किरण बेदी
किरण बेदी | |
---|---|
![]() |
|
जन्म | किरण पेशावरिया ९ जून १९४९ अमृतसर, पंजाब |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
वांशिकत्व | पठाण |
नागरिकत्व | भारतीय |
शिक्षण | बी.ए., एल्एल.बी., पीएच.डी. |
प्रशिक्षणसंस्था | दिल्ली विद्यापीठ |
पेशा | पोलिस अधिकारी |
प्रसिद्ध कामे | नवज्योती आणि इंडिया व्हिजन फाउंडेशन : दोन्ही बिगरसरकारी समाजसंस्था. |
पदवी हुद्दा | आय.पी.एस. |
कार्यकाळ | १९७२-२००७ |
धर्म | हिंदू |
जोडीदार | ब्रिज बेदी (१९७५ पासून) |
अपत्ये | साईना (कन्या) |
वडील | परकाश पेशावरिया |
आई | प्रेम पेशावरिया |
पुरस्कार | मॅगेसेसे पुरस्कार (१९९४) |
संकेतस्थळ http://www.kiranbedi.com/ |
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
किरण बेदी या भारतातील पहिल्या आयपीएस (अखिल भारतीय इंडियन पोलीस सर्व्हिससाठीच्या परीक्षेतून आलेल्या) अधिकारी आहेत. त्यांची पोलीस अधिकारी म्हणून पहिली नेमणूक दिल्लीच्या चाणक्यपुरीत झाली. पुढे त्या उत्तर आणि पश्चिम दिल्लीच्या पोलीस आयुक्त झाल्या. दिल्लीतील तिहार जेलच्या त्या मुख्य अधीक्षक (इन्स्पेक्टर जनरल ऑफ प्रिझन्स) होत्या. तेथे असताना त्यांनी जेलमध्ये अनेक सुधारणा केल्या.
निवृत्तीनंतर अण्णा हजारे यांच्या लोकपालासाठीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. right|thumb|अण्णा हजारे व अरविंद केजरीवाल यांचे समवेतचे एक चित्र
अनुक्रमणिका
बालपण[संपादन]
किरण बेदी यांचा जन्म ९ जून १९४९ साली झाला. त्यांच्या वडिलांचे नाव परकाशलाल असे होते. त्यांच्या आईचे नाव लग्नाआधी जनक व लग्नानंतर प्रेमलता असे होते. किरण यांना एक बहिण होती तिचे नाव शशी असे होते. किरण बेदी यांच्यात स्पष्टपणा,निर्भीडपणा हे गुण होते.
शिक्षण[संपादन]
त्यांच्या शाळेचे नाव सॅक्रेड हार्ट कॉन्व्हेंट स्कूल असे होते. ही शाळा अमृतसर येथे होती. ही शाळा घरापासून १५ किलोमीटर दूर असल्यामुळे त्यांना कष्ट करावे लागत होते. शिक्षणाबरोबरच किरण बेदी या खेळातही चपळ होत्या. त्या टेनिसपटू होत्या. एन.सी.सी. विभागातही त्यांचा सहभाग होता. ग्रंथालयाचा त्या खूप उपयोग करायच्या. त्यानंतर त्यांनी 'गव्हर्नमेंट कॉलेज फॉर वुमेन' यामाध्ये प्रवेश घेतला.
विवाह[संपादन]
टेनिस कोर्टवर किरण बेदी यांची ब्रिज बेदी यांच्याशी भेट झाली. त्यांचा विवाह १९७२ साली झाला. त्याच वर्षी त्यांची आय.पी.एस.येथे निवड झाली. ब्रिज बेदी किरण बेदी यांना सरकारी नोकरीसाठी प्रोत्साहित करीत राहिले. किरण बेदी यांच्या मुलीचे नाव साईना बेदी असे आहे.
किरण बेदी यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]
- आय डेअर (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक - सुप्रिया वकील). हे पुस्तक गुगल बुक्सवर उपलब्ध आहे.
- Be The Change (भ्रष्टाचाराशी लढा). मराठी अनुवादक - सुप्रिया वकील
किरण बेदी यांच्यावरील चित्रपट, मालिका[संपादन]
- कर्तव्यम् (तेलुगू चित्रपट, १९९०)
- विजयाशांती आयपीएस (तमिळ चित्रपट)
- तेजस्विनी (हिंदी चित्रपट)
- स्त्री (हिंदी दूरचित्रवाणी मालिका)
- इन्स्पेक्टर किरण (दूरचित्रवाणी मालिका)
- येस, मॅडम सर ! (मेगन डॉनेमन या ऑस्ट्रेलियन चिर्मात्याने बनवलेला इंग्रजी चित्रपट) : या चित्रपटाला अमेरिकेचा सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा एक लाख डॉलरचा पुरस्कार आणि बार्बारा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात २५०० डॉलरचा पुरस्कार मिळाला.
पुरस्कार आणि सन्मान[संपादन]
- ’हिंदुस्थान’ वृत्तपत्राच्या जनमत चाचणीत सर्वात लोकप्रिय समाजसेवक म्हणून निवड, २००९)
- ’द वीक’ या नियतकालिकाच्या जनमत चाचणीत ’द मोस्ट ॲडमायर्ड वूमन इन इंडिया’ म्हणून पहिल्या क्रमांकाची ४६६ मते मिळाली (१५ सप्टेंबर २००२). (लता मंगेशकर ३८५, सोनिया गांधी २६१, सुषमा स्वराज २५३ मते.)
- त्याच नियतकालिकाच्या ’द मोस्ट ॲडमायर्ड इंडियन’ जनमत चाचणीत देशातून पाचवा क्रमांक (२००२)
- पोलीस मेडल फॉर गॅलन्ट्री (शौर्यपदक, १० ऑक्टोबर, १९८०)
- रेमन मॅगसेसे पुरस्कार आणि इतर अनेक पुरस्कार
संदर्भ[संपादन]
- महान स्त्रिया : लेखिका - अनुराधा पोतदार , परी प्रकाशन कोल्हापूर, आवृत्ती- २०१३
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |