पांचाळ
Appearance
पांचाळ हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.
प्रदेश
[संपादन]उत्तरप्रदेशातील बुंदेलखंडाच्या प्रदेशात पांचाळ नावाचे राज्य होते. महाभारत काळात प्रभावी असलेले हे राज्य यमुना नदीच्या खोऱ्यात आणि कुरू राज्याच्या शेजारी होते. अहिच्छत्र व कांपिल्य या उत्तर-दक्षिण या दोन पांचाळ राज्यांच्या राजधान्या होत्या.
संकीर्ण
[संपादन]पांडवांची पत्नी द्रौपदी ही पांचाळ नरेश द्रुपद राजाची कन्या होती या राज्याच्या नावावरूनच तिला पांचाली असेही म्हणले जात होते.
अस्त
[संपादन]कुरू व पांचाळ या दोन्ही राज्यांत कायमचे वैर होते, पण शेवटी मगधाने ही राज्ये जिंकून घेतली.