इ.स. १९४७
Appearance
(इ.स.१९४७ या पानावरून पुनर्निर्देशित)
सहस्रके: | इ.स.चे २ रे सहस्रक |
शतके: | १९ वे शतक - २० वे शतक - २१ वे शतक |
दशके: | १९२० चे - १९३० चे - १९४० चे - १९५० चे - १९६० चे |
वर्षे: | १९४४ - १९४५ - १९४६ - १९४७ - १९४८ - १९४९ - १९५० |
वर्ग: | जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती |
ठळक घटना आणि घडामोडी
[संपादन]- फेब्रुवारी २१ - एडविन लॅंडने पोलेरॉईड कॅमेऱ्याचे प्रात्यक्षिक दाखवले.
- फेब्रुवारी २३ - आंतरराष्ट्रीय प्रमाण संस्था (ISO)ची स्थापना.
- फेब्रुवारी २८ - तैवानमध्ये आंदोलकांवर पोलिसांचा गोळीबार. शेकडो व्यक्ति ठार.
- एप्रिल २८ - पाच मदतनीसांसह थॉर हायरडाल पेरूच्या किनाऱ्यावरून पॉलिनेशियाकडे कॉन-टिकी नावाच्या तराफ्यावर निघाला.
- मे ३ - जपानने नवीन संविधान अंगिकारले.
- जुलै १० - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- जुलै १९ - म्यानमारच्या सरकारचा योजित पंतप्रधान ऑॅंग सान व ६ मंत्र्यांची हत्या.
- जुलै २० - म्यानमारमध्ये ऑॅंग सानच्या खुना बद्दल भूतपूर्व पंतप्रधान उ सॉ व १९ इतरांना अटक.
- जुलै २० - भारतीय व्हाइसरॉय लुई माउंटबॅटनने जाहीर वक्तव्य दिले की वायव्य सरहद्दी प्रांतातील निवडणुकीत जनतेने पाकिस्तानात विलीन होण्याचा कौल दिला आहे.
- जुलै २६ - अमेरिकन राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रुमनने सी.आय.ए., संरक्षणखाते व राष्ट्रीय सुरक्षा समितीची स्थापना केली.
- ऑगस्ट ७ - थॉर हायरडाल व त्याच्या चमूने बाल्सा लाकडाच्या तराफ्यातून १०१ दिवसात पॅसिफिक समुद्र पार केला.
- ऑगस्ट ७ - मुंबई महापालिकेने बेस्ट कंपनी आपल्या अधिकारात घेतली.
- ऑगस्ट १४ - अखंड भारतातून पाकिस्तानची निर्मिर्ती, पाकिस्तान दिन.
- ऑगस्ट १५ - भारताचा स्वातंत्र्य दिन.
- ऑगस्ट १५ - मोहम्मद अली झीणा पाकिस्तानच्या गव्हर्नर-जनरलपदी.
- डिसेंबर २३ - बेल लॅबमध्ये प्रथमत: ट्रांझिस्टरचे प्रदर्शन.
- डिसेंबर ३० - रोमेनियाचा राजा मायकेलने राज्य सोडले.
जन्म
[संपादन]- मार्च १ - बशीर मोमीन (कवठेकर) भारतीय लेखक व कवी.
- मार्च ११ - डॉमिनिक सॅंडा, फ्रेंच अभिनेत्री.
- मार्च ११ - जेफ्री हंट, ऑस्ट्रेलियन स्क्वॅश जगज्जेता.
- एप्रिल १८ - जेम्स वूड्स, अमेरिकन अभिनेता.
- मे १७ - जॉन ट्रायकोस, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- जून ९ - किरण बेदी, भारतातील सर्वप्रथम स्त्री आय.पी.एस. अधिकारी.
- जून १९ - सलमान रश्दी, ब्रिटिश लेखक.
- जुलै १२ - पूचिया कृष्णमुर्ती, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै १५ - बकुळ ढोलकिया, आय.आय.एम अहमदाबादचे माजी संचालक
- जुलै २१ - चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- जुलै २४ - झहीर अब्बास, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
- ऑगस्ट १५ - राखी गुलझार, भारतीय अभिनेत्री.
- सप्टेंबर २१ - स्टीवन किंग, अमेरिकन लेखक.
- सप्टेंबर २५ - ब्रजकिशोर त्रिपाठी, भारतीय राजकारणी आणि लोकसभेचे सदस्य.
- सप्टेंबर २८ - शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान.
मृत्यू
[संपादन]- एप्रिल २० - क्रिस्चियन दहावा, डेन्मार्कचा राजा.
- मे १७ - जॉर्ज विल्यम फोर्ब्स, न्यू झीलंडचा पंतप्रधान.
- जुलै १९ - ऑॅंग सान, म्यानमारचा स्वातंत्र्यसैनिक.
- ऑगस्ट १९ - मास्टर विनायक, मराठी चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते, निर्माते.
- ऑक्टोबर ४ - मॅक्स प्लॅंक, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
- जानेवारी १८ - के.एल्. सैगल, पार्श्वगायक.