परिचारिका
डॉक्टर्सनी सांगितलेली उपाययोजना परिचारिका राबवत असतात. सर्वसाधारणपणे सरकारी, निमसरकारी रुग्णालये, खाजगी प्रसूतिगृहे, नर्सिंग होम्स व पंचतारांकित सुपर स्पेशालिटी इस्पितळे या सर्व आस्थापनांमध्ये रुग्णाच्या सतत संपर्कात असणारी व्यक्ती म्हणजे परिचारिका. डॉक्टर्स आणि रुग्ण यांच्यातील परिचारिका एक महत्त्वाचा दुवा असतात.
भारत
[संपादन]महर्षी अण्णासाहेब कर्वे यांच्या प्रेरणेने इ.स. १९५२ मध्ये एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठांतर्गत लीलाबाई ठाकरसी कॉलेज ऑफ नर्सिगची स्थापना झाली. परिचारिका ही संकल्पना इतर पाश्चात्त्य कल्पनांबरोबर आपल्या देशात आली असावी असे मानले जाते. भारतात परिचारिकांना मोठी मागणी आहे.
भारता बाहेर
[संपादन]उत्तम प्रशिक्षित परिचारिकांना भारताबाहेरही चांगली मागणी असते. परदेशी जाणाऱ्या बहुतेक परिचारिकांमध्ये केरळी आणि इतर दक्षिण भारतीय परिचारिकांची संख्या जास्त आहे. भारतीय परिचारिकांच्या दृष्टीने ब्रिटन आणि युरोपियन देशांत त्यांना अधिक वाव आहे. मात्र यासाठी त्यांना स्थानिक देशातील परीक्षा द्यावी लागते. उदा. ब्रिटनमध्ये सर्व परिचारिकांना परीक्षा द्यावी लागते.
परिचर्या परिषद
[संपादन]परिचर्या परिषद ही परिचारिकांची प्रमाणीकरण व नोंदणी करणारी भारतातील मानद संस्था आहे. ही संस्था पुढील कार्ये करते
- परिचारिकांची नोंदणी करणे.
- परिचारिकांच्या वागणुकीसंबंधी नियमावली करणे.
- परिचारिकांना गैरवर्तणुकीबद्दल ताकीद देणे व जरूर पडल्यास त्यांची नोंदणी रद्द करणे.
- परिचारिकांच्या कोसेर्सची आखणी करणे, अशा अभ्यासक्रमांना मान्यता देणे व या संबंधीच्या परीक्षा घेणे.
- परिचारिका अभ्यासक्रमांविषयी पुस्तके प्रसिद्ध करणे, पदवी व पदविका देणे, विविध बक्षिसे व शिष्यवृत्त्या देणे.
- परिचारिकांचे शिक्षण देणाऱ्या संस्थांना मान्यता देणे व त्यांची वेळोवेळी तपासणी करणे.
- सरकारी मान्यतेनुसार देणग्या स्वीकारणे.