अकलोली
?अकलोली महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | भिवंडी |
जिल्हा | ठाणे जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड |
• एमएच/ |
अकलोली हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
[संपादन]अकलोली हे भिवंडी तालुक्यातील छोटे शहरवजा गांव आहे. मुंबई पासून ८० कि.मी. अंतरावर आहे. हे गांव तानसा नदी च्या काठावर वसलेले असून वाडा तालुका व भिवंडी तालुका यांच्या हद्दीवर आहे. वज्रेश्वरी व गणेशपूरी, निंबवली ही प्रसिद्ध स्थळे येथून २-३ कि.मी.अंतरावर आहेत.
महत्त्व
[संपादन]अकलोली येथील गरम पाण्याची कुंडे जगप्रसिद्ध आहेत.येथील शिवमंदिराला पौराणिक महत्त्व प्राप्त आहे.शिवमंदिरा समोर असलेल्या गरम पाण्याच्या कुंडात स्नान केल्याने चर्मरोग बरे होतात.सुट्टीच्या दिवसात या ठिकाणी देशातून व परदेशातूनही येथे पर्यटक येत असतात.
हवामान
[संपादन]येथील हवामान उन्हाळ्यात फारच उष्ण व दमट असते. हिवाळ्यात शीतल व कोरडे असते. पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस पडतो व हवामान समशीतोष्ण व दमट असते.पावसाळ्यात भरपूर पाऊस पडत असल्याने मुख्य खरीप पीक म्हणून भाताची लागवड केली जाते.
लोकजीवन
[संपादन]==प्रेक्षणीय स्थळे== अकलोली हे ठिकाण ठाणे जिल्यात आहे गरम पाण्याचा झरा म्हणून हे ठिकाण प्रसिद्ध आहे व यात औषधी गुणधर्म आहेत म्हणून हे ठिकाण पर्यटकांसाठी आकर्षक ठिकाण आहे