ऑन्टारियो सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ऑन्टारियो सरोवर  
ऑन्टारियो सरोवर -
स्थान उत्तर अमेरिका
प्रमुख अंतर्वाह नायगारा नदी
प्रमुख बहिर्वाह सेंट लॉरेन्स नदी
भोवतालचे देश Flag of the United States अमेरिका

कॅनडा ध्वज कॅनडा

कमाल लांबी ३११
कमाल रुंदी ८५
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १९,५००
सरासरी खोली ८६
कमाल खोली २४४
पाण्याचे घनफळ १,६४० घन किमी
किनार्‍याची लांबी १,१४६
उंची ७५

ऑन्टारियो सरोवर हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात लहान सरोवर आहे. ऑन्टारियो सरोवराच्या उत्तर व नैऋत्येला कॅनडाचा ऑन्टारियो हा प्रांत तर दक्षिण व पूर्वेस अमेरिकेचे न्यू यॉर्क हे राज्य आहे. भव्य सरोवरांमध्ये सर्वात शेवटचे व सर्वात कमी उंचीवर असलेले ऑन्टारियो सरोवर सेंट लॉरेन्स नदीद्वारे अटलांटिक महासागरासोबत जोडले गेले आहे. अमेरिकेच्या मिशिगन राज्याचा किनारा नसलेले ऑन्टारियो हे ५ भव्य सरोवरांपैकी एकमेव सरोवर आहे. टोरॉंटो हे कॅनडामधील सर्वात मोठे शहर ऑन्टारियोच्या वायव्य किनाऱ्यावर वसले आहे.

पृष्ठभागाच्या क्षेत्रफळानुसार ऑन्टारियो हे जगातील १४वे मोठे सरोवर आहे. ईरी सरोवरामधून सुरू होणारी नायगारा नदी हा ऑन्टारियो सरोवराचा प्रमुख अंतर्वाह आहे. याशिवाय जेनेसी नदी रॉचेस्टरजवळ या सरोवरास मिळते.

प्रमुख शहरे[संपादन]

कॅनडा[संपादन]

अमेरिका[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]