पाहांग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पाहांग
Pahang
ڨهڠ
मलेशियाचे राज्य
Flag of Pahang.svg
ध्वज

पाहांगचे मलेशिया देशाच्या नकाशातील स्थान
पाहांगचे मलेशिया देशामधील स्थान
देश मलेशिया ध्वज मलेशिया
राजधानी क्वांतान
क्षेत्रफळ ३५,९६४ चौ. किमी (१३,८८६ चौ. मैल)
लोकसंख्या १५,४३,०००
घनता ४२.९ /चौ. किमी (१११ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MY-06
संकेतस्थळ http://www.pahang.gov.my/

पाहांग (देवनागरी लेखनभेद: पहांग; भासा मलेशिया: Pahang; जावी लिपी: ڨهڠ ;) हे मलेशियामधील एक राज्य असून साबासारावाक यांच्या पाठोपाठ मलेशियातील तिसरे मोठे, तर द्वीपकल्पीय मलेशियातील सर्वांत मोठे राज्य आहे. हे राज्य द्वीपकल्पीय मलेशियाच्या पूर्व किनाऱ्यावर वसले आहे. याच्या उत्तरेस कलांतान, पश्चिमेस पराक, सलांगोर, नगरी संबिलान, दक्षिणेस जोहोर व ईशान्येस तरेंगानू ही मलेशियाची राज्ये असून पूर्व किनाऱ्यास दक्षिण चीन समुद्र पसरला आहे. क्वांतान येथे पाहांगाची राजधानी आहे.

भूगोल[संपादन]

प्रामुख्याने डोंगराळ मुलूख असलेल्या पाहांगाचा २/३ हिस्सा उष्णकटिबंधीय सदाहरित वनांनी व्यापला आहे. तमन नगरा नावाने ओळखले जाणारे मलेशियातील सर्वाधिक विस्तीर्ण राष्ट्रीय उद्यान राज्याच्या उत्तरेला वसले आहे. द्वीपकल्पीय मलेशियातील सर्वोच्च शिखर गुनुंग ताहान याच राष्ट्रीय उद्यानात आहे.

पाहांगाच्या पूर्वेस दक्षिण चीन समुद्रास भिडलेली किनारपट्टी आहे. क्वांतान हे राजधानीचे शहर याच किनारपट्टीवर वसले आहे. प्रवाळ बेटांसाठी व सागरी निसर्ग पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले पुलाऊ तिओमान व अन्य बेटे पाहांगाच्या किनाऱ्यापासून समुद्रात वसलेली आहेत.

शासन, प्रशासन व राजकारण[संपादन]

पाहांग घटनात्मक राजतंत्र आहे. २६ फेब्रुवारी, इ.स. १९५९ रोजी पाहांगाची विद्यमान राज्यघटना लागू झाली. राज्यघटनेनुसार सुलतान हयातभर पाहांगाचा शासनप्रमुख असतो.

देवान उंदांगान नगरी, अर्थात राज्य विधिमंडळ, हे पाहांग प्रशासनाची वैधानिक यंत्रणा असून राज्य कार्यकारी परिषद शासन व्यवस्थेची कार्यकारी यंत्रणा असते. सुलतानाने निवडलेला मंत्री बसार, अर्थात मुख्यमंत्री, दहा जणांच्या कार्यकारी परिषदेचा प्रमुख असतो.

राजकीय दृष्ट्या पाहांगाचे खालील जिल्ह्यांमध्ये विभाजन होते : बरा, बंतोंग, ताना तिंगी कॅमेरोन, जरांतुत, क्वांतान, क्वाला लिपिस, मारान, पकान, राउब, रोंपिन व तमेर्लो

बाह्य दुवे[संपादन]