाजले जाते. अनेक प्रकारचे शाकाहारी व मांसाहारी पिझ्झे जगभर बनवले जातात. भारतामधील शहरांमध्ये पिझ्झाची लोकप्रियता झपाट्याने वाढते आहे, विशेषतः तरुण पिढीत पिझ्झाचे आकर्षण प्रकर्षाने आढळते. पिझ्झा हट, डॉमिनोज, स्मोकिंग जोज इत्यादी पिझ्झा बनवणाऱ्या विदेशी खाद्यकंपन्या भारतात लोकप्रिय आहेत.