Jump to content

मृणाल दुसानीस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मृणाल दुसानीस
जन्म २० जून, १९८८ (1988-06-20) (वय: ३६)
नाशिक, महाराष्ट्र
कारकीर्दीचा काळ २०१० ते आजतागायत
प्रमुख टीव्ही कार्यक्रम माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे, अस्सं सासर सुरेख बाई
पती
नीरज मोरे (ल. २०१६)
अपत्ये

मृणाल दुसानीस (२० जून १९८८) ही एक मराठी अभिनेत्री आहे. मृणाल मुख्यतः मराठी दूरचित्रवाणी वरील माझिया प्रियाला प्रीत कळेना, तू तिथे मी, सुखाच्या सरींनी हे मन बावरे आदी मालिकांमध्ये काम करणारी प्रमुख अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.[][][]

वैयक्तिक आयुष्य

[संपादन]

मृणाल दुसानीसचा जन्म २० जून १९८८ रोजी नाशिक, महाराष्ट्र येथे झाला.[] तिने आपले शालेय शिक्षण मराठा हायस्कूल येथून, तर महाविद्यालयीन शिक्षण एचपीटी कॉलेज, नाशिक येथून घेतले. तिने पत्रकारिता विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. व्यवसायाने सॉफ्टवेर इंजिनिअर असलेल्या नीरज मोरेशी तिने इ.स. २०१६ मध्ये लग्न केले.[][][][]

कारकीर्द

[संपादन]

तिने आपली अभिनयाच्या कारकिर्दीची सुरुवात एकता कपूरची मालिका माझिया प्रियाला प्रीत कळेना मधून केली.[][१०] यानंतर, तिने झी मराठी वरील तू तिथे मी या मालिकेत 'मंजिरी' नावाच्या पात्राची प्रमुख भूमिका पार पाडली.[११] इ.स. २०१५ मध्ये, ती कलर्स मराठीवर प्रसारित होणाऱ्या अस्सं सासर सुरेख बाई मालिकेत दिसली.[१२] इ.स. २०१८ मध्ये, ती सुखाच्या सरींनी हे मन बावरे मालिकेत 'अनुश्री' म्हणून दिसली होती.[१३][१४]

अभिनय सूची

[संपादन]

दूरचित्रवाहिनी

[संपादन]
वर्ष मालिका भूमिका वाहिनी नोंद
२०१०-११ माझिया प्रियाला प्रीत कळेना शमिका पेंडसे झी मराठी [१५]
२०११ एका पेक्षा एक - अप्सरा आली स्पर्धक झी मराठी [१६]
२०११-१२ आम्ही सारे खवय्ये सूत्रसंचालन झी मराठी [१७]
२०१२-१४ तू तिथे मी मंजिरी मुधोळकर झी मराठी [१८]
२०१२ हप्ता बंद अतिथी पाहुणा झी मराठी [१९]
२०१४ रिमोट माझा सूत्रसंचालन एबीपी माझा [२०]
२०१५-१७ अस्सं सासर सुरेख बाई! जुई यश महाजन कलर्स मराठी [२१]
२०१८-२० सुखाच्या सरींनी हे मन बावरे अनुश्री तत्ववादी कलर्स मराठी [२२]

चित्रपट

[संपादन]
वर्ष शीर्षक संदर्भ
२०१३ श्रीमंत दामोदर पंत [२३]

पुरस्कार आणि नामांकने

[संपादन]
वर्ष पुरस्कार श्रेणी मालिका परिणाम
२०१० झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री माझिया प्रियाला प्रीत कळेना नामांकित
सर्वोत्कृष्ट जोडपे (शमिका-अभिजीत म्हणून) जिंकले
सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण
२०१२ सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तू तिथे मी
सर्वोत्कृष्ट सून
सर्वोत्कृष्ट जोडपे (मंजिरी-सत्यजित म्हणून) नामांकित
२०१३ सर्वोत्कृष्ट सून जिंकले
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री नामांकित
सर्वोत्कृष्ट जोडपे (मंजिरी-सत्यजित म्हणून)
२०१९ कलर्स मराठी पुरस्कार सर्वोत्कृष्ट सून सुखाच्या सरींनी हे मन बावरे
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री जिंकले
सर्वोत्कृष्ट जोडपे (अनुश्री-सिद्धार्थ म्हणून)

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Mrunal Dusanis has discovered many new things in lockdown – Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  2. ^ "फोटोत दिसणाऱ्या 'या' चिमुरडीला ओळखले का ? आज आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री". लोकमत. 2021-01-02 रोजी पाहिले.
  3. ^ "Here's why Mrunal Dusanis is on cloud 9 – Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  4. ^ "अरेंज मॅरेज करणाऱ्या मृणालला नव-याने विचारले होते, 'तुम्ही पंजाबी ड्रेस घालता ना?'". दिव्य मराठी. 2017-06-20. 2021-09-30 रोजी पाहिले.
  5. ^ "ॲक्टिंग पासून ब्रेक घेत आता संसारात रमली आहे मृणाल दुसानिस, फॅन्सना केले 'हे' प्रॉमिस". दिव्य मराठी. 2018-06-24. 2021-09-30 रोजी पाहिले.
  6. ^ "Mrunal Dusanis - Take a look at the real-life partners of Marathi TV actresses". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-02-16 रोजी पाहिले.
  7. ^ "अभिनेत्री मृणाल दुसानीस लग्नाच्या बेडीत". झी २४ तास. 2016-02-28. 2021-01-02 रोजी पाहिले.
  8. ^ "Mrunal Dusanis and Neeraj More Tied In Nuptial Knot". Mega Marathi (इंग्रजी भाषेत). 2021-08-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-02 रोजी पाहिले.
  9. ^ "Maziya Priyala Preet Kalena". balajitelefilms (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  10. ^ "Did you know Ekta Kapoor's first Marathi serial was 'Maziya Priyala Preet Kalena'?". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  11. ^ "Abhijeet Khandkekar & Mrunal celebrate 'Majhiya Priyala Preet Kalena' 10th anniversary". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-02-16 रोजी पाहिले.
  12. ^ "खरं सासरं सुरेख करण्यासाठी मृणालचा 'अस्सं सासर..'ला रामराम, ही अभिनेत्री साकारणार 'जुई'". दिव्य मराठी. 2017-08-12. 2021-01-02 रोजी पाहिले.
  13. ^ "'He Mann Baware' team resumes shoot, channel shares pictures of the cast". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  14. ^ "'ही' अभिनेत्री करतेय छोट्या पडद्यावर 'कमबॅक'!". महाराष्ट्र टाइम्स. 2021-01-02 रोजी पाहिले.
  15. ^ "Abhijeet Khandkekar & Mrunal celebrate 'Maziya Priyala Preet Kalena' 10th anniversary". Republic World (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  16. ^ "Eka Peksha Ek Apsara Aali March 03 '11 - Mrunal Dusanis", यूट्यूब (इंग्रजी भाषेत), 2021-03-21 रोजी पाहिले
  17. ^ "Aamhi Saare Khavayye | Marathi Food Show | Dec. 06 '11 | Part - 1 | Zee Marathi TV Serials", यूट्यूब (इंग्रजी भाषेत), 2021-03-21 रोजी पाहिले
  18. ^ "Mrunal Dusanis's Tu Tithe Mee to go off air – Times of India". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.
  19. ^ "Hapta Bandh | Marathi Game Show | Full Episode 25 – 17th October 2012 | Zee Marathi TV Serials – YouTube". यूट्यूब (इंग्रजी भाषेत). 2021-01-13 रोजी पाहिले.
  20. ^ "Remote Majha News: Latest News and Updates on Remote Majha at News18". News18 (इंग्रजी भाषेत). 2021-09-30 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-02 रोजी पाहिले.
  21. ^ "५०० भाग सुरेख बाई..." लोकसत्ता. 2017-02-09. 2021-01-02 रोजी पाहिले.
  22. ^ "'सुखाच्या सरींनी हे मन बावरे'... अनु देणार सिध्दार्थला खास सरप्राइज!". महाराष्ट्र टाइम्स. 2021-01-02 रोजी पाहिले.
  23. ^ "Shrimant Damodar Pant Marathi Movie Cast,Story,Photos,Official Promo". Marathi Stars (इंग्रजी भाषेत). 2021-01-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]