चर्चा:नागद्वार
Untitled
[संपादन]या स्थनाचे जिओग्राफिक लोकेशन आणि धार्मिक स्थानाची, देवतेची नेमकी ओळख देणारा पहिला परिच्छेद हवा. नागद्वार हे भारताच्या मध्य प्रदेश राज्यात पचमढी जवळ असलेले एक ठिकाण आहे.
==वर्णन==
{{यात्रांचे वर्णन वस्तुतः अविश्वकोशिय ठरते पण खालील परिच्छेदात काही उल्लेखनीयता भाग दिसतो. विभागाचे शिर्षक बदलून यात्रेचे स्वरूप करावे}}
'येथे दरवर्षी गुरुपौर्णिमा ते नागपंचमी दरम्यान यात्रा असते.यात्रेतील ठिकाणे सातपुडा पर्वतात असलेल्या घनदाट जंगलात आहेत.पचमढी जवळ असलेल्या धूपगड जवळुन या यात्रेचा मार्ग सुरू होतो. भजेगिरी,काजळी,सखारामबाबा घंटा,पदमशेष,पश्चिमद्वार, स्वर्गद्वार, चिंतामणि,नागिणी-पद्मिनी,गुप्तगंगा,चित्रशाळामाता,दुधाळा मार्गे भजेगिरी परत असा या यात्रेचा साधारणतः मार्ग असतो.काजळी-निशाणगड-काजळी, व काजळी-राजागिरी-काजळी असे करून निशाणगड व राजागिरी या दोन ठिकाणी जाता येते.चिंतामणिहुन गंगावनशेष, गुलालशेष,डोमनशेष, हल्दीशेष,व मग चित्रशाळामाता असाही एक मार्ग आहे.तसेच, चित्रशाळामाताहुन नंदीगडला जाउन परत तेथेच येउन मग दुधाळा असा यात्राक्रमही कोणी करतात.
या यात्रेचा मार्ग निव्वळ जंगलातुन आहे. येथे मार्गात बांबूचे जंगल आहे.तसेच विपूल वनसंपदा आहे.वेगवेगळ्या प्रकारच्या व जातीच्या वनस्पतींनी हे जंगल परिपूर्ण आहे.[ संदर्भ हवा ] या रस्त्यावर पूर्वी अनेक ठिकाणी साप,नाग दिसत असत.पण सध्या यात्रेकरुंच्या वाढत्या संख्येमुळे हे प्रमाण घटले आहे.साचा:वार्तांकन वाक्य पूर्ण वगळा. या संपूर्ण यात्रेदरम्यान सातपुड्यातील अनेक पहाड चढावे व उतरावे लागतात. कठिण चढणीच्या जागी लोखंडी शिड्या लावण्यात आलेल्या आहेत.धोक्याचे ठिकाणी कठडे लावण्यात आलेले आहेत.तसेच अनेक छोट्या नद्या कधी-कधी दोरांच्या सहाय्याने छातीभर पाण्यातुन पार कराव्या लागतात.फार पूर्वीच्या काळात,वेलींच्या सहाय्याने दोर बनवुन चढण चढावी लागत असे. [ संदर्भ हवा ] ही यात्रा पावसाळ्यात येत असल्यामुळे भुरभुर वा कधी धो-धो पावसातुनच मार्गक्रमण करावे लागते केले जाते. पाऊस नसल्यास मग ही यात्रा फारच कठिण होते..साचा:संपादकाचा स्वयं निष्कर्ष प्रदर्शीत करणारे वार्तांकन स्विकारायचे का या बद्दल चर्चेची आवश्यकता विदर्भ व मध्य प्रदेशातल्या अनेक गावातुन येथे भक्त ही यात्रा करण्यास येतात.या यात्रेस सुमारे १ लाख माणसे येतात असा अंदाज आहे.[ संदर्भ हवा ]
या संपूर्ण यात्रेदरम्यान कोरकू आदिवासींची भूमिका श्रेष्ठ आहे.ते यात्रेकरुंचे ३०-३५ किलोग्राम वजनाचे ओझे घेउन पहाड पार करतात.त्यांचेशिवाय ही यात्रा तशी अवघडच आहे.साचा:संदर्भा शिवाय, व्यक्तीगत निषकर्ष अविश्वकोशिय "सल्ला उद्देश' यातुन मिळणार्या उत्पन्नातुन ते मग उरलेले वर्ष काढतात.या यात्रेस 'छोटी अमरनाथ यात्रा' वा 'गरीबांची अमरनाथ यात्रा' असेही म्हणतात.[ संदर्भ हवा ]
नागद्वार ही यात्रा नागाशी संबंधित आहे. नमुद सर्व ठिकाणी देवता ही नागच आहे.येथील ठिकाणांची नावेही नागाशीच संबंधित आहेत. साचा:वाक्य लेखाच्या सुरवातीस जावयास हवे? ही यात्रा मानवी शरीराचा कस बघणारी यात्रा आहे.सध्या पायी चालण्याची सवय राहीलेली नसल्यामुळे, चालुन चालुन तो यात्रेकरु इतका थकतो की त्यास अंगावरच्या कपड्याचेही ओझे वाटु लागते.सोबत घेतलेले पाणि फेकुन द्यावेसे वाटते.मार्गातील खडक,चिखल व शेवाळलेल्या खडकांमुळे तयार झालेली घसरण यामुळे तो फार थकुन जातो. साचा:अविश्वकोशिय वार्तांकन, व्यक्तीगत निषकर्ष
हल्दीशेष व गुलालशेष येथे गुहा आहेत. तेथे सरपटत जावे लागते.हल्दीशेष गुहेत जाउन आल्यावर माणुस हळदीसारखा पिवळा होतो तर गुलालशेषमधे जाउन आलेला गुलालासारखा गुलाबी.साचा:सम्दर्भ हवा किंवा असे का ? हवे चालुन थकलेला यात्रेकरु मधे थोडा विश्राम करतो, कापुर जाळतो, त्याची आरती घेतो व मग परत नव्या जोमाने चालु लागतो.साचा:संदर्भ नसेल तर अविश्व्कोशिय वार्तांकन अनेक लोकं धनगवरी या मध्यप्रदेशातील गावापासुन पायी काजळी या गावास येतात व ही यात्रा पूर्ण करतात.
मार्गात अनेक समाजसेवी संस्था यात्रेकरुंसाठी चहा, नाश्ता, जेवण आदींची निःशुल्क व्यवस्था करतात.यासाठी लागणारे सर्व साहित्य कोरकू आदिवासीच वाहुन नेतात.साचा:संदर्भ नसेल तर अविश्व्कोशिय वार्तांकन
==पूर्वतयारी==
{{असा विभाग केवळ यात्रा भरवणारे आणि किंवा शासन काय पूर्वतयारी करतात येथपर्यंत मर्यादित ठेवावा. पूर्वतयारी काय करावी असा सल्ला अविश्व्कोशिय ठरेल आणि असा सल्ला नवागतांकडून या विभागात जोडला जाणार नाही याकरिता दक्षतेची आवश्यकता}} मध्य प्रदेश वन खाते व सेनादल यात्रेपूर्वी झाडांच्या फांद्या कापून व आवश्यक तेथे भरण घालुन या यात्रेचा मार्ग बनवितात.वन्य जीवांना पळविण्यास फटाके फोडतात. परंतु वनकायद्यामुळे येथे आवश्यक सोयी करण्यास अडचणी आहेत.साचा:संदर्भ नसेल तर अविश्व्कोशिय वार्तांकन
माहितगार १३:५७, १२ ऑगस्ट २०१० (UTC)