लोहार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
महाराष्ट्रातील लोहार
ऐरणीवर लोहारकाम करणारा चेक प्रजासत्ताकामधील लोहार (इ.स. २०१०)
ऐरणीवर लोहारकाम करणारा भारतातील लोहार
महाराष्ट्रातील लोहाराने बनवलेले कोयते

लोहार (इंग्लिश: Blacksmith, ब्लॅकस्मिथ) म्हणजे लोखंडाच्या वस्तू घडवणारे कारागीर होत. तप्त लोखंडाला ऐरणीवर ठोकून ठोकून लोहार वस्तूस आकार देतात. साधारणपणे, ते शेतीची / बागकामाची अवजारे उदा. विळे, कोयते, खुरपी, बांधकामासाठी लागणारी साधने, जाळ्या, सळया, भांडी, प्राण्यांच्या खुरांना ठोकायचे नाल, शस्त्रे, बैलगाडीच्या चाकाना लोखंडी धाव, पाण्याच्या मोटी, नांगराचे फाळ, कुदळी, टिकाव, पहारी, घमेली, खिडक्यांचे गज इत्यादी लोखंडी वस्तू बनवतात.

लोकजीवन[संपादन]

कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा भागात हा समाज पसरलेला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई ह्या शहरात सुद्धा तो विखुरलेला आहे. मुंबईत लोहार चाळ प्रसिद्ध आहे. लोहार समाजात लोहार, गाडी लोहार, पांचाळ, नालबंदी, घिसाडी ह्या पोटजाती आहेत. कोकणात मानवाचार्य लोहार, विदर्भात मनुपांचाळ, मराठवाड्यात मनुलोहार आणि इतर ठिकाणी गाडीलोहार राहतात. समाजाच्या चालीरिती, आहार, राहणीमान ह्या तेथील स्थानिक पद्धती प्रमाणे असतात. लोखंडी भांडी तयार करण्याच्या व्यवसायात घिसाडी समाज आहे. नव्या पिढीतील लोक शहरात स्थलांतरित झाले. शहरातील ही पिढी फॅब्रिकेशन, हार्डवेर, फर्निचर, गॅरेज व्यवसाय करतात.

लोहारकामास लागणारी पारंपरिक हत्यारे/अवजारे[संपादन]

  • छिन्नी - वेगवेगळ्या आकाराच्या छिन्न्या, त्याचा वापर लोखंड तोडण्यासाठी (छिन्न करण्यासाठी) होतो.
  • हातोडी - ठोकण्यासाठी
  • घण - जेव्हा जोराने ठोक हवा असेल तेव्हा
  • ऐरण - ज्यावर तापलेले लोखंड ठेवून व त्यास हातोड्याने ठोकून हवा तसा आकार देता येतो.
  • भाता - भट्टीला दाबाने हवा पुरविण्यासाठी आवश्यक
  • भट्टी - दगडी कोळसा हे इंधन वापरून लोखंडास गरम करण्याची जागा.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • "सी युवर हिस्टरी.कॉम - लोहार" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)