पचमढी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:पचमढी.jpg
पचमढीतील पांडव गुहा

भारताच्या मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा जिल्ह्यातील एक पर्वतावरील पर्यटनस्थळ. हे थंड हवेचे ठिकाण आहे.या ठिकाणाहुनच महादेव,छोटा महादेव नागद्वार या स्थळांस जाता येते. हे ठिकाण सातपुडापर्वतश्रेणीतील असून पूर्वी इंग्रजांची येथे छावणी होती. तेथील काही प्रेक्षणीय स्थळे:

 • रजत धबधबा
 • बी धबधबा
 • पांडव गुहा
 • मोठा महादेव
 • गुप्त महादेव
 • चौरागड (शिवरात्रीमध्ये येथे मोठी यात्रा भरते)
 • धुपगड (मध्य प्रदेशातीलसातपुडयाचे सर्वांत उंच शिखर)
 • हांडी खोह (खोल खाई)
 • अप्सरा धबधबा
 • जटाशंकर
 • डचेस धबधबा
 • पचमढीचे डोंगर
 • माउंट रोजा

या प्रमुख ठिकाणांशिवाय येथे अनेक पाहण्यासारखी ठिकाणे आहेत.

कसे जावे[संपादन]

रेल्वेने: मुंबई-ईटारसी-हावरा या रेल्वेमार्गावरपिपरिया स्टेशन हे पचमढीहुन सर्वांत जवळ्चे आहे.

रस्ता: पचमढी भोपाळ, इंदौर, नागपूर, होशंगाबाद, छिंदवाडापिपरिया हुन सरळ जोडल्या गेले आहे.पिपरियाहुन टॅक्सी सेवा उपलब्ध आहे.

हवाई मार्ग:भोपाळ विमानतळाहुन दिल्ली, ग्वालियर, इंदौर, मुंबई, रायपुर आणि जबलपूर या भारतातील प्रमुख शहरात जाण्यासाठी विमानसेवा आहे.