रसगुल्ला

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रसगुल्ला हा मिठाईचा भारतीय पदार्थ आहे.हा पदार्थ मुख्यतः पश्चिम बंगालओडिसात लोकप्रिय आहे.

नावे

 रसगुल्ला बंगालमध्ये रोसोगोल्ला किंवा रोशोगुल्ला म्हणून ओळखला जातो तर ओडिसात रसगोला म्हणून.तर हा पदार्थ रोशगुल्ला,रोसोगुल्ला,रसगोल्ला आणि रसभरी वा रसबरी(नेपाळी) ह्या नावांनी सुध्दा ओळखला जातो.

पाककृती

रसगुल्ला तयार करण्यासाठी पनीर मुख्य पदार्थ आहे.जे की दुग्धालयात सहज उपलब्ध असते किंवा घरी दुध लिंबू वा तत्सम पदार्थाने फाटवून तयार करण्यात येते.

(हे पनीर जर घरी तयार केले असेल तर त्यातील आंबटपणा व पाण्याचा अंश कापडाने पिळून घ्यावा.)नंतर पनीर सैल(मऊ) करून घ्यावे.ह्याचे पाऊण ते एक इंच व्यासाचे गोळे करून त्यांवर अर्धातास ओले कापड झाकावे.

नंतर आवश्यक तेवढे पाणी व साखर घेऊन पाक तयार करण्यास ठेवावा.ह्या साखरेच्या पाकात ते गोळे उकळण्यासाठी टाकावेत.ते गोळे फुलल्यावर उकळवणे थांबवावे व रसगुल्ले थंड करून घ्या.

अशाप्रकारे रसाळ रसगुल्ले तयार!