ओलाफ शोल्त्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओलाफ शोल्त्स
Olaf Scholz 2021-12-07 Unterzeichnung des Koalitionsvertrages der 20. Wahlperiode des Bundestages (cropped for ITN) (cropped).jpg

जर्मनीचा चान्सेलर
विद्यमान
पदग्रहण
८ डिसेंबर २०२१
राष्ट्राध्यक्ष फ्रांक-वाल्टर श्टाईनमायर
चान्सेलर आंगेला मेर्कल
मागील आंगेला मेर्कल

जर्मनीचा उप-चान्सेलर
कार्यकाळ
१४ मार्च २०१८ – ८ डिसेंबर २०२१

कार्यकाळ
७ मार्च २०११ – १३ मार्च २०१८

जन्म १४ जून, १९५८ (1958-06-14) (वय: ६४)
ओस्नाब्रुक, नीडरजाक्सन, पश्चिम जर्मनी
राजकीय पक्ष जर्मनीचा सामाजिक लोकशाहीवादी पक्ष
धर्म लुथरन
सही ओलाफ शोल्त्सयांची सही

ओलाफ शोल्त्स (जर्मन: Olaf Scholz; १४ जून १९५८) हा जर्मनी देशामधील एक राजकारणी, सोशल डेमोक्रॅटिक पार्टी पक्षाचा नेता व जर्मनीचा विद्यमान चान्सेलर आहे. डिसेंबर २०२१ पासून चान्सेलरपदावर असलेला शोल्त्स २०१८ ते २०२१ दरम्यान आंगेला मेर्कलच्या मंत्रीमंडळात उप-चान्सेलर व अर्थमंत्री होता. त्याअगोदर शोल्त्स २०११ ते २०१८ दरम्यान हांबुर्ग शहराचा महापौर होता.

पेशाने वकील असलेला शोल्त्स १९७५ सालापासून जर्मनीच्या सामाजिक लोकशाहीवादी पक्षाचा सदस्य असून त्याने हांबुर्ग विद्यापीठातून कायद्याचे शिक्षण घेतले. १९९८ साली तो पहिल्यांदा जर्मन संसद बुंडेश्टागवर निवडून आला. तेव्हापासून २०११ सालापर्यंत शोल्त्स संसदेचा सदस्य होता. २०१७ मधील जर्मन संसद निवडणुकीनंतर बनलेल्या आघाडी सरकारमध्ये शोल्त्सला अर्थमंत्रीपदाचे खाते देण्यात आले, त्याचबरोबर तो उप-चान्सेलर देखील बनला.

२०२१ मधील संसद निवडणुकीत शोल्त्सच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टीने ७३६ पैकी २०६ जागांवर विजय मिळवल्यानंतर इतर काही पक्षांसोबत युती करून सरकार स्थापनेचा दावा केला. ८ डिसेंबर २०२१ रोजी शोल्त्सने जर्मनीच्या चान्सेलरपदाची शपथ घेतली.

हे सुद्धा पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: