गरबा
गरबा हा नवरात्रात सादर होणारा एक पारंपरिक नृत्यप्रकार आहे.[१] भारतातील गुजरात प्रांतात हा प्रकार शारदीय नवरात्र काळात विशेषत्वाने खेळला जातो.[२] हे नाव संस्कृतमधील दीपगर्भ या शब्दापासून तयार झाले आहे. [३]महिलांचा या नृत्यात विशेष सहभाग असतो. काहीवेळा देवीला वंदन करण्यासाठी पुरुष सुद्धा या नृत्यात सहभागी होतात.
आशय
[संपादन]महिलांच्या सर्जनशक्तीशी म्हणजेच नवनिर्मितीच्या क्षमतेशी संबंधित हा उत्सव आहे. शारदीय नवरात्रात गरबा नृत्यात मध्यभागी घडा ठेवला जातो. या मातीच्या घड्याला छिद्रे पाडली जातात आणि त्यामध्ये दिवा प्रज्वलित केला जातो. या घड्याभोवती महिला, मुली फेर धरतात आणि देवीची स्तुतीपर गीते म्हणून पारंपरिक नृत्य करतात.[४] हा घट अथवा कुंभ हा स्त्रीच्या सर्जन शक्तीचे प्रतीक मानला जातो.[५]
सार्वजनिक स्वरूप
[संपादन]गुजरातमधील पारंपरिक धार्मिक आशय असलेले गरबा नृत्य १९८० सालाच्या आसपास सार्वजनिक रूपात केले जाऊ लागले. त्यापुरी मेवाड मधील विविध मंदिरांमध्ये शारदीय नवरात्र काळात हे नृत्य केले जात असे. तरुणाईला आकर्षण वाटावे यासाठी या नृत्याचे स्वरूप आधुनिक केले गेले. पारंपरिक देवी गीतांच्या जोडीने आधुनिक गीते गायली जाऊ लागली आणि त्या तालावर गरबा नृत्य केले जाऊ लागले.[६] दांडिया घेऊन नृत्य करणे हे गरबा नृत्याचे आधुनिक व्यावसायिक रूप आहे.[७] गरबा हा कलाप्रकार देवीच्या उपासनेशी आणि मनोरंजनासाठी प्रसिद्ध झाल्याने संपूर्ण भारतभरात गुजराती आणि अन्य भारतीय नागरिक याचा दरवर्षी शारदीय नवरात्र काळात विशेष आनंद घेतात.[८]
द्रुक - श्राव्य स्वरूपात नृत्य
[संपादन]संदर्भ
[संपादन]- ^ Sharma, Monika (2014-12-03). Socio-Cultural Life of Merchants in Mughal Gujarat (इंग्रजी भाषेत). Partridge Publishing. ISBN 978-1-4828-4036-0.
- ^ Kukreti, Hemant. Bharat Ki Lok Sanskriti (हिंदी भाषेत). Prabhat Prakashan. ISBN 978-93-5266-789-5.
- ^ नवभारतटाइम्स.कॉम (2019-10-07). "सौभाग्य का नृत्य गरवा, नवरात्र में गुजरात से हरिद्वार तक झूमे श्रद्धालु". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2020-09-26 रोजी पाहिले.
- ^ Desai, Anjali H. (2007). India Guide Gujarat (इंग्रजी भाषेत). India Guide Publications. ISBN 978-0-9789517-0-2.
- ^ Music, Garland Encyclopedia of World (2013-02). The Concise Garland Encyclopedia of World Music (इंग्रजी भाषेत). Routledge. ISBN 978-1-136-09594-8.
|date=
मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य) - ^ "Navratri in Gujarat: डांडिया और गरबा के बगैर अधूरी है नवरात्रि, क्या है दोनों का धार्मिक महत्व". DNA India (हिंदी भाषेत). 2022-09-28 रोजी पाहिले.
- ^ Gellner, David (2009-09-10). Ethnic Activism and Civil Society in South Asia (इंग्रजी भाषेत). SAGE Publications India. ISBN 978-81-321-0422-3.
- ^ नवभारतटाइम्स.कॉम (2019-10-07). "सौभाग्य का नृत्य गरवा, नवरात्र में गुजरात से हरिद्वार तक झूमे श्रद्धालु". नवभारत टाइम्स (हिंदी भाषेत). 2020-09-26 रोजी पाहिले.