दुधगाव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

दुधगाव हे मिरज तालुक्यातील वारणा नदीकाठी वसलेले एक गाव आहे. दुधगाव हे गाव सांगली शहरापासुन २१ की.मी. अंतरावर् आहे. दुधगाव हे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. दुधगावमध्ये सर्व जाती जमातीच लोक राहतात. येथे ऊस, भुइमूग, तंबाखू, ज्वारी, बाजरी व इतर अनेक नगदी पीक घेतली जातात. वारणा नदीमुळे बारा महीने शेतीला पाणी मिळते. दुधगावात उर्दूमराठी शाळा आहेत तसेच कन्या विद्यालय आहे. येथे मुलांचे विद्यालयही आहे. दुधगावाचे आराध्य दैवत दुधेश्वर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला या देवाची पालखी निघते व महायात्रा भरते. येथे जैन धर्मीय मोठ्या प्रमाणात राहतात. गावात जीन मंदिर आहे. जीन मंदिराची वास्तु सुंदर व प्रशस्त आहे. गावात रयत शिक्षणसंस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे.