माझा पती करोडपती
Appearance
(माझा पती करोडपती (चित्रपट) या पानावरून पुनर्निर्देशित)
माझा पती करोडपती | |
---|---|
दिग्दर्शन | सचिन पिळगांवकर |
निर्मिती |
चेलाराम भाटिया लालचंद भाटिया |
कथा | अशोक पाटोळे |
पटकथा | सचिन पिळगांवकर |
प्रमुख कलाकार | |
छाया | सूर्यकांत लवंदे |
संगीत | अरुण पौडवाल |
पार्श्वगायन |
किशोर कुमार अनुराधा पौडवाल सचिन पिळगांवकर |
देश | भारत |
भाषा | मराठी |
प्रदर्शित |
२० जानेवारी १९८८ (महाराष्ट्र) |
|
माझा पती करोडपती हा सचिन दिग्दर्शित आणि चेलाराम भाटिया व लालचंद भाटिया निर्मितीत १९८८ सालीचा भारतीय मराठी-भाषेतील चित्रपट आहे. २० जानेवारी १९८८ तारखेला महाराष्ट्र येथे प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटात सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगांवकर, अशोक सराफ, किशोरी शहाणे, सुहास भालेकर, मच्छिंद्र कांबळी, जयराम कुलकर्णी, शुभा खोटे व निळू फुले ह्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.
कलाकार
[संपादन]- सचिन पिळगांवकर - नरेंद्र कुबेर (ऊर्फ नरेन)
- सुप्रिया पिळगांवकर - शकू / सौदामिनी (खोटी)
- अशोक सराफ - दिनकर लुकतुके / कॅप्टन बाजीराव रणगाडे (खोटा)
- किशोरी शहाणे - हेमा देशमुख
- सुहास भालेकर - दामोदर
- मच्छिंद्र कांबळी - तात्या मालवणकर
- जयराम कुलकर्णी - श्री. गजानन देशमुख
- शुभा खोटे - श्रीमती. कुबेर
- निळू फुले - श्री. लक्ष्मीधर कुबेर
- बिपीन वर्टी - शकूला तपासणारा डॉक्टर
- जनार्दन परब - श्री. कुबेरनी बोलावलेला खोटा पोलीस
- चेतन दळवी - शकूचं नाटक "बाजीराव मस्तानी" ह्याचा दिग्दर्शक
- मधु आपटे - मध्या (तात्या मालवणकरचा सहकारी)
बाह्य दुवे
[संपादन]- संपूर्ण चित्रपट ऑनलाईन पहा Archived 2009-04-30 at the Wayback Machine.