Jump to content

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प

Coordinates: 20°10′0″N 79°24′0″E / 20.16667°N 79.40000°E / 20.16667; 79.40000
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ताडोबा-अंधारी या पानावरून पुनर्निर्देशित)
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प
ताडोबा राष्ट्रीय उद्यान+अंधारी अभयारण्य(१९८६)
ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील सांबर
ताडोबा राष्ट्रीय उद्यानातील सांबर
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचे ठिकाण दाखविणारा नकाशा
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पचे ठिकाण दाखविणारा नकाशा
ठिकाण चंद्रपूर जिल्हा, महाराष्ट्र, भारत
जवळचे शहर चंद्रपूर (१० किमी)
गुणक 20°10′0″N 79°24′0″E / 20.16667°N 79.40000°E / 20.16667; 79.40000
क्षेत्रफळ ६२५.४ चौरस किलोमीटर
स्थापना १९५५ (1995-Reconstitute)
नियामक मंडळ वन विभाग, महाराष्ट्र शासन, NTCA-राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण
संकेतस्थळ mahatadobatiger.com


ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प महाराष्ट्रातील एक व्याघ्र पर्यटन स्थळ असून येथे वाघांची वस्ती आहे. हा प्रकल्प हा ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे ११६.५५ कि.मी. क्षेत्र व अंधारी अभयारण्याचे ५०८.८५ किमीक्षेत्र मिळून संयुक्तपणे व्याघ्रप्रकल्पाचा गाभा क्षेत्रात मोडतो, तो गाभा क्षेत्र सुमारे ६२५ चौ कि.मी. आहे. प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ १,७२७ चौ.किमी. असून त्यातील १,१०२ चौ.किमी. हे राखीव क्षेत्र (बफर झोन) व उर्वरित ६२५ चौ.किमी. हे गाभा क्षेत्र (कोअर झोन) म्हणून ओळखले जाते.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील प्रमुख राष्ट्रीय उद्यान असून ते चंद्रपूर जिल्हयात आहे. याची स्थापना १९५५ साली जेव्हा तो मध्य प्रांताचा भाग होता, तेव्हा झाली व महाराष्ट्रातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान आहे. उद्यानात आढळणाऱ्या मगरी-सुसरी आणि गवा हे इथले मुख्य वैशिष्ट्य आहे.

नावांची व्युत्पत्ती

[संपादन]

या परिसरातील घनदाट जंगलात राहणाऱ्या तारु या सरदाराला देवत्वाचा रूप प्राप्त झाले म्हणून ताडोबा म्हणून आदिवासींद्वारे आदराने संबोधले जात असे तर अंधारी म्हणजे आंध्र नदीचा अपभ्रंशात्मक उल्लेख होय. []

वाघांची संख्या

[संपादन]

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात सुमारे ६० व बफर झोन (प्रत्यारोधी क्षेत्र)[मराठी शब्द सुचवा] यात सुमारे १५ वाघ आढळले आहेत.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कॉंझर्वेशन ट्रस्ट तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.[ संदर्भ हवा ]

सद्याचे प्रशासन

[संपादन]
  1. गाभा क्षेत्र (Core Zone)- ५ परिक्षेत्रासह ६२५ चौ.किमी
  2. Buffer Zone (प्रत्यारोधी क्षेत्र) :-वर्तुळाकार परिक्षेत्रांचा ११०१.७७ किमी परीसर

सन २०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने एका अधिसुचनेद्वारे या प्रकल्पाच्या सभोवताली संरक्षित क्षेत्र (बफर झोन) निर्माण केले आहे. एकूण ६ परिक्षेत्रात बफर झोन विभाजित आहे. या प्रकल्पालगत आणि सभोवतालचे सुमारे ११०१.७७ किमी क्षेत्र त्यात येते, ज्यामध्ये ७९ गावांचा अंतर्भाव आहे.

मानव व वन्यप्राण्यांचा संघर्ष टळावा, हा बफर क्षेत्राचा मुख्य हेतू आहे.

ईतिहास व विस्तारीकरण

[संपादन]
  • १९५५: मध्य प्रातांत राष्ट्रीय उद्यान
  • १९८६: अंधारी अभयारण्य
  • १९९५: ताडोबा उद्यानाचे व अंधारी अभयारण्याचे संयुक्तिकरण होऊन त्याचे नाव ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प झाले आहे व राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रही वाढवण्यात आले आहे. अभयारण्याचे क्षेत्रफळ ११६ किमी इतके आहे आणि इथले जंगल ५०९ किमी एवढे आहे.
  • २००८: स्वतंत्र चंद्रपूर वनवृत्तात समावेश
  • २०१२: बफर संकल्पना अस्तित्वात

जंगल सफारी

[संपादन]

