विकिपीडिया चर्चा:चावडी/जुनी चर्चा १
ही "Village Pump" ची मराठी आवृत्ती आहे काय? असल्यास, याला "चावडी" ऐवजी "नळकोंडाळे" असे नाव देणे कितपत योग्य ठरेल?
-टग्या
Please let me know how to enter here in Marathi or do you have to start a Baraha package to do that? If that is the case we need a tool that will allow to start the Baraha writer here itself.
Shreehari Marathe
--raja 14:01, 19 फेब्रुवारी 2006 (UTC)
Archival
[संपादन]Hi,
- The page has become big enough to be archived.
- Please conclude as many discussions as possible, since we can archive this page.
- In case of need, we can always re-open the thread on new page.
- Regards,
Harshalhayat 04:25, 19 डिसेंबर 2006 (UTC)
नवे पान संपादित करताना येणारी अडचण
[संपादन]हल्ली नवे पान संपादित करताना 'जतन करा' ही कळ दाबल्यावर खालील निरोप दिसतो. पुन्हा बॅक बटन दाबून पुन्हा लिखाण जतन करावे लागते.
या लेखात सध्या काहीही मजकूर नाही. तुम्ही विकिपिडीयावरील ईतर लेखांमध्ये या मथळ्याच्या शोध घेउ शकता किंवा हा लेख लिहु शकता.
हे असे का होते?
priyambhashini 17:05, 16 जानेवारी 2007 (UTC)
- गेली काही मिनिटे विदागार (डेटाबेस) तात्पुरता बंद होता. गेले काही दिवस काही कारणाने काही काम चालू आहे. बॅक कळ दाबून परत जतन करा दाबल्यास सहसा काम होते.
- जतन कराच्या ऐवजी संचय करा असे वापरावे काय? (धन संचय, इ.)
- अभय नातू 17:08, 16 जानेवारी 2007 (UTC)
- साठवा कसे वाटतं? विंडोज xp वर जतन हाच शब्दप्रयोग वापरला जातो. संचय हा शब्द चांगला आहे पण त्याचा अर्थ save नसुन collect आहे. →→महाराष्ट्र एक्सप्रेस(च/यो)→→ 20:17, 16 जानेवारी 2007 (UTC)
नवीन माहिती कूठे लिहिली पाहिजे.
[संपादन]उदा.मी उपक्रम संकेतस्थळाविषयी माहिती लिहू इच्छीतो.(तशी माहिती सद्द घट्नेत चिटकवून दिली ते बरोबर आहे की चूक)तर कुठे लिहिले पाहिजे.
गौतमीपुत्र सातकर्णी
[संपादन]गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शालिवाहन या राजाबद्दल लिहित होते. या राजावर उपक्रमावर चर्चा झाली होती. त्यात हा २३ वा राजा नसून २५ वा राजा असल्याचे मत मांडले गेले होते. (J यांनी मांडले होते.) मला लेखांत ते टाकायचे आहे. शककर्ता शालिवाहन या लेखात मी सध्या ते तिरप्या अक्षरांत टाकले आहे परंतु ही विश्वकौशीय पद्धत नाही असे वाटते. तेव्हा हा भाग लेखात कसा टाकावा याबद्दल कोणी सुचवणी करेल का? तसेच, हा लेख गौतमीपुत्र सातकर्णी, शातकर्णी अशा नावांनीही पुनर्निर्देशित व्हायला हवा असे वाटते.
धन्यवाद. priyambhashini २२:४२, ८ ऑगस्ट २००७ (UTC)
संदर्भ द्यायची पद्धत
[संपादन]प्रिया, विकिपीडियावर असे संदर्भ सुपरस्क्रिप्टमधील आकड्याने चिन्हांकित करून व त्याला लेखातील 'संदर्भ' विभागातील अवतरणाचा/संदर्भाचा दुवा जोडून दिले जातात. उदा. बुद्धिबळ लेखातील 'संदर्भ' हा सर्वांत शेवटी असलेला विभाग बघा. यात प्रत्येक संदर्भाआधी एक उर्ध्वदर्शी बाण लिहिला आहे. या बाणाच्या दुव्यावर क्लिक केले असता तुम्हाला तो संदर्भ जिथे वापरला असेल ते वाक्य दिसेल. त्या वाक्यानंतर सुपरस्क्रिप्ट आकड्यावर क्लिक केले असता पुन्हा 'संदर्भ' विभागातील तो विवक्षित संदर्भ मिळेल.
