कलांतान
Jump to navigation
Jump to search
कालिमंतान याच्याशी गल्लत करू नका.
कलांतान Kelantan | ||
मलेशियाचे राज्य | ||
| ||
कलांतानचे मलेशिया देशामधील स्थान | ||
देश | ![]() | |
राजधानी | कोटा बारू | |
क्षेत्रफळ | १४,९२२ चौ. किमी (५,७६१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १६,३५,००० | |
घनता | १०९.६ /चौ. किमी (२८४ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | MY-03 | |
संकेतस्थळ | http://www.kelantan.gov.my/ |
कलांतान (देवनागरी लेखनभेद: केलांतान, क्लांतान; भासा मलेशिया: Kelantan; सन्मान्य नाव: दारुल नईम (वर लाभलेला प्रदेश) ;) हे मलेशियामधील एक राज्य असून द्वीपकल्पीय मलेशियाच्या ईशान्येस वसले आहे. कलांतानाच्या उत्तरेस थायलंडाच्या नरादिवात प्रांताशी भिडलेली आंतरराष्ट्रीय सीमा असून आग्नेयेस तरेंगानू, पश्चिमेस पराक, दक्षिणेस पाहांग ही मलेशियाची राज्ये आहेत. कलांतानाच्या ईशान्येस दक्षिण चीन समुद्र आहे.
कलांतान कृषिप्रधान राज्य असून तांदळाच्या मुबलक उत्पादनामुळे 'मलेशियाचे तांदळाचे कोठार' मानले जाते.
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- कलांतान शासनाचे अधिकृत संकेतस्थळ (मलय मजकूर)
- व्हर्च्युअल मलेशिया.कॉम - कलांतानावरील पान (इंग्लिश मजकूर)