Jump to content

हृता दुर्गुळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ऋता दुर्गुळे-शाह या पानावरून पुनर्निर्देशित)
हृता दुर्गुळे
जन्म हृता दिलीप दुर्गुळे
१२ सप्टेंबर, १९९३ (1993-09-12) (वय: ३१)
रत्नागिरी, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारत भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
कारकीर्दीचा काळ २०१२ - चालू
भाषा मराठी
प्रमुख नाटके दादा एक गुड न्यूझ आहे
प्रमुख टीव्ही कार्यक्रम फुलपाखरू, मन उडू उडू झालं
वडील दिलीप दुर्गुळे
पती
प्रतीक शाह (ल. २०२२)

हृता दुर्गुळे (१२ सप्टेंबर १९९३ -) ही एक मराठी अभिनेत्री आहे.[] हृता फुलपाखरू मालिकेमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली.[] तिने स्टार प्रवाहच्या दुर्वा (२०१३) मधून दूरचित्रवाणीमध्ये पदार्पण केले. तिने अनन्या मराठी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. झी युवाच्या फुलपाखरूमधील तिच्या वैदेहीच्या भूमिकेमुळे ती प्रसिद्ध झाली. २०२१ मध्ये तिने सोनी मराठीचा सिंगिंग वास्तव प्रदर्षणी सिंगिंग स्टार कार्यक्रमाचे संचालन केले होते. सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दीपिका देशपांडेची मुख्य भूमिका साकारत आहे.[]

प्रारंभिक जीवन

[संपादन]

हृताचा[] जन्म १२ सप्टेंबर १९९३ रोजी झाला. ती मूळची रत्‍नागिरीची आहे पण ती मुंबईत लहानाची मोठी झाली आणि तिने रामनारायण रुईया कॉलेज, माटुंगा, मुंबई येथून शिक्षण पूर्ण केले. सध्या ती ठाण्यात राहते.[]

वैयक्तिक जीवन

[संपादन]

हृताने दूरचित्रवाहिनी आणि चित्रपट दिग्दर्शक तथा तिचा मित्र असलेल्या प्रतीक शाहसोबत लग्न केले.[][]

कारकीर्द

[संपादन]

हृता हिने स्टार प्रवाह वाहिनीवरील दुर्वा या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले.[] २०१७ साली हृताने फुलपाखरू मालिकेतून आपली ओळख निर्माण केली.[] ती आता 'दादा, एक गुड न्यूझ आहे' हे नाटक रंगभूमी वर करत आहे.[ संदर्भ हवा ]

ती सुव्रत जोशीसोबत ड्युएट नावाच्या एका नवीन वेब सीरिजचा देखील एक भाग आहे. ड्युएट अजून रिलीज व्हायचे आहे.[१०] २०२१ मध्ये ती टाइमपास ३ या मराठी चित्रपटात होती.[११] तसेच सध्या ती झी मराठीवरील मन उडू उडू झालं या मालिकेत दीपिका देशपांडेची भूमिका साकारत आहे.

सामाजिक छबी

[संपादन]

२०१९ मध्ये तिचे मराठी दूरचित्रवाणीमधील सर्वात आकर्षक महिला म्हणून वर्णन केले गेले. टाइम्स ऑफ इंडियाच्या मराठी दूरचित्रवाणी २०१८ मधील टॉप १५ सर्वात आकर्षक महिलांमध्ये तिला प्रथम क्रमांक मिळाला होता आणि टाइम्स ऑफ इंडियाच्या २०२० मध्ये तिला दुसरा क्रमांक मिळाला होता. ती सर्वात लोकप्रिय मराठी दूचित्रवाहिनी अभिनेत्रींपैकी एक आहे.[१२]

एका सर्वे नुसार ती २०२२ मधील टॉप ५ मराठी दूरचित्रवाहिनी अभिनेत्रींमध्ये ती प्रथम क्रमांकावर होती.[१३]

फिल्मोग्राफी

[संपादन]

चित्रपट

[संपादन]
वर्ष चित्रपट भूमिका भाषा संदर्भ
२०२० स्ट्रॉबेरी शेक (शॉर्ट फिल्म) मृण्मयी/चिऊ मराठी [१४]
अनन्या अनन्या
२०२१ टाइमपास ३ पालवी [१५]

मालिका

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका टिपा चॅनेल संदर्भ
२०१२ पुढचं पाऊल सहदिग्दर्शक स्टार प्रवाह [१६]
२०१३-२०१६ दुर्वा दुर्वा पाटील-साने दूरचित्रवाणी पदार्पण स्टार प्रवाह [१७]
२०१७-२०१९ फुलपाखरू वैदेही रेगे मुख्य भूमिका झी युवा [१८]
२०२० सिंगिंग स्टार सूत्रसंचालक पर्व १ सोनी मराठी [१९]
२०२१-चालू मन उडू उडू झालं दीपिका देशपांडे मुख्य भूमिका झी मराठी [२०]

नाटक

[संपादन]
वर्ष नाटक भूमिका भाषा संदर्भ
२०१८ दादा एक गुड न्यूझ आहे नमिता मराठी [२१][२२]

पुरस्कार व नामांकने

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी मालिका निकाल
२०१४ महाराष्ट्र टाइम्स सन्मान अवॉर्ड्स सर्वोत्कृष्ट दूरचि्रवाणी अभिनेत्री दुर्वा नामांकन
२०१५ सर्वोत्कृष्ट दूरचि्रवाणी अभिनेत्री विजयी[२३]
२०१६ १६वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मालिका विभाग नामांकन[२४]
२०१९ झी युवा सन्मान सर्वोत्कृष्ट तरुण चेहरा फुलपाखरू विजयी[२५]
१९वा संस्कृती कलादर्पण पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री विजयी[२६]
सेकंड मज्जा पुरस्कार सर्वोत्कृष्ट मुख्य अभिनेत्री – मालिका विभाग विजयी[२७]
झी नाट्य गौरव पुरस्कार सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स दादा एक गुड न्यूझ आहे विजयी[२८]
२०२१ झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०२१ सर्वोत्कृष्ट नायिका मन उडू उडू झालं नामांकन
सर्वोत्कृष्ट जोडी विजयी
मोस्ट ट्रेंड्रिंग व्यक्तिरेखा विजयी
लोकमत पुरस्कार लोकप्रिय स्टायलिश अभिनेत्री विजयी[२९]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "My birthday is like an event: Hruta Durgule". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2019-09-11. 2020-12-13 रोजी पाहिले.
  2. ^ "...म्हणून हृता दुर्गुळेनं मानले चाहत्यांचे आभार". महाराष्ट्र टाइम्स. 2020-12-13 रोजी पाहिले.
  3. ^ "Hruta Durgule new serial "Phulpakharu"". दिव्य मराठी. 2020-12-19 रोजी पाहिले.
  4. ^ "Hruta Durgule Wiki - Age, Height, Weight, Wedding, Photo & Biography" (इंग्रजी भाषेत). 2022-06-13. 2022-06-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-06-16 रोजी पाहिले.
  5. ^ "Hruta Durgule buys her dream home in Thane, says, "buying a home has been my ultimate dream" - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-03-01 रोजी पाहिले.
  6. ^ "Hruta Durgule gets engaged with beau Prateek Shah - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2022-02-09 रोजी पाहिले.
  7. ^ "हृता दुर्गुळे झाली मिसेस प्रतिक शाह, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला लग्नसोहळा". Maharashtra Times. 2022-05-19 रोजी पाहिले.
  8. ^ "I am not in a hurry: Hruta Durgule". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 2018-04-05. 2020-12-13 रोजी पाहिले.
  9. ^ "Phulpakharu completes 700 episodes - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-13 रोजी पाहिले.
  10. ^ "ऋता दुर्गुळेचं वेबविश्वात पदार्पण; 'या' सीरिजमध्ये साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका". लोकसत्ता. 2020-12-26. 2021-01-28 रोजी पाहिले.
  11. ^ "'टाइमपास ३' मध्ये 'या' अभिनेत्रीची होणार एंट्री". महाराष्ट्र टाइम्स. 2021-03-01 रोजी पाहिले.
  12. ^ "Women's Day 2019- A look at the most popular Marathi TV actresses". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2019-03-08. 2021-01-28 रोजी पाहिले.
  13. ^ "लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत 'ही' अभिनेत्री अव्वल, पाहा LIST". न्यूझ १८ लोकमत. 2022-01-28. 2022-02-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2022-02-09 रोजी पाहिले.
  14. ^ "सुमीत राघवन आणि ऋता दुर्गुळे 'स्ट्राबेरी शेक' शॉर्टफिल्मच्या माध्यमातून भेटीला". झी २४ तास. 2020-04-13. 2020-12-19 रोजी पाहिले.
  15. ^ "Hruta Durgule and Prathamesh Parab team up for Ravi Jadhav's Timepass 3 - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-02-26 रोजी पाहिले.
  16. ^ "'Phulpakharu' has offered me a finest opportunity - Hruta Durgule". Marathi Movie World (इंग्रजी भाषेत). 2017-05-29. 2021-04-10 रोजी पाहिले.
  17. ^ "Marathi show Durva to telecast again - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-10 रोजी पाहिले.
  18. ^ "Phulpakharu completes 700 episodes - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-10 रोजी पाहिले.
  19. ^ "Hruta Durgule comeback with 'Singing Star' - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-10 रोजी पाहिले.
  20. ^ "Hruta Durgule excited to share screen with Ajinkya Raut, says "Coming Back Home Wali feeling" - Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-10-01 रोजी पाहिले.
  21. ^ "It was my parents' wish that I do theatre: Hruta Durgule - The Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2020-12-10 रोजी पाहिले.
  22. ^ "Dada, Ek Good News Aahe Review • Marathi Natak Review • रंगभूमी.com". Rangabhoomi. 2021-11-06. 2021-11-28 रोजी पाहिले.
  23. ^ "MaTa Sanman 2015 Nominations". Marathi Sanmaan (इंग्रजी भाषेत). 2021-06-24 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-06-23 रोजी पाहिले.
  24. ^ "Nominations for Sanskruti Kala Darpan 2016 Announced". Marathi Stars (इंग्रजी भाषेत). 2016-04-16. 2021-06-23 रोजी पाहिले.
  25. ^ "अभिनेत्री हृता दुर्गुळेला मिळाला हा पुरस्कार, या शब्दांत व्यक्त केला आनंद". लोकमत. 2019-10-05. 2020-12-10 रोजी पाहिले.
  26. ^ "१९ व्या 'संस्कृती कलादर्पण गौरव रजनी' पुरस्काराची नामांकनं जाहीर". लोकसत्ता. 2019-04-30. 2021-01-14 रोजी पाहिले.
  27. ^ "Itsmajja". marathi.itsmajja.com (इंग्रजी भाषेत). 2021-04-20 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-14 रोजी पाहिले.
  28. ^ "Zee Natya Gaurav Awards: Hruta Durgule Wins Most Natural Performance Of The Year 2019". ZEE5 News (इंग्रजी भाषेत). 2019-03-27. 2020-12-10 रोजी पाहिले.
  29. ^ "Hruta Durgule bags Lokmat Most Stylish Television Actress Award". Lokmat Times (इंग्रजी भाषेत).

बाह्य दुवे

[संपादन]