जाऊ बाई गावात
Appearance
जाऊ बाई गावात | |
---|---|
निर्मिती संस्था | झी स्टुडिओज |
सूत्रधार | हार्दिक जोशी |
देश | भारत |
भाषा | मराठी |
एपिसोड संख्या | ६२ |
निर्मिती माहिती | |
प्रसारणाची वेळ | सोमवार ते शनिवार रात्री ९.३० वाजता |
प्रसारण माहिती | |
वाहिनी | झी मराठी |
प्रथम प्रसारण | ४ डिसेंबर २०२३ – ११ फेब्रुवारी २०२४ |
अधिक माहिती | |
सारखे कार्यक्रम | जाऊ बाई गावात: न पाहिलेली मजा |
जाऊ बाई गावात हा झी मराठी दूरचित्रवाणीवर प्रसारित होणारा एक कथाबाह्य कार्यक्रम आहे.
पाहुणे
[संपादन]- रोहित परशुराम आणि शिवानी नाईक (४ डिसेंबर २०२३, १-२ जानेवारी २०२४)
- कुशल बद्रिके (६ डिसेंबर २०२३, १९-२० जानेवारी २०२४)
- क्रांती रेडकर (७ डिसेंबर २०२३)
- देवदत्त नागे (८ डिसेंबर २०२३)
- हृषिकेश शेलार (९ डिसेंबर २०२३)
- गश्मीर महाजनी आणि नंदेश उमप (११ डिसेंबर २०२३)
- महेश मांजरेकर (१२ डिसेंबर २०२३, ११ फेब्रुवारी २०२४)
- मायरा वायकुळ, जयेश खरे आणि स्वरा जोशी (१३ डिसेंबर २०२३)
- अजय पूरकर (१४ डिसेंबर २०२३)
- सुरेखा पुणेकर, मयूर वैद्य आणि पूजा सावंत (१५-१६ डिसेंबर २०२३)
- श्रेया बुगडे (२२-२३ डिसेंबर २०२३)
- मधुरा बाचल (२८ डिसेंबर २०२३)
- शुभंकर तावडे, संस्कृती बालगुडे, रुची कदम, दक्षता जोईल आणि शिवानी रांगोळे (१-२ जानेवारी २०२४)
- सागर कारंडे (९ जानेवारी २०२४)
- आनंद शिंदे (११-१२ जानेवारी २०२४)
- अक्षया देवधर, पुष्कर जोग, दिशा परदेशी, कार्तिकी गायकवाड आणि रोनित पिसे (१४ जानेवारी २०२४)
- संजय मोने (२४ जानेवारी २०२४)
- अशोक हांडे (२६ जानेवारी २०२४)
- आदेश बांदेकर आणि सोनाली मनोहर कुलकर्णी (११ फेब्रुवारी २०२४)
स्पर्धक
[संपादन]- रमशा फारुकी (विजेती)
- अंकिता मेस्त्री (उपविजेती)
- मुक्ता करंदीकर (बाद)
- मोनिशा आजगावकर (बाद)
- वैष्णवी सावंत (बाद)
- शमा लखानी (बाद)
- तनया अफजलपूरकर (बाद)
- वर्षा हेगडे (बाद)
- हेतल पाखरे (बाद)
- स्नेहा भोसले (बाद)
- श्रेजा म्हात्रे (बाद)
- संस्कृती साळुंके (बाद)
- रसिका ढोबळे (बाद)
विशेष भाग
[संपादन]- करणार तेव्हा कळणार, आता मज्जा येणार, खेळ सुरू होणार. (४ डिसेंबर २०२३)
- शहराकडून गावाकडचा प्रवास कसा असणार? (५ डिसेंबर २०२३)
- ऑनलाईन घरात दूध मागवणाऱ्या स्वतःच्या हाताने म्हशीचं दूध काढू शकतील का? (६ डिसेंबर २०२३)
- ज्यांना सवय मॅन्यिकुअर पेडीक्युअरची त्या कोंबड्या कशा पकडणार? (७ डिसेंबर २०२३)
