दुधगाव
?दुधगाव महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मिरज |
जिल्हा | सांगली जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
दुधगाव हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]दुधगाव हे मिरज तालुक्यातील वारणा नदीकाठी वसलेले एक गाव आहे. दुधगाव हे गाव सांगली शहरापासुन २१ किमी अंतरावर् आहे. दुधगाव हे प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेले गाव आहे. दुधगावमध्ये सर्व जाती जमातीच लोक राहतात. येथे ऊस, भुइमूग, तंबाखू, ज्वारी, बाजरी व इतर अनेक नगदी पीक घेतली जातात. वारणा नदीमुळे बारा महीने शेतीला पाणी मिळते. दुधगावात उर्दू व मराठी शाळा आहेत तसेच कन्या विद्यालय आहे. येथे मुलांचे विद्यालयही आहे. दुधगावाचे आराध्य दैवत दुधेश्वर आहे. येथे दरवर्षी महाशिवरात्रीला या देवाची पालखी निघते व महायात्रा भरते. येथे जैन धर्मीय मोठ्या प्रमाणात राहतात. गावात जीन मंदिर आहे. जीन मंदिराची वास्तु सुंदर व प्रशस्त आहे. गावात रयत शिक्षणसंस्थेच्या कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा आहे.
हवामान
[संपादन]येथील हवामान उष्ण व कोरडे आहे. येथे नोव्हेंबर ते फेब्रुवारी मध्य हा हिवाळा हंगाम असतो. हिवाळ्यात दिवसा तापमान २९ सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान १७ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. जून मध्य ते ऑक्टोबर हा पावसाळा हंगाम असतो. पावसाळ्यात दिवसा तापमान २८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २२ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते. पावसाळ्यात मध्यम प्रमाणात पाऊस पडतो. वार्षिक पर्जन्यमान ७०० मिमी पर्यंत असते. फेब्रुवारी मध्य ते जून हा उन्हाळा मोसम असतो. उन्हाळ्यात दिवसा तापमान ३८ अंश सेल्सियस पर्यंत वाढते आणि रात्री तापमान २३ अंश सेल्सियस पर्यंत खाली जाते.