कुंकू (चित्रपट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


कुंकू
Kunku 1937.jpg
कुंकू चित्रपटात शांता आपटे मध्यभागी
दिग्दर्शन व्ही. शांताराम
निर्मिती प्रभात स्टुडिओ
कथा ना.ह. आपटे
पटकथा ना.ह. आपटे
प्रमुख कलाकार
  • शांता आपटे
  • केशवराव दाते
  • राजा नेने
  • विमला वसिष्ठ
  • वासंती घोरपडे- बालकलाकार
संवाद ना.ह. आपटे
छाया व्ही. अवधूत
कला शेख फत्तेलाल
गीते शांताराम आठवले
संगीत केशवराव भोळे
ध्वनी शंकरराव दामले
देश भारत
भाषा मराठी
प्रदर्शित १९३७
अवधी २ तास ४२ मिया चित्रपटाची हिंदी आवृत्ती 'दुनिया न माने' यातील एक दृश्य

कुंकू हा सन १९३७ साली प्रदर्शित झालेला श्वेतधवल मराठी चित्रपट आहे. याची निर्मिती प्रभात स्टुडिओत करण्यात आली. या चित्रपटाचे दिग्दर्शन व्ही. शांताराम यांनी केलेले आहे. या चित्रपटाची कथा ना. ह. आपटे यांच्या 'न पटणारी गोष्ट' या साहित्य कलाकृतीवर आधारित आहे. त्यांनीच या चित्रपटासाठी पटकथा व संवाद लिहिले होते. या सिनेमात पार्श्वसंगीत नाही. या चित्रपटाचे प्रथम प्रदर्शन मुंबईच्या कृष्ण चित्रपटगृहात झाले.[१]

या चित्रपटाची हिंदी आवृत्ती दुनिया न माने ही होती जी व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविल्या गेली होती. या चित्रपटास १९३८चे 'गोहर सुवर्ण पदकही' मिळाले होते.[१]

भूमिका[संपादन]

  • शांता आपटे ने 'नीरा'ची भूमिका केली आहे.
  • 'चित्रा' नावाच्या पात्राची एक सामाजिक कार्यकर्ती म्हणूनची भूमिका शकुंतला परांजपे यांनी केली आहे.[१]

थोडक्यात कथानक[संपादन]

या चित्रपटाचे मुख्य कथानक 'नीरा' या पात्राभोवती फिरते. या 'नीरा' चे लग्न तिचा मामा एका वयोवृद्ध म्हाताऱ्याशी लावून देतो. तिचा याविरुद्धचा लढा या चित्रपटात दर्शविण्यात आला आहे. लग्नसंस्थेच्या परंपरेविरुद्धचे बंड हा या चित्रपटाचा मुख्य विषय आहे.[१]

हा चित्रपट त्यावेळी बराच गाजला होता.

गाणे[संपादन]

या चित्रपटातील 'मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथवीमोलाची, तू चाल रं गड्या फुडं रं तुलाभीती कसाची, पर्वाबी कुनाची...' हे एक त्याकाळी गाजलेले गीत होते.

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. a b c d लेखक:माधवी वागेश्वरी. लोकमत, ई-पेपर,दि.०७/०३/२०१७ सखी पुरवणी,पान क्र.२, कुंकू आणि नीरा Check |दुवा= value (सहाय्य). दि.०७/०३/२०१७ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)