- शहरात सुसाट गाड्या पळवणाऱ्या बैलगाडीवर कसा ताबा मिळवणार? (८ डिसेंबर २०२३)
- रांगड्या कुस्तीची मजा रंगणार. (९ डिसेंबर २०२३)
- आलिशान वाड्यात गृहप्रवेश होणार, मिस बावधन कोण होणार? (११ डिसेंबर २०२३)
- कोण खेकडे पकडणार, कोणाला खेकडे पकडणार? (१२ डिसेंबर २०२३)
- आजोबांना इंग्लिश शिकवणार, परीक्षेमध्ये धमाल होणार. (१३ डिसेंबर २०२३)
- मोहीम सैनिकी खडतर आहे, पण मुली कणखर आहेत! (१४ डिसेंबर २०२३)
- शहरी मुली लोककला शिकणार, गावात लावणीचा फड रंगणार. (१५ डिसेंबर २०२३)
- शहरी पोरींची येणार गावात स्वारी, गावरान मनोरंजनाचा तडका लागणार भारी. (१६ डिसेंबर २०२३)
- मुलींनी लावलेलं लग्न गावात गाजणार, श्रेजाला बाबांचे प्रेम मिळणार. (१८ डिसेंबर २०२३)
- ट्रॅक्टरच्या शर्यतीत कोण जिंकणार, कोण मागे हटणार? (१९ डिसेंबर २०२३)
- खेळ रंगणार, वाद वाढणार. (२० डिसेंबर २०२३)
- भैरवदादांच्या मदतीसाठी सरसावल्या मुली, उसाच्या रसाची करणार विक्री, पैशांची खरी किंमत आता ह्यांना कळणार. (२१ डिसेंबर २०२३)
- शहरी मुली गावात मुलं शोधणार, बदलून त्यांची स्टाईल त्यांना हिरो बनवणार. (२२ डिसेंबर २०२३)
- गावातल्या मुलांचा शहरी मुलींसोबत डान्स, डान्समध्ये मारलाय प्रेमाचा चान्स. (२३ डिसेंबर २०२३)
- सगळ्या मोहिमा पूर्ण करून चार मुलींना वाड्यात यायचंय, वाड्यातल्या मुलींना त्यांना अडवायचंय, कोण वाड्यात येणार कोण बाहेर जाणार? (२५ डिसेंबर २०२३)
- जे नशिबात कधीच नाही आलं, ते प्रेम ते दिवस वर्षाला पुन्हा अनुभवता येणार. (२६ डिसेंबर २०२३)
- शहरी मुली भक्तिरसात न्हाऊन जोगवा मागणार, देवीचा गोंधळ होणार. (२७ डिसेंबर २०२३)
- वाड्यात खास बेत रंगणार, कोणाला जमणार कोणाचं फसणार? (२८ डिसेंबर २०२३)
- बावधन ऑलिम्पिक होणार, चुरशीच्या लढतीत सगळं पणाला लागणार. (२९ डिसेंबर २०२३)
- स्नेहा आणि संस्कृतीची मैत्री तुटणार का? (३० डिसेंबर २०२३)
- नवीन वर्ष साजरं करायला खास पाहुणे येणार, खास पाहुण्यांसोबत खास धमाल होणार. (१ जानेवारी २०२४)
- नवीन वर्षाचं दिमाखात स्वागत होणार, मुली आणि पाहुण्यांसोबत गावातले लोक पण मजा करणार. (२ जानेवारी २०२४)
- मोहिमेच्या तालमीसाठी गावभर घातली प्रदक्षिणा, रांगोळी शिकण्यासाठी दिली खास गुरुदक्षिणा. (३ जानेवारी २०२४)
- शहरी मुली गावात पथनाट्य करणार, एकमेकींना दिली साथ गावकऱ्यांनी दिली दाद. (४ जानेवारी २०२४)
- श्रेजा कशी सहन करणार ही शिक्षा? (५ जानेवारी २०२४)
- ज्यांचा अभ्यास नाही पक्का, त्यांना मिळणार धक्का. (६ जानेवारी २०२४)
- मुलींना पैशांची किंमत कळणार. (८ जानेवारी २०२४)
- लाडका पोस्टमन येणार आठवणींचं पत्र घेऊन. (९ जानेवारी २०२४)
- शहरी मुली करणार गावातल्या बायकांना व्हायरल. (१० जानेवारी २०२४)
- बावधन ऑर्केस्ट्रा सजणार, काय काय धमाल होणार. (११-१२ जानेवारी २०२४)
- शहरातल्या मुलींना कळणार बळीराजाच्या मेहनतीचं महत्त्व. (१३ जानेवारी २०२४)
- सण साजरा करुया दणक्यात, धमाल करुया संक्रांत विशेष भागात. (१४ जानेवारी २०२४)
- घरच्यांशी भेट होणार, अश्रूंचा बांध फुटणार, घरच्यांचं खास स्वागत होणार. (१५-१६ जानेवारी २०२४)
- शहरी मुली घाम गाळून पाणी भरणार. (१७ जानेवारी २०२४)
- शहरी मुली करणार भारुड. (१८ जानेवारी २०२४)
- म्हातारे सितारे होणार, काय धमाल होणार. (१९-२० जानेवारी २०२४)
- ज्यांनी ओलांडली नाही गावची वेस, त्या माऊली मुंबई दर्शनासाठी निघणार. (२२ जानेवारी २०२४)
- गावातल्या माऊली करणार मुंबईची वारी, कसा होणार प्रवास भारी? (२३ जानेवारी २०२४)
- गावातल्या माऊली पहिल्यांदाच मुंबई बघणार, ह्या प्रवासात काय काय अनुभवायला मिळणार? (२४ जानेवारी २०२४)
- गावातल्या माऊली आणि शहरी मुली थुकरटवाडीत धमाल करणार. (२५ जानेवारी २०२४)
- रसिका आणि रमशाने दिली फाईट, बावधनच्या काकूंनी केलं वातावरण टाईट. (२६ जानेवारी २०२४)
- चुलीवर राबणाऱ्या हातांना नेलपॉलिश लागणार, गावातल्या माऊलींना शहराची हवा लागणार. (२७ जानेवारी २०२४)
- बायको करणार आराम, त्यांचे नवरे करणार काम. (२९ जानेवारी २०२४)
- शहरी मुलींचा कस लागणार, दाढी करणं ह्यांना कसं जमणार? (३० जानेवारी २०२४)
- मुली करत आहेत प्रयत्न, शोधणार गावात लपलेली रत्नं. (३१ जानेवारी २०२४)
- स्पर्धेची चुरस अजून वाढणार. (१ फेब्रुवारी २०२४)
- बावधन बालनाट्य स्पर्धा होणार. (२ फेब्रुवारी २०२४)
- मध्यरात्री भयाण जंगलात मोहीम रंगणार. (३ फेब्रुवारी २०२४)
- आडवी तिडवी मडकी तर बनवणार, पण कशा ह्या विकणार? (५ फेब्रुवारी २०२४)
- कपडे धुण्याची आली लहर, मुलींनी केला भलताच कहर. (६ फेब्रुवारी २०२४)
- वाड्यात भक्तीचा जागर होणार. (७ फेब्रुवारी २०२४)
- कोण असेल ती एक, जी होणार गावची लाडकी लेक? (११ फेब्रुवारी २०२४)
- मराठी टेलिव्हिजनवरचा सर्वात मोठा चित्रपट, पिक्चर अजून बाकी आहे. (१८ फेब्रुवारी २०२४)