मला वाटते, मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजले असावे :P. हे संदर्भ '< ref >' हे HTML tags वापरून देतात. त्याचा स्रोत तुम्हाला त्याच लेखात त्या-त्या ठिकाणी सापडेल.
--संकल्प द्रविड २२:३९, ९ ऑगस्ट २००७ (UTC)
difficult marathi words
[संपादन]Is it necessory to translate each n every thing in such a difficult marathi ? e.g लिहीण्यासाठी डावीकडील डबीत टिचकवा cannt it be simple and translated in day to day language
- येथे सर्वजण हौशी भाषांतरकर्ते असतात.आपल्याला काही मराठी शब्द कठीण वाटले तर सोपे [मराठी शब्द सुचवा] व मराठी विकिपीडियाला सहकार्य करा.आपण मराठी भाषिक असूनही शालेय शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाल्यामुळे मराठी शब्द कठीण भासत असतील तर Support requirements of people using Marathi as Second Language येथे आपल्या करिता अधिक माहिती उपलब्ध असू शकते.
61.17.75.180 १०:५८, २ जुलै २००९ (UTC)
can anyone translate the wikiproject Plants/Template in marathi for me?-Abhay/Kshitij pl help.so that i can go ahead. bhatkya ११:४२, २३ जुलै २००९ (UTC)
योग्य नाव
[संपादन]मानचिन्ह असलेले पक्षी नावाचा नवीन लेख मी संपादीत करीत असून या लेखाचे नाव इंग्रजी विकि प्रमाणे List of Indian State Birds सारखे असावे की आणखी काही ते कळले नाही, कोणी योग्य बदल (करावयाचे असल्यास) करतील का? Gypsypkd १४:१६, २४ सप्टेंबर २००९ (UTC)
- भारतातील राजमान्य पक्षी हे नाव कसे वाटते?
- अभय नातू १६:२०, २४ सप्टेंबर २००९ (UTC)
How to write new topics.
[संपादन]Namaskar Mandali, I am new here .i am facing problem of how to write new topics. i am interested in writing . Can any one sugest where to get that info at one place.Plz help.
- Akshay Sawadh
वैशिष्ट्यपूर्ण
[संपादन]विशेष या शब्दापासुन वैशिष्ट्य (विशेष असलेला) हे शब्द बनले आहेत.त्यापासुन वैशिष्ट्यपूर्ण असा शब्द बनतो.अनेक लेखात वैशिठ्यपूर्ण असा शब्द बघावयास मिळतो. अचुक शब्द कोणता? जाणकार कृपया मार्गदर्शन करतील काय? उदा. दिलवाडा मंदिर वि. नरसीकर (चर्चा) ०७:४३, ३ जानेवारी २०१० (UTC)
- वैशिष्ट्यपूर्ण' हेच लेखन बरोबर आहे; वैशिष्ट्यपूर्ण हे लेखन चूक आहे. 'विशेष' या शब्दापासून बनलेले विशेषण विशिष्ट; आणि 'विशिष्ट' या विशेषणापासून बनलेले गुणवाचक नाम म्हणजे 'वैशिष्ट्य'. या गुणवाचक नामापासून बनवलेले साधित विशेषण म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण.
- 'विशिष्ठ', 'वैशिष्ट्य', 'वैशिष्ट्यपूर्ण' हे शब्द अगदी चूक आहेत. बहुधा ठसक्यात बोलताना/लिहिताना किंवा शिष्ठपणा करताना अशा चुका होत असाव्यात (हे शेवटचे वाक्य मिस्किल कोटी करण्यासाठी लिहिले आहे; गांभीर्याने घेऊ नये. :) ).
