लेख वावेंसा
लेख वावेंसा (पोलिश: Lech Wałęsa) (सप्टेंबर २९, इ.स. १९४३; पापोवो - हयात) हे पोलंडचे माजी अध्यक्ष आहेत. त्यापूर्वी ते कामगार नेते होते
विद्युत उपकरणे दुरुस्त करणाऱ्या वालेंसाने आपली राजकीय कारकीर्द कामगार संघटनेपासून केली. त्यावेळच्या रशियाधार्जिण्या पोलिश सरकारने परवानगी शिवाय कामगार संघटना करणे बेकायदा ठरवले होते. परंतु वालेंसाने न्याय मिळवण्यासाठी इ.स. १९७० मध्ये ग्डान्स्क जहाजबांधणी केंद्रातील कामगार संघटित केले व त्याला सॉलिडारिटी (एकता) असे नाव दिले. यासाठी त्याने एक वर्ष तुरुंगात काढले. तेथुन बाहेर आल्यावरही वालेंसाने आपले कार्य चालुच ठेवले व नोकरी गमावली. याकाळात त्याने आपल्या मित्रांच्या साहाय्याने जीवन चालु ठेवले. इ.स. १९८०च्या संपात वालेंसा कारखान्याची भिंत चढुन गेला व संपाचे नेतृत्व घेतले. संप एक वर्षाहून अधिक चालल्यावर पोलिश सरकारने लष्करी कायदा लागू केला व वालेंसाची तुरुंगात रवानगी केली. यादरम्यान संपाचे लोण देशभर पसरले व पोलिश सरकारच संकटात आले. वालेंसाला इ.स. १९८३चा नोबेल शांतता पारितोषिक प्रदान करण्यात आला. त्याने बक्षिसाची रक्कम सॉलिडारिटीला दिली.
पोलंडचे सरकार गडगडल्यावर इ.स. १९९०मध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यात वालेंसाला पोलंडच्या अध्यक्षपदासाठी बहुमत मिळाले. पाच वर्षे सत्तेवर राहिल्यावर इ.स. १९९५च्या निवडणुकात तो हरला. त्यानंतर वालेंसा पोलंडचा राजदूत म्हणून जगभर प्रतिनिधित्त्व करतो.
पारितोषिके
[संपादन]इ.स. १९८३च्या नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त[१], वालेंसाला अनेक आंतरराष्ट्रीय पारितोषिके व खिताब मिळाले आहेत. बत्तीस अमेरिकन व युरोपीय विद्यापीठांनी त्याला पदव्या प्रदान केल्या आहेत [२] इ.स. १९८१मध्ये टाइम या नियतकालिकाने वालेंस त्या वर्षातील सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असल्याचे जाहीर केले. द ऑब्झर्वर व फायनान्शियल टाइम्सनी हा खिताब इ.स. १९८०मध्ये वालेंसाला दिला[२].
इतर सन्मान
[संपादन]- राष्ट्राध्यक्षीय मुक्ती पदक, इ.स. १९८९
- फिलाडेल्फिया स्वातंत्र्य पदक, इ.स. १९८९
- नाइट ऑफ द ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ बाथ, इ.स. १९९१
- ग्रँड क्रॉस ऑफ लीजन ऑफ ऑनर, इ.स. १९९१
- ग्रँड ऑर्डर ऑफ मेरिट, इटली, इ.स .१९९१
- ऑर्डिन पियानो, कॅव्हालिये दि कॉलार, प्रथम दर्जा, इ.स .१९९१
- लंडनचे सन्माननीय नागरिकत्त्व, इ.स. १९९१
- ग्रँड सॅश ऑफ ऑर्डर ऑफ लियोपोल्ड, इ.स. १९९१
- ऑर्डर ऑफ एच.एच. पायस बारावा
- ऑर्डर ऑफ मेरिट, पश्चिम जर्मनी
- ऑर्डर अल मेरितो, चिली
- नॅशनल क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ क्रॉस ऑफ साउथ, ब्राझिल
- स्वातंत्र्य पदक, तुर्कस्तान
- मिलिटरी ऑर्डर ऑफ सेंट जेम्स विथ स्वॉर्ड्स, पोर्तुगाल
- ऑर्डर ऑफ हेन्री ऑफ पोर्तुगाल
- ऑर्डर ऑफ कोरिया, दक्षिण कोरिया
- ऑर्डर ऑफ द नेदरलँड्स लायन ऑफ हॉलँड
- मेडल ऑफ रिपब्लिक ऑफ उरुग्वे
- युनेस्को पदक
- कमांडर ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ द व्हाइट रोझ, फिनलंड, इ.स. १९९३
- ऑर्डर ऑफ द सेराफिम, स्वीडन, इ.स. १९९३
- ऑर्डर ऑफ द एलिफंट, डेन्मार्क, इ.स. १९९३
- ग्रँड क्रॉस ऑफ ऑर्डर ऑफ मेरिट, हंगेरी, इ.स. १९९४
- द रॉयन नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ सेंट ओलाफ, नॉर्वे, इ.स. १९९५
- नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ पोलोनिया रेस्टिटुटा, इ.स. १९९६
- नाइट ऑफ द ऑर्डर ऑफ ऑर्डर ऑफ व्हाइट ईगल, पोलंड, इ.स. १९९६
- वॉशिंग्टन डी.सी.मधील लोकशाहीसाठीच्या राष्ट्रीय संस्थेचे स्वातंत्र्य पदक, इ.स. १९९९
- आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्य सन्मान, मेम्फिस, टेनेसी, इ.स. १९९९
- द ग्रेट ऑर्डर ऑफ द व्हाइट लायन, चेक प्रजासत्ताक, इ.स. १९९९
संदर्भ
[संपादन]- ^ "इ.स. १९८३चे नोबेल पारितोषिक: लेक वालेंसा". नोबेल पारितोषिक संस्था. 2007-08-19 रोजी पाहिले.
- ^ a b लेख वावेंसा इन्स्टिट्यूट (इंग्लिश मजकूर) http://www.ilw.org.pl/english/otfundr.html
मागील: वॉयचेक येरुझेल्स्की |
पोलंडचे राष्ट्राध्यक्ष इ.स. १९९० – इ.स. १९९५ |
पुढील: आलेक्सांदेर क्वाशन्येफ्स्की |