Jump to content

नगरी संबिलान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
नगरी संबिलान
Negeri Sembilan
森美兰
نڬري سمبيلن
मलेशियाचे राज्य
ध्वज

नगरी संबिलानचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
नगरी संबिलानचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी सरेंबान
क्षेत्रफळ ६,६४५ चौ. किमी (२,५६६ चौ. मैल)
लोकसंख्या १०,१४,०००
घनता १५२.६ /चौ. किमी (३९५ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-05
संकेतस्थळ http://www.ns.gov.my/

नगरी संबिलान (भासा मलेशिया: Negeri Sembilan; चिनी: 森美兰 ; जावी लिपी: نڬري سمبيلن ; सन्मान्य नाव: दारुल खुसुस (खासा प्रदेश) ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या पश्चिम किनाऱ्यावर वसले आहे. नगरी संबिलानाच्या उत्तरेस सलांगोरक्वालालंपूर, पूर्वेस पाहांग, तर दक्षिणेस मलाक्काजोहोर ही राज्ये आहेत. सरेंबान येथे नगरी संबिलानाची प्रशासकीय राजधानी असून क्वाला पिला जिल्ह्यातील सरी मनांती येथे शाही राजधानी आहे.

नगरी संबिलान हे नाव सध्याच्या इंडोनेशियातील पश्चिम सुमात्र्यातून आलेल्या मिनांकाबाऊ लोकांनी या परिसरात सर्वप्रथम वसवलेल्या नऊ नगरांवरून पडले, असे मानले जाते. येथील स्थापत्यावरमलय भाषेच्या बोलीवर अजूनही मिनांकाबाऊ अस्तित्वाच्या खुणा आढळतात.

मलेशियाच्या संघातील अन्य राज्यांहून नगरी संबिलानाचे राजतंत्र आगळे आहे - अन्य राज्यांप्रमाणे येथे वंशपरंपरागत राजेशाही नसून सुंगई उजोंग, जलेबू, जोहोल, रंबाऊ या चार जिल्ह्यांच्या उंदांगांमधून, म्हणजे संस्थानिकांमधून, नगरी संबिलानाचा यांग दि-पर्तुआन बसार, म्हणजे अध्यक्ष, निवडला जातो.

बाह्य दुवे

[संपादन]