- --संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०५:५०, ४ जानेवारी २०१० (UTC)
खुलाश्याबद्दल धन्यवाद. वि. नरसीकर (चर्चा) ०७:३९, ४ जानेवारी २०१० (UTC)
अवर्गीकृत चित्रे
[संपादन]अवर्गीकृत चित्रे मधील चित्रांचे वर्गीकरण कसे करावे? नेमके काय करावे? Gypsypkd ०४:५४, १९ फेब्रुवारी २०१० (UTC)
प्रताधिकार
[संपादन]पोस्टाची तिकिटे प्रताधिकार मुक्त असतात का? उदा. [१] हे पहा. प्रताधिकाराचे उल्लंघन होत नसेल तर नवीन चित्रे चढवू का? Gypsypkd ०९:४१, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
- होय भारतीय पोस्टाची तिकिटे प्रताधिकारीत असतात,भारतीय संघशासनाचे जवळपास सारे प्रकाशित साहीत्य प्रताधिकारीत असते,एवढेच नव्हे सर्व कायदे आणि राज्यघटना इंग्रजी आणि भारतीय भाषात भाषांतरकरण्या पुरते प्रताधिकारमुक्त असतात , अभारतीय भाषात भाषांतरास मुक्त नसतात (हा बहुतेक स्वातंत्र्यपुर्व ब्रिटीश शासनाच्या सोयीचा भाग असावा पण अजून तरी कायदा तसाच आहे.) commons:Category:Stamps of India येथे ६० वर्षे उलटल्यामुळे प्रताधिकारमुक्त झालेली छायाचित्रे उपलब्ध आहेत केवळ तीच वापरावीत माहितगार १४:३९, ६ ऑगस्ट २०१० (UTC)
विकिपीडिया चावडी पान सुरक्षीत का केले गेले ?
[संपादन]मराठी विकिपीडियावरील सदस्य आणि त्याच प्रमाणात चर्चांची संख्या वाढत आहे.सर्व चर्चांचे एकत्र कडबोळे झाल्यामुळे बऱ्याच चर्चांना पुरेसा न्याय मिळत नाही चर्चांचे स्वरूप विस्कळीत रहाते त्या शिवाय सहाय्यपानांक्की निर्मीती करणाऱ्या सदस्यांकरीता सुद्धा ते गैर सोईचे ठरते. त्यामुळे चर्चांचे सुनियोजीत विकेंद्रीकरण करून प्रत्येक सदस्यांस संब्ंधीतचर्चेत सहभाग सुलभ व्हावा असा दृष्टीकोण आहे. चर्चा आधि मध्यवर्ति चर्चेत आणि मग वीशेष चर्चेत स्थानांतरण असे स्वरूप न ठेवता नवे स्वरूप संब्ंधीत चर्चा विषयात सरळ सहभाग.ज्या विषयांना विशेष चावडी नाही ते विषय इतर चर्चां चावडीपानावर घ्यावेत.
मुख्य चावडीपान हे केवळ मार्गदर्शनपर संकेतांच्या दालन स्वरूपात असणे प्रस्तावित आहे. मुख्यचावडीपानावर यापुढे अनवधानाने लेखन होऊ नये म्हणून ते सुरक्षीत केले गेले.या मुख्य पानाचे दालनपान म्हणून सुधारण्यात सर्वांचे स्वागत आहे. त्याकरिता हे पान तात्पुरते संपादनक्षम करून दिले जाऊ शकते. माहितगार (चर्चा) ०४:५०, ३ एप्रिल २०१२ (IST)
Updates & Ideas from and for Indic Communities
[संपादन]Greetings all! I thought it would be useful to share the following updates from various Indic communities - which you might find interesting for the Marathi community.
- Odia community had a great weekend between March 30 and April 2 - including 3 outreach sessions and 1 community meetup. They shared a great report that includes lessons, solutions and next steps on outreach & community collaboration - which are applicable across many communities.
- Wikisource is seeing increased participation across communities and there is's a story that was shared about Gujarati community's Wikisource as well as an update from Shiju on a tool (DjVu) that will be useful to all Wiki librarians. If you are not familiar with Wikisource and want to know a little bit more, Amir Aharoni has written a basic introduction about it.
- Malayalam community is organizing the first Indic wiki conference ever - Sangamothsavam - on April 28-29 in Kollam, Kerala. They have very sweetly invited other Indic Wikimedians to attend, and we know that a couple of communities are going to be sending delegate - because they can take back ideas to their own communities.
- A couple of interesting Wikiprojects are active across different Indic communities. The medical project is up and running in Assamese, Bangla, Odia, Malayalam and Telugu. The Kannada community is working on a translation enhancement project
- India Program worked to several Indic communities on outreach, ideas for helping newbies, Wikiprojects as well as other technical support - and have prepared the following report for March. In April, the plan is to continue this support including Hindi editing at the Crafts Museum GLAM project as well as planning the 10th anniversaries of Nepali and Assamese.
- There are regular IRC meetings to discuss Indic languages, outreach and communication support that India Program provides. These are all logged here - and there are a couple of useful ones on how to establish and build Indic Wikisources as well as outreach, especially for Indic languages. (IRCs are conducted one 1st & 3rd Thursdays of every month at 9pm IST at #wikimedia-office. Please do join in; you'll find them very useful.)
Please reach out to Shiju or I for any support you need. (Our email IDs are shiju@wikimedia.org and noopur@wikimedia.org respectively.)
Please share your comments and ideas below on any of these updates. Noopur28 (चर्चा) १४:५०, १८ एप्रिल २०१२ (IST)
- Banner मध्ये Chapter Membership बद्दल सांगण्याबद्दल धन्यवाद. त्यामधेच URL सुध्दा दिला तर अतिउत्तम. Sudhanwa (चर्चा) ०३:००, १९ एप्रिल २०१२ (IST)
Reference Tooltip Gadget
[संपादन]नमस्कार! मी Reference Tooltips ही स्क्रीप्ट माझ्या userspace मधे इंग्रजी विकिपीडिया वरून चालवली आहे. मराठी विकिपीडिया वर सुद्धा ती योग्य प्रमाणे चालत आहे. इंग्रजी विकिपीडिया प्रमाणेच मराठी विकिपीडिया वर सुद्धा याला gadget म्हणून वापरता येईल. Admins ने कृपया करून ही स्क्रिप्ट वापरून पहावी आपल्या common.js मध्ये त्या इम्पोर्ट करून. माझे common.js तुम्ही तसे चे तसे कॉपी करू शकता. कृपया करून Reference Tooltips ला gadget म्हणून promote करा ज्यानेकारून सर्वांना या सोयीचा लाभ घेता येईल. मी अजून काही gadgets वर भविष्यात काम करणार आहे. धन्यवाद! BPositive (चर्चा) ११:५५, ३ जानेवारी २०१३ (IST)
विकिपीडिया:चावडी/प्रगती हे जसे चावडीचे पान आहे तसे विकिपीडिया:चावडी/अधोगती असेही एखादे पान असावे काय? -संतोष दहिवळ (चर्चा) २०:०९, १९ जानेवारी २०१३ (IST)
- वरील मुद्द्याला कुणीही अजूनपर्यंत विरोधही दर्शविला नाही वा मतही मांडलेले नाही. याचाच अर्थ असे पान बनवण्यास हरकत नाही. तूर्तास माझा मुद्दा येथेच खाली गतिरोधक या उपशीर्षकाखाली मांडणार आहे. संतोष दहिवळ (चर्चा) २२:०१, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)
- संतोष, मराठी विकिपीडियावरील लेखांची संख्या व डेप्थ जर वाढण्याऐवजी कमी व्हायला लागली तर अधोगती ह्या पानाला अर्थ आहे नाहीतर असे पान कशासाठी? - अभिजीत साठे (चर्चा) २२:१०, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)
- अभिजीत, आपल्या प्रश्नाचे उत्तर म्हणजेच माझे खालील लेखन आहे. मला वाटते माझे लेखन झाल्यावर तुम्हाला आपोआपच उत्तर मिळेल.-संतोष दहिवळ (चर्चा) २२:२५, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)
- संतोष, मराठी विकिपीडियावरील लेखांची संख्या व डेप्थ जर वाढण्याऐवजी कमी व्हायला लागली तर अधोगती ह्या पानाला अर्थ आहे नाहीतर असे पान कशासाठी? - अभिजीत साठे (चर्चा) २२:१०, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)
- वरील मुद्द्याला कुणीही अजूनपर्यंत विरोधही दर्शविला नाही वा मतही मांडलेले नाही. याचाच अर्थ असे पान बनवण्यास हरकत नाही. तूर्तास माझा मुद्दा येथेच खाली गतिरोधक या उपशीर्षकाखाली मांडणार आहे. संतोष दहिवळ (चर्चा) २२:०१, ५ फेब्रुवारी २०१३ (IST)
गतिरोधक
[संपादन]अनेक सदस्य उचल-डकव पद्धतीने मिडियाविकिच्या सुविधा वापरताना दिसत आहेत. वास्तविक पाहता या सुविधा सर्व सदस्यांना उपलब्ध असाव्यात. पण त्या मराठी विकिपीडियावर उपलब्ध नसल्याने सदस्य इकडून-तिकडून आयात करुन वापरण्याचा प्रयत्न करतात. कधीकधी असे करणे शक्यही होते वा अपयशीही ठरताना दिसते. माझ्या निरिक्षणाप्रमाणे जे सदस्य वारंवार येथे येऊन योगदान देतात त्यांनाच या सुविधांची गरज भासते. यासाठी या सुविधा उपलब्ध करुन द्यायला हव्यात पण इथेच खरे गतिरोधक आहेत. मेख अशी आहे की हे गतिरोधक सदस्यांना या सुविधांपर्यंत जाऊच देत नाहीत. कारण या सुविधा फक्त प्रचालकांना उपलब्ध करुन देता येतात आणि आजपर्यंत एकाही प्रचालकाने एकही सुविधा उपलब्ध करुन दिलेली नाही(मात्र अजूनही च्चिक्कट्टून्न[१] आहेत) म्हणून प्रचालक हेच या प्रगतीतील खरे गतिरोधक आहेत.
- ^ (चिकटून+चिकटून)
विकिपीडिया | सुविधांची संख्या |
---|---|
ही यादी खाली कितीही वाढवता येईल पण मला काय सुचवायचे हे एवढ्यावरुनही लक्षात येईलच म्हणून यादी वाढवण्यात हशील नाही. यासाठी तांत्रिक कौशल्याची गरज आहे असे कुणी म्हणू नका किंवा पुढील एक-दोन दिवसांत याबद्दल संशोधन करुन समस्या सुटते का हे पाहतो असेही कुणी म्हणू नका किंवा..... कारण हे सगळे म्हणून झाले आहे आणि माझ्यापुरते(काही अंशी इतरांसाठीही) मी या सुविधांवर खुष्कीच्या मार्गाने उपाय शोधून या सुविधा अमलातही आणल्या आहेत. खरा प्रश्न सर्व सदस्यांसाठीच्या सुविधांचा आहे. असो. च्चिक्कट्टून्न राहा. -संतोष दहिवळ (चर्चा) ०१:०७, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- नमस्कार ,
- संतोषजी, तांत्रीक गोष्टी करून पहाण्यात आपल्या पुढाकाराचे मी स्वागत करत आलो आहे,आपण एक प्रगतीशील शेतकरी आहात याचा आम्हाला अभिमान आहे . समजा मी एका राज्याचा आरोग्य आणि कृषी मंत्री आहे, जेनेटीकली मॉडीपाईड बेणे/ शेतात शिंपडावयाचे एखादे केमीकल अथवा औषधी बाहेरच्या देशात आणि शेजारच्या राज्यात वापरली जाऊ लागली असेल काही प्रगतीशील शेतकरी स्वत्:च्या हिमतीवर ते राबवून पहातही असतील पण एक मंत्री म्हणून सार्वजनिक स्वरूपात अशी गोष्ट अमलात आणावयाची तर तथाकथीत बेणे ,केमीकल, औषध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खरोखर निरूपद्रवी आहे का याची खात्री, मी माझ्या राज्यातील डोक्टर शेती तज्ञ यांचा सल्ला घेऊनच करणार. शेतात दुष्काळ पडतो बोअर खणण्याचा निर्णय शेतकरी आणि गावातला न शिकलेला मेकॅनिकही पार पाडु शकतात पण म्हनून एखाद्या मंत्र्याने फूटा फूटावर बोअरच पाडून घेतले तर प्रत्यक्ष रिझल्ट अपेक्षे पेक्षा वेगळा होऊ शकतो.शास्त्रीय गोष्टीत शेतकरी, मेकॅनिकची,मेकॅनिक ITIची ITI इंजिनीयरची इंजिनीयर IITयन्ची IITन् PhDची कामे एकवेळ करु शकेल पण सार्वजनिक हिताचे सल्ले तज्ञांवर सोडले जातात. तेव्हा एक मंत्री प्रांजळपणे कि मी तज्ञांच्या सल्ल्याची वाट पाहतो आहे त्यास "यासाठी तांत्रिक कौशल्याची गरज आहे]] असे कुणी म्हणू नका" असा डायलॉग जरा निष्कर्ष-घाई आणि तार्किक उणीवेचा वाटतो.
- आता यात सार्वजनिक हिताचा प्रश्न कोणता आहे ? आपण नमुद करत असलेली बहुसंख्य उपकरने .js जावा बेस्ड आहेत . .js जावा बेस्ड प्रणाली security विषयक मोठे प्र्श्न निर्माण करनाऱ्या असू शकतात असे .js जावा क्षेत्राची माहिती आहे असे म्हणणाऱ्या मराठी विकिपीडियातील एका प्रचालकांचे आग्रही मत आहे.माझ्या दृष्टीने मराठी एथीकल हॅकर्स कडून अशा प्रणालींचे रेग्युलर Privacy आणि Security ऑडीट व्यक्तिगत प्रायव्हसीच्या दृष्टीने महत्वाचे आहे. आपल्याकडील बहूसंख्य शासकीय आधीकारी अगदी संरक्षण आणि संषोढन क्षेत्रातील सुद्धा वेबसाईट्सचा वापर डोळे झाकून करत असतात ; अगदी गेल्या एक दोन महिन्यातील गोष्ट आहे कि भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अगदी ऑपरेटींग सिस्टीम्स सहीत सर्व प्रणाली भारतात बनणे शिवाय इतर प्रणालिंचे रेग्युलर सुरक्षा ऑडीटचे महत्व भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने सांगत होते
- भारतीय लोक प्रायव्व्हसी आणि सेक्युरिटी बाबत किती लॅक्स आहेत याचा माझा गेल्या वर्षाभरातील अनुभव म्हणजे , मुंबईतील एका मोठ्या तंत्रज्ञान संस्थेच्या वेबसाईट वरील सहज नजरेस येणारी प्रायव्हसी concern मी त्यांच्या IT विभागाच्या HODंना इमेल करून विनंती केल्या नंतर दूर केला गेला.
- याचा अर्थ मी तांत्रीक सुविधा दिल्या जाण्याच्या विरोधात आहे असे नाही . मागच्याच वर्षाभरात सदस्य सिझर यांची एक विनंती होती त्यांचे स्वत:चे तांत्रीक पार्श्वभूमी आहे तरीही मी तांत्रीक चावडीवर इतर तज्ञांचे काही मते आहेत का या करिता वाट पाहिली कुणाचे काही आक्षेप आले नाही मराठी सिझर यांच्यावर विश्वास ठेऊन काम आमलात आणले.
- संतोषजी हे सर्व असूनही आपल्या टिकेचा मी आदर करतो .तांत्रीक क्षेत्रात प्रगती व्हावयास हवी या आपल्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे.
- स्वतंत्र चावडी बद्दल म्हणाल प्रगती चावडीवरच प्रगतीच्या मर्यादाम्ची चर्चा मी मागे स्वत: केलेली आहे आपणही करू शकता.तांत्रिक विनंती अथवा साधी आठवण तांत्रिक चावडीवर देता येते. प्रचालकांवर टिका करण्याकरता सुद्धा स्वतंत्र चावडी उपलब्ध आहे. अर्थात टिकेस कठोरपणा यावा म्हणून आपण योजलेल्या युक्तीचे (मनात कोणताही आकसाशिवाय) कौतूकच आहे. आपल्या या चर्चेकडे इतरही प्रचालक लक्ष देतील अशी आशा आहे.
- आपल्या आवडीचे लेखन आणि वाचन घडत राहो ही शुभेच्छा.
- द्या सुवीधा. लगेच सगळे गैरवापरच करतील असे कशा वरून? संतोष म्हण्तो आहे तर द्या ना... मला तरी काही चुकीचे वाटत नाहीये. खरे तर मी मागे ही वेगवान संपादने कशी करता येतील यावर चर्चा केली होती. पण तेव्हा तुम्ही अशा काही सुवीधा असतात असे सांगितले नव्हते. की ते काही निराळे असते? (कृउपया उत्तरे देतांना पाल्हाळ लाऊ नये. थोडक्यात व मुद्याचे(च) उत्तर द्यावे. - निनