जरुळ
जरुळ (Jarul) महाराष्ट्र राज्यातील आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात एक छोटेसे खेडेगांव आहे. ते वैजापूरपासून साधारणतः ९ कि. मी. अंतरावर सारंगी नदीकिनारी वसलेले आहे.
?जरुळ महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
| |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
क्षेत्रफळ • उंची |
• ५१४ मी |
जिल्हा | औरंगाबाद |
लोकसंख्या | २,९७४ (2011) |
कोड • दूरध्वनी |
• +०२४३६ |
इतिहास
[संपादन]हे एक जुने छोटेसे खेडे असून, येथील रहिवासी राजेरजवाड्यांच्या आठवणी सांगतात. असे मानले जाते की सूर्यवंशी राजा निकमवंशीय पिढ्या येथे नांदत आहेत[ संदर्भ हवा ]. कालांतराने, मूळचे निकम हे आडनांव बदलून त्याचे मतसागर असे बनले.[ संदर्भ हवा ]
प्रशासन
[संपादन]पंचायत राज व्यवस्थेतील सर्वात मूळ घटक असलेली ग्रामपंचायत येथील प्रशासन चालवते.
ग्रामपंचायत
[संपादन]- निर्वाचित प्रमुख नाव: श्री. दिगंबर परसराम मतसागर सरपंच [ संदर्भ हवा ] - निर्वाचित ऊपप्रमुख नाव: श्री. हिराबाई भास्करराव कुहिले ऊपसरपंच[ संदर्भ हवा ]
- सामाजिक सौख्य नांदवने[ संदर्भ हवा ]
- विविध सामाजिक कार्ये पार पाडने[ संदर्भ हवा ]
- उत्सव साजरे करने[ संदर्भ हवा ]
- देवस्थानांची निगा राखने[ संदर्भ हवा ]
समाजव्यवस्था
[संपादन]खालील अनेक जातीधर्माची लोक येथे वर्षानुवर्षापासुन गुन्यागोविंदाने नांदत आहेत.[ संदर्भ हवा ]
सोसायटी
[संपादन]- कर्ज वाटपासाठी विविध विकास कार्यकारी (वि. वि. का.) सोसायटी. - सदस्य संख्या १३. चेरमन, रुस्तुम जगन मतसागर. उप-चेरमन, दिनकर कारभारी कुहिले. - कर्जांचे प्रकार: पिक कर्ज, बायोगॅस (गोबर गॅस) कर्ज, पाईपलाईन कर्ज.[ संदर्भ हवा ]
नागरी सुविधा
[संपादन]- जलपुरवठा संकुल (जलकुंभ)
- नळ परियोजना
- सरकारी दवाखाना व औषधालय (प्राथमिक आरोग्य केंद्र)
- मासिक लसीकरण योजना
- गरीब व होतकरु आदिवासी विद्यार्थ्यांकरीता वसतीगृह
- बस स्थानक
- व्यापारी संकुल
- गुरांचा (जनावरांचा) दवाखाना
उद्योगधंदे
[संपादन]महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाने येथे नवीन औद्यौगिक वसाहत निर्माण करण्याचे काम हाती घेतले असून, काही छोटे प्रकल्प येथे होऊ घातले आहेत [१] Archived 2011-09-28 at the Wayback Machine..
दळणवळण
[संपादन]येथील सगळ्यात जवळचे रेल्वे स्थानक रोटेगाव आहे. हे उत्तर मध्य रेल्वेवर आहे. औरंगाबाद ते मुंबई हा राज्य महामार्ग येथुन पुढे नासिककडे जातो व त्याची दुसरी शाखा शिर्डी या पौराणिक शहराकडे जाते.
- राज्यमहामार्गाला जोडणारा बारामाही डांबरी रस्ता
- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व्यवस्था
काही महत्त्वाची वैशिष्ट्ये -
- भरभराटीचा शेती व्यवसाय[ संदर्भ हवा ]
- लघु पाटबंधारे प्रकल्प[ संदर्भ हवा ]
- ईतर कोल्हापुर पद्धतीचे बंधारे[ संदर्भ हवा ]
- रोटेगांव रेल्वे स्थानक[ संदर्भ हवा ]
- महाराष्ट्र औद्यौगिक विकास महामंडळाची औद्यौगिक वसाहत
- राज्य महामार्ग
- शिर्डी - साई बाबा मंदिरला जाण्यासाठीच्या प्रवासादरम्यान विसावा
शिक्षण संस्था
[संपादन]मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ यांची ईयत्ता दहावीपर्यंत शाळा येथे आहे. तसेच दहावीच्या परिक्षांचे केंद्रही येथे आहे. येथे तीन ठिकाणी वस्तीशाळा असुन या सर्व शाखांचे निकाल समाधानकारक लागत आहेत.
प्रसिद्ध व्यक्ति
[संपादन][ संदर्भ हवा ]
- भाऊराव भिमाजी पाटील मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- रंगनाथ रामचंद्र मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- शिवराम आश्राजी मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- रावसाहेब आबाजी मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- भागाजी चंद्रभान मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- दामुजी मुरलीधर मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- बाबुराव त्र्यंबक मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- सखाराम शिवराम मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- मुक्ताजी सखाहरी मतसागर (स्वातंत्र्य सेनानी)
- वामन लक्ष्मन राऊत (स्वातंत्र्य सेनानी)
- अस्माजी किसन गायके (स्वातंत्र्य सेनानी)
- विश्वनाथ भागाजी परदेसी (स्वातंत्र्य सेनानी)
हैदराबाद मुक्तिसंग्राममध्ये सहभागी स्वातंत्र्य सैनिक.