Jump to content

नंदिकेश्वर मंदिर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(नंदीकेश्वराचे या पानावरून पुनर्निर्देशित)

माहुलीच्या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लहान भवारी नावाच्या टेकडीवर शिवाजी महाराजांच्या काळात महादेवाचे मंदिर बांधण्यात आले होते. पुढे मुघलांनी हे मंदिर उध्वस्त केले. त्याचे अवशेष आजही तेथे आढळतात.त्यानंतर सन १९७५ साली या ठिकाणी टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पिवळीगावच्या ग्रामस्थांना मंदिराच्या ठिकाणी मातीत गाडलेले एक शिवलिंग सापडले. याच शिवलिंगाची विधिवत पूजा करून परीसरातील ग्रामस्थांनी छोटेसे कौलारू मंदिर बांधले. या ठिकाणी एक पाण्याचा झरा बाराही महिने वहात आहे. या पाण्याचा झरा नंदिचे पाणी (नांदीचे पाणी) म्हणून प्रसिद्ध आहे. या नावावरूनच या मंदिराला नंदिकेश्वर असे नांव पडले.या झऱ्यांच्या ठिकाणी पुरातत्त्व विभाग भारत सरकार यांनी कुंडे (चौकोनी बांधकाम) करून कुंडे संरक्षित केली आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला येथे मोठी यात्रा भरते.