खय्याम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
खय्याम
जन्म नाव मोहंमद झहूर खय्याम हाश्मी
टोपणनाव खय्याम
जन्म १९२७
रहोन, पंजाब, भारत
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र संगीत
संगीत प्रकार हिंदी चित्रपटसंगीत
प्रसिद्ध चित्रपट कभी कभी (१९७६)
उमराव जान (१९८१)

खय्याम (१८ फेब्रुवारी, इ.स. १९२७) हे भारतीय संगीत दिग्दर्शक आहेत. पंजाबमध्ये जन्मलेल्या खय्याम यांचे पूर्ण नाव मोहम्मद जहूर खय्याम हाश्मी असे होते. १९५३ मध्ये अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आई जद्दनबाई यांच्या शिफारशीमुळे त्यांना ‘फूटपाथ’ हा चित्रपट मिळाला. या चित्रपटाच्या वेळी लेखक झिया सरहदी यांनी त्यांना ‘खय्याम’ या नावाने कारकिर्दीला नव्याने सुरुवात करण्याचे सुचविले.[१]

अभिनेता बनण्यासाठी मुंबईत आलेल्या जालंधरच्या खय्याम यांनी संगीतकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत आपले बस्तान बसवले. प्रारंभी खय्याम यांनी संगीतकार पं. हुस्नलाल भगतराम यांच्याकडे साहाय्यक म्हणून काम केले. त्यांनी त्यानंतरच्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पन्‍नास हिंदी चित्रपटांना संगीत दिले.

खय्याम यांचे संगीत दिग्दर्शन असलेले चित्रपट[संपादन]

 • उमराव जान
 • त्रिशूल
 • थोडीसी बेवफाई
 • नूरी
 • बाजार
 • हीर रांझा (हा खय्याम यांनी संगीत दिलेला पहिला चित्रपट)

खय्याम यांचे संगीत असलेली प्रसिद्ध गाणी[संपादन]

 • इन आंखों की मस्ती के मस्ताने हजारों है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
 • कभी कभी मेरे दिल में
 • गपुची गपुची गम गम
 • जुस्तजू जिस की थी उस को तो ना पाया हम ने (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
 • दिखाई दिए यूँ
 • दिल चीज क्या है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
 • परबतोंके पेडोंपर श्यामका बसेरा
 • मै पल दो पल का शायर हूँ
 • ये क्या जगह है दोस्तो, ये कौन सा दयार है (गीतकार - शहरयार, चित्रपट - उमराव जान)
 • हैं कली कली के लब पर


ट्रस्ट[संपादन]

 • खय्याम यांच्या पत्‍नीने - जगजीत कौर यांनी - नवोदित गायक, संगीतकार यांच्या मदतीसाठी 'खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली असून या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपती- १२ कोटी रुपये दान दिले आहेत.

पुरस्कार[संपादन]

 • उत्तरप्रदेश सरकारचा पहिला संगीतकार नौशाद अली स्मृति प्रथम पुरस्कार
 • पद्मभूषण

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ जयंत टिळक (18 फेब्रुवारी 2018). "अंदाज -ए-खय्याम". Loksatta (Marathi मजकूर). 14-03-2018 रोजी पाहिले. "प्रत्येक गाण्यावर त्या- त्या संगीतकाराची एक अमिट छाप असते."