आजमितीस (सप्टेंबर २०११) अभयारण्यातील रानगव्यांची संख्या १४३ आहे. गवे आणि मगरी-सुसरी येथील प्रमुख आकर्षण आहेतच, त्याचबरोबर व्याघ्रप्रकल्पामुळे वाघांचे आकर्षणही वाढले आहे. सध्या उद्यानात ५० वाघ आहेत. त्याबरोबर बिबट्या , अस्वल , जंगली कुत्री अथवा कोळसून , तरस , उदमांजर आणि विविध प्रकारच्या रानमांजरी. हरणांच्या जातीत, नीलगाय , सांबर , चितळ , भेकर, कोल्हे, चौशिंगा, ससे व खास विदर्भात आढळणारी पिसुरी नावाची हरणाची अतिशय छोटी जात येथे आढळून येते

इथे जवळजवळ १८१ जातींचे पक्षी पाहता येतात. मच्छिमार, गरुड, करकोचे, बगळे, ससाणे, रानकोंबड्या, धनेश, भृंगराज, रॉबिन गोल्डन ओरिओल, भारद्वाज, मोर हे त्यापैकी काही.

ताडोबा जंगल हे उष्णकटिबंधीय शुष्क पानझडीच्या प्रकारात मोडते. साग, बांबू, ऐन, हलई, धावडा, बिबळा, तेंदु, मोहा, खैर अशा विविध प्रकारच्या वृक्षांची या अरण्यात दाटी दिसते.

पाणी व्यवस्थापन

[संपादन]

ताडोबा, मोहर्ली व कोळसा अशा तीन वनपरिक्षेत्रात एकूण छोटे मोठे अनेक तलाव आहेत. त्यांपैकी ताडोबा, कोळसा, जामणी, पांगडी, कारवा, पिपरहेटी, बोटझरी, पिपरी, तेलीया, महालगाव, मोहर्ली, जामून झोरा, शिवणझरी, फुलझरी, आंभोरा हे महत्त्वाचे तलाव आहेत.

अंधारी नदीला ताडोबाची जीवनवाहिनी अर्थातच लाईफ लाईन ऑफ ताडोबा असे म्हणले जाते. खातोडा गेट जवळील नाला म्हणजे या नदीचे जन्मस्थान आहे. ही नदी मोहर्ली, कोळसा, मूल मार्गे अभयारण्याच्या बाहेर पडते. या नदीमुळे ताडोबातील वाघ व अन्य वन्यप्राण्यांना नवसंजीवनी मिळाली असून ही नदीच या प्रकल्पातील पाणवठ्याचे मुख्य उगमस्थान आहे. अंधारी नदीच्या प्रवाहात वाघडोह, मोहाचा खड्डा, कळंबाचा डोह, उमरीचा पाटा, तुलाराम हे पाणवठे आहेत.

या प्रकल्पातील वन्यजीवांची तहान भागविणारे अनेक छोटे मोठे नालेसुद्धा आहेत. यात उपाशा नाला, जामून झोरा, तेलीया डॅमचा प्रामुख्याने समावेश आहे.

कोसेकणार, आंबट हिरा, काटेझरी, काळा-आंबा, चिखलवाही, सांबरडोह, कासरबोडी, जामुणझोरा, आंबेडोह बंधारा, चिचघाट, आंबेगड, गिरघाट, वसंत बंधारा हेही वॉटर होल ताडोबा जंगलात आहेत.

पुस्तके

[संपादन]
  • ताडोबाच्या जंगलात (बालसाहित्य, डाॅ. अरुणा ढेरे)
  • ताडोबा : वाघांचे जंगल (अतुल धामनकर)
  • वनराजाला भेटायला ! चला जाऊ या ताडोबाला ! (चित्रमय पुस्तक, प्रकाशक - विद्या विकास पब्लिशर्स)
  • एक होती माया- अनंत सोनवणे

पर्यटक माहिती

[संपादन]

ताडोबा राष्ट्रीय उद्यानात मुख्य आकर्षण जंगल सफारी आहे. प्रशिक्षित स्थानिक मार्गदर्शकासह खुल्या टॉप जीप आणि बसेस अभ्यागतांसाठी उपलब्ध आहेत. विविध ठिकाणीही मुक्काम उपलब्ध आहे. []

कसे पोहचाल

[संपादन]

सर्वात जवळचे आंतरराष्ट्रीय विमानतळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर (उमरेड-भिसी आणि चिमूर मार्गे 140 किमी)

  • रेल्वे: चंद्रपूर (दिल्ली-चेन्नई मुख्य रेषेवर) द्वारे 45 किमी दूर असलेल्या रेल्वेद्वारे उपलब्ध आहे.

वाघांची संख्या

[संपादन]

नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील प्रमुख भागात सुमारे ६० व बफर झोन (प्रत्यारोधी क्षेत्र)[मराठी शब्द सुचवा] यात सुमारे १५ वाघ आढळले आहेत.हे सर्वेक्षण 'वाईल्ड लाईफ कॉंझर्वेशन ट्रस्ट तर्फे कॅमेरे लावून करण्यात आले.[ संदर्भ हवा ]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "संग्रहित प्रत". 2019-08-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-06-06 रोजी पाहिले.
  2. ^ http://www.amazingmaharashtra.com/2012/10/tadoba-national-park.html. Missing or empty |title= (सहाय्य)