लोहारी
लोहारी हे महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्ह्यामधील एक गाव आहे.
?लोहारी महाराष्ट्र् • भारत | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | पाचोरा |
जिल्हा | जळगाव |
तालुका/के | पाचोरा |
लोकसंख्या लिंग गुणोत्तर साक्षरता • पुरूष • स्त्री |
३,२७१ (२०११) १.१० ♂/♀ ६८.०० % • ७६.१५ % • ५८.९६ % |
भाषा | मराठी |
सरपंच | |
संसदीय मतदारसंघ | जळगाव |
बोलीभाषा | अहिराणी खाण्देशी |
कोड • पिन कोड • दूरध्वनी |
• ४२४२०२ • +०२५९६ |
स्थान
[संपादन]लोहारी जळगाव जिल्ह्याच्या पाचोरा या तालुक्यात पाचोरे या शहरापासून ८ किलोमीटर अंतरावर पाचोरा - जामनेर रस्त्यावर वसलेले आहे. हे गाव लोहारी बु., लोहारी खुर्द, दत्तनगर, आर्वे, शिवाजीनगर(इंदिरा नगर) असे विभागले आहे. लोहारी बु. व लोहारी खुर्द या गावांमधून बहुळा ही नदी वाहते. लोहारी बु. हा भाग गावातील सर्वात जुना भाग आहे.
लोकजीवन
[संपादन]गावात प्रामुख्याने हिंदू व मुस्लिम धर्मीय आहेत. गावात पूर्वी बलुतेदार अलुतेदार (कारू-नारू) पद्दत असावी कारण अजूनही इथे सर्व जाती-जमातीचे लोक पहावयास मिळतात. लोहारी बु. या गावाचा कारभार पूर्वी गढी या ठिकाणावरून चालायचा. आजही ही गढी अस्तित्वात आहे. पाटील येथील वतनदार आहेत. गावात बडगुजर हा समाजही मोठ्याप्रमाणावर आहे. पूर्वी गावाची विभागणी ही गढी, ब्राह्मणगल्ली, तेलीगल्ली, कासारगल्ली, वाणीगल्ली, बेलदारगल्ली, जाधवगल्ली, कोळीवाडा, राजवाडा, मांगवाडा, कुंभारवाडा, खाखरपुरा अशी होती. इथे एकतेचे दर्शन होते. आता गाव झपाट्याने बदलत आहे.
प्रशासन
[संपादन]इथला कारभार हा लोहारी बु. ग्रुप ग्रामपंचायती मार्फत चालतो. गावात पोलीस पाटील ही आहे. लोहारी बु. हे गाव पिंपळगाव (हरेश्वर) या पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते.
शिक्षण
[संपादन]या गावात प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षणासाठी जिल्हापरिषदेच्या आदर्श प्राथमिक विद्यालय लोहारी बु.!! व नवलभाऊ प्रतिष्ठान संचलित दत्त माध्यमिक विद्यालय लोहारी बु.!! या संस्था आहेत तसेच लोहारी खुर्द व शिवाजीनगर आणि आर्वे येथे वस्ती शाळा ही आहेत. लोहारी खुर्द येथे उर्दू शाळा ही सुरू केलेली आहे तसेच प्रत्येक भागात लहान मुलांसाठी आंगणवाड्या व बालवाड्या ही आहेत. महाविद्यालयीन शिक्षण पाचोरा, पिंपळगाव(हरे.) किंवा जळगाव यांपैकी कुठल्याही एका ठिकाणाहून पूर्ण केले जाते.
आरोग्य
[संपादन]गावात महाराष्ट्र शासनाचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्रामार्फत सरकारी आरोग्य योजनांची अंमलबजावणी केली जाते. गावात खाजगी इस्पितळे ही आहेत.
व्यवसाय
[संपादन]सध्या शेती हा गावातील प्रमुख व्यवसाय आहे. पशुपालन व दुग्धव्यवसाय ही केला जातो. पूर्वी प्रत्येक जमातीचा स्वतंत्र व्यवसाय होता. गावातील तरुण पिढीतील जवळपास ४०-५० टक्के तरुण भारतीय संरक्षण खात्यात व महाराष्ट्र पोलीस खात्यात नोकरीस आहेत.
धार्मिक वातावरण
[संपादन]श्री. बालाजी हे गावाचे ग्रामदैवत आहे. तसेच या गावात महादेव, श्री गणेश, हनुमान, लक्ष्मी, दत्तगुरू मंदिरे आहेत. गावात भागवत सप्ताह, हरीनाम सप्ताह, टाळ सप्ताह होत असतो. हनुमान जयंती, श्री गणेश उत्सव व नवरात्री उत्सव ही मोठ्या उत्साहाने इथे साजरा होतो. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गावात बालाजी महाराजांचा रथ फिरतो