किंताना रो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किंताना रो
Quintana Roo
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

किंताना रोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
किंताना रोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी चेतुमल
सर्वात मोठे शहर कान्कुन
क्षेत्रफळ ४२,३६१ चौ. किमी (१६,३५६ चौ. मैल)
लोकसंख्या १३,२५,५७८
घनता ३१ /चौ. किमी (८० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-ROO
संकेतस्थळ http://www.qroo.gob.mx

किंताना रो (संपूर्ण नाव:किंताना रोचे स्वतंत्र व सार्वभौम राज्य; स्पॅनिश: Estado Libre y Soberano de Quintana Roo) हे मेक्सिकोच्या पूर्व भागातील एक राज्य आहे. युकातान द्वीपकल्पावर वसलेल्या किंताना रोच्या उत्तर व पूर्वेस कॅरिबियन समुद्र व दक्षिणेस बेलिझ तर इतर दिशांना मेक्सिकोची इतर राज्ये आहेत. चेतुमल ही किंताना रोची राजधानी तर जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ कान्कुन हे येथील सर्वात मोठे शहर आहे.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थान यादीत नोंद असणाऱ्या किंताना रोमध्ये माया संस्कृतीमधील अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत.

इतिहास[संपादन]

किंताना रो राज्य युकातानचा भाग आहे. स्पॅनिशांनी या प्रदेशात सतराव्या शतकापासून वस्ती केली होती. १८४० च्या सुमारास येथील मायांनी विदेशी लोकांना येथून हाकलून लावले व स्वतंत्र चान सांता क्रुझ देशाची स्थापना केली. याची राजधानी फेलिपे कारियो पुएर्तेजवळ होती.

नोव्हेंबर १२, इ.स. १९०२ रोजी मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष पोर्फिरियो दियाझने या प्रदेशाला मेक्सिकोमध्ये सामावून घेतले व त्यास आंद्रेस किंताना रोचे नाव दिले. १९१० च्या शतकात मेक्सिकोने उरल्यासुरल्या मायांचा पाडाव केला व हा प्रदेश पूर्णपणे मेक्सिकोच्या आधिपत्याखाली आणला. ऑक्टोबर ८, इ.स. १९७४ रोजी किंताना रो मेक्सिकोचे राज्य झाले. किंताना रो मेक्सिकोचे सगळ्यात नवीन राज्य आहे.

भूगोल[संपादन]

मेक्सिकोच्या आग्नेय भागात ४२,३६१ चौरस किमी क्षेत्रफळावर वसलेले हे राज्य आकाराने देशातील १९व्या क्रमांकाचे मोठे आहे.

पर्यटनस्थळे[संपादन]

कान्कुन
 
कोझुमेल बेट
एल कास्तियो
एल कास्तियो  

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: