गिरीश कर्नाड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(गिरिश कर्नाड या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
गिरीश कर्नाड
Karnad.jpg
जन्म मे १९, इ.स. १९३८
माथेरान, महाराष्ट्र
मृत्यू जून १०, इ.स.२०१९
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
कार्यक्षेत्र नाटककार, चित्रपट दिग्दर्शक, अभिनेता
साहित्य प्रकार नाटक, कविता
प्रसिद्ध साहित्यकृती नाटके: तुघलक, हयवदन, नागमंडल
पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार (१९९८)

गिरीश कर्नाड (जन्म : १९ मे १९३८; मृत्यू : १० जून २०१९), हे कन्नड भाषेतील आधुनिक भारतीय नाटककार, दिग्दर्शक आणि कलाकार होते. त्यांचा जन्म मे १९, १९३८ रोजी माथेरान येथील एका कोकणी कुटुंबात झाला. गिरीश कार्नाडांच्या आई कृष्णाबाई मानकीकर या विधवा होत्या. त्यांना एक अपत्य होते. नर्स म्हणून ट्रेनींग घेत असताना त्यांची ओळख बॉम्बे मेडिकल सर्विसेस मधल्या डॉ. रघुनाथ कर्नाड यांच्याबरोबर झाली. विधवा पुनर्विवाह च्या त्यावेळच्या पूर्वग्रहांमुळे त्यांना पाच वर्षे लग्न करता आले नाही. त्यानंतर आर्य समाजाच्या रितीनुसार त्यांनी लग्न केले. गिरीश कर्नाड हे चार पैकी तिसरे अपत्य होत.

शिक्षण[संपादन]

कर्नाडांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. कर्नाड त्यावेळेस बालगंधर्व, किर्लोस्कर या नाटक कंपन्यांच्या नाटकांचे त्यांच्यावर संस्कार झाले. त्यांचे उच्च शिक्षण लिंकन कॉलेज, ऑक्सफर्ड येथे झाले. कर्नाड हे शिकागो विद्यापीठाचे हंगामी प्राध्यापक आणि फुलब्राइट विद्वान होते. त्यांनी नाट्यक्षेत्रात स्वतःला झोकून दिले. त्यांच्या नाटकांनी भारतात व परदेशांत बरेच नाव कमावले.[१]गिरीश कार्नाड कर्नाटक आर्टस् महाविद्यालयातून गणित आणि संख्याशास्त्र या विषयातून बी.ए. ची पदवी प्रथम श्रेणीत बी.ए. उत्तीर्ण झाले. त्यानंतर इंग्लंड येथे तत्वज्ञान, राज्यशास्त्र आणि अर्थशात्रमध्ये पदवीत्तर शिक्षण पूर्ण केले. १९६२ मध्ये त्यांची ऑक्सफर्ड  युनिअन चे अध्यक्ष म्हणून निवड झाली.  

चित्रपट[संपादन]

गिरीश कर्नाड यांचे चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण वंशवृक्ष या चित्रपटाद्वारे झाले. हा चित्रपट एस्‌. एल्‌. भैरप्पा यांच्या कन्नड कादंबरीवर आधारित होता. या चित्रपटाला अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. कर्नाड यांनी संस्कार या प्रायोगिक चित्रपटातही काम केले होते.[२]

नंतर कर्नाड यांनी बऱ्याच कन्नड आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले. त्यांचे तब्बलियू नीनादे मगनेओंदनोंदू कालादल्ली हे काही प्रसिद्ध कन्नड चित्रपट, आणि उत्सव आणि गोधुली हे हिंदी चित्रपट आहेत.

गिरीश कर्नाड यांचा कानुरू हेग्गदिती हा, कुवेंपू यांच्या कादंबरीवर आधारित कन्नड चित्रपटही नावाजला गेला आहे.

गिरीश कर्नाड हे १९७६-७८ मध्ये कर्नाटक साहित्य अकादमीचे अध्यक्ष होते आणि १९८८-९३ मध्ये नाटक अकादमीचे सभापती होते. त्यांना त्यांच्या नाट्यक्षेत्रातील योगदानासाठी कर्नाटक विद्यापीठाने डॉक्टरेटने आणि युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियाने डी.लिट. या पदवीने सन्मानित केले आहे.[३]

गिरीश कर्नाड यांचे चित्रपट[संपादन]

 • इक्बाल (हिंदी, अभिनय)
 • उत्सव (हिंदी भाषेत, दिग्दर्शन)
 • उंबरठा (मराठी, अभिनय)
 • एक था टायगर (हिंदी, अभिनय)
 • ओंदनोंदू कालादल्ली (कानडी, दिग्दर्शन)
 • कनक पुरंदर (कानडी)
 • काडू (कानडी, दिग्दर्शन))
 • कानुरू हेग्गदिती (कानडी)
 • गोधुलि (हिंदी, पटकथा)
 • टायगर जिंदा है (हिंदी, भूमिका-राॅ चीफ)
 • तब्बलियू नीनादे मगने (कानडी)
 • निशांत (हिंदी, अभिनय)
 • पुकार (हिंदी, अभिनय)
 • मंथन (हिंदी, अभिनय(
 • लाईफ गोज ऑन (हिंदी, अभिनय)
 • वंशवृक्ष (कानडी, दिग्दर्शन)
 • सरगम (मराठी, अभिनय) (अप्रकाशित)
 • संस्कार (हिंदी, अभिनय)

कर्नाड यांनी दिग्दर्शित केलेली/लिहिलेली नाटके[संपादन]

कर्नाड हे त्यांच्या नाटकांसाठी सर्वात जास्त प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बहुतेक कानडी नाटकांची मराठी रूपांतरे झाली आहेत. त्यांनी कन्नड भाषेमध्ये लिहलेल्या नाटकाचे भाषांतर इंग्रजी आणि काही इतर भारतीय भाषेमध्ये झाले.

 • अग्नी मत्तू मळे (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवाद, 'अग्नी आणि पाऊस', अनुवादक - सरोज देशपांडे)
 • काटेसावरी (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)
 • टिपू सुलतानचे स्वप्न (मूळ कानडी, मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
 • तलेदंड (नाटक, मूळ कानडी, मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
 • तुघलक (कानडीत लिहिलेले) (लेखन आणि दिग्दर्शन)
 • नागमंडल (मूळ कानडी नाटक, लेखन व दिग्दर्शन; मराठी अनुवादक - उमा कुलकर्णी)
 • बलि (मूळ कानडी नाटक, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)
 • भंगलेले बिंब पुष्पसाज (मूळ कानडी नाटक , मराठी अनुवाद - सरोज देशपांडे)
 • ययाती (नाटक, मूळ कानडी, मराठीत अनुवाद श्री.र. भिडे आणि शिवाय उमा कुलकर्णी)
 • हयवदन (नाटक, मूळ कानडी,लेखन व दिग्दर्शन, मराठी अनुवादक - सरोज देशपांडे)[४]

गिरीश कर्नाड यांना मिळालेले सन्मान व पुरस्कार[संपादन]

आत्मचरित्र[संपादन]

गिरीश कर्नाड यांनी ’आडाडता आयुष्य’ (खेळता खेळता आयुष्य) या नावाने कानडी भाषेत आत्मचरित्र लिहिले होते. त्याचे उमा कुलकर्णी यांनी, ’घडले कसे’ या नावाने केलेले मराठी भाषांतर ’राजहंस प्रकाशना’ने छापून प्रसिद्ध केले आहे. त्यातले कथानक आई-वडिलांचा वादग्रस्त विवाह या घटनेपासून सुरू होऊन स्वतःच्या लग्नापाशी थांबते.[५]

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]

 1. ^ "पारंपर‍िक तरीके से नहीं हुआ ग‍िरीश कर्नाड का अंत‍िम संस्कार! - Entertainment Gallery AajTak". aajtak.intoday.in (hi मजकूर). 2019-06-11 रोजी पाहिले. 
 2. ^ vineshkumar.dixit (2019-06-10). "अभिनेता गिरीश कर्नाड का 81 की उम्र में निधन, शिकागो से प्रोफेसर की नौकरी छोड़कर सिनेमा में आए थे". Dainik Bhaskar (hi मजकूर). 2019-06-11 रोजी पाहिले. 
 3. ^ क़ुरैशी, इमरान (2019-06-11). "जब 'मैं भी शहरी नक्सल' का बोर्ड उठाकर चले थे कर्नाड" (en-GB मजकूर). 2019-06-11 रोजी पाहिले. 
 4. ^ "Girish Karnad Death: गिरीश कर्नाड का निधन: गिरीश कर्नाड के जाने से भारतीय कला-संसार का एक बड़ा हिस्सा रिक्त हो गया". Navbharat Times (hi मजकूर). 2019-06-10. 2019-06-11 रोजी पाहिले. 
 5. ^ "मशहूर एक्टर गिरीश कर्नाड का निधन, लंबे समय से थे बीमार". NDTVIndia. 2019-06-11 रोजी पाहिले.