बासे
?बासे महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
बासे हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]बासे हे गांव महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यात आहे.हे गांव मुंबई शहरापासून ४० कि.मी. अंतरावर आहे.
महत्त्व
[संपादन]गांवापासून ५-६ कि.मी. अंतरावर वज्रेश्वरी, गणेशपुरी व अकलोली ही धार्मिक स्थळे, माहुलीगड हे ऐतिहासिक किल्ला असलेले ठिकाण आहे.याच माहूली गडाच्या पायथ्याशी असलेलया टेकडीवर नंदीकेश्वराचे पुरातन मंदिर आहे. तसेच तानसा तलाव व तेथील अभयारण्य ही प्रेक्षणीय स्थळे आहेत.गांवात पुरातन हनुमान मंदिर आहे. मंदिराचा जिर्णोद्धार सन २००७ साली करण्यात आला.
हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.