मिशिगन
मिशिगन Michigan | |||||||||||
अमेरिका देशाचे राज्य | |||||||||||
| |||||||||||
अधिकृत भाषा | इंग्लिश | ||||||||||
राजधानी | लान्सिंग | ||||||||||
मोठे शहर | डेट्रॉईट | ||||||||||
क्षेत्रफळ | अमेरिकेत ११वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | २,५०,४९३ किमी² | ||||||||||
- रुंदी | ६२१ किमी | ||||||||||
- लांबी | ७३४ किमी | ||||||||||
- % पाणी | ४१.५ | ||||||||||
लोकसंख्या | अमेरिकेत ८वा क्रमांक | ||||||||||
- एकूण | ९८,८३,६४० (२०१० सालच्या गणनेनुसार) | ||||||||||
- लोकसंख्या घनता | ३९.५/किमी² (अमेरिकेत १९वा क्रमांक) | ||||||||||
- सरासरी उत्पन्न | $४४,६२७ | ||||||||||
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश | २६ जानेवारी १८३७ (२६वा क्रमांक) | ||||||||||
संक्षेप | US-MI | ||||||||||
संकेतस्थळ | www.michigan.gov |
मिशिगन (इंग्लिश: Michigan) हे अमेरिकेच्या उत्तर भागातील एक राज्य आहे. मिशिगन हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील ११वे तर लोकसंख्येच्या दृष्टीने आठव्या क्रमांकाचे राज्य आहे.
जगातील सर्वात लांब गोड्या पाण्याच्या साठ्यांचा किनारा मिशिगनला लाभला आहे. भव्य सरोवर परिसरातील मिशिगन राज्याला पाच पैकी चार भव्य सरोवरांचा किनारा आहे (ओन्टारियो सरोवर वगळता). मिशिगन राज्य दोन द्वीपकल्पांचे बनले आहे. उत्तरेकडील द्वीपकल्प दक्षिणेकडील द्वीपकल्पापासून ८ किमी रुंद मॅकिनाउच्या सामुद्रधुनीने वेगळा केला आहे.
मिशिगनच्या उत्तरेला कॅनडाचा ओंटारियो हा प्रांत व सुपिरियर सरोवर, पूर्वेला ह्युरॉन सरोवर, आग्नेयेला ईरी सरोवर, दक्षिणेला इंडियाना व ओहायो तर पश्चिमेला मिशिगन सरोवर व विस्कॉन्सिन हे राज्य आहेत. लान्सिंग ही मिशिगनची राजधानी असून डेट्रॉईट हे सर्वात मोठे शहर आहे.
अमेरिकेतील वाहन उत्पादन उद्योगाचे मिशिगन हे केंद्र आहे. विसाव्या शतकामध्ये स्थापलेल्या तीन मोठ्या वाहन उत्पादन कंपन्यांमुळे डेट्रॉईट व मिशिगनची वेगाने भरभराट झाली.
महत्त्वाची शहरे
[संपादन]- डेट्रॉईट
- ग्रँड रॅपिड्स
- लान्सिंग (राजधानी)
- ॲन आर्बर
प्रसिद्ध व्यक्ती
[संपादन]१. हेन्री फोर्ड - फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक (डिअरबॉर्न)
२. विल्यम बोईंग - बोईंग कंपनीचे संस्थापक (डेट्रॉईट)
३. फ्रान्सिस फोर्ड कोपोला - चित्रपट दिग्दर्शक (डेट्रॉईट)
४. मॅडोना - पॉप स्टार (बे सिटी)
५. एमिनेम - रॅप म्युझिक स्टार (डेट्रॉईट)
गॅलरी
[संपादन]-
स्लिपिंग बेअर ड्युन्स राष्ट्रीय उद्यान.
-
मिशिगन राज्य संसद भवन
-
मिशिगनचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |