Jump to content

नावे करणे (वाणिज्य)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(डेबिट या पानावरून पुनर्निर्देशित)

वाणिज्यात एखाद्या खात्यावरून पैसे कमी करणे म्हणजे रक्कम नावे करणे होय.

बँकेत आपल्या बचत खात्यातील पैसे जेव्हा खातेदार काढतो तेव्हा ती रक्कम खात्याच्या नावे होते. खात्यातील शिल्लक रक्कम कमी होते. कर्जाची रक्कम बँकेकडून घेतली म्हणजे आपल्या नावाचे कर्जखाते नावे होते.

पैसे नावे टाकणे म्हणजे दरवेळी शिल्लक कमीच होईल असे नाही.

वाणिज्य शाखेत खात्यांचे विविध प्रकार असतात त्या प्रमाणे 'नावे' या शब्दाचा अर्थ बदलतो

१) व्यक्तिगत खाते - जो पैसे देतो त्याचे खाते जमा होते. जो पैसे घेतो त्याचे खाते नावे होते.

२) मालमत्ता खाती - जी मालमत्ता बाहेर जाते ती खात्यावर जमा होते. जी मालमत्ता आत येते ती खात्यावर नावे होते.

३) उत्पन्न खर्चाची खाती - जे उत्पन्न असते ते जमा होते, जो खर्च असतो तो नावे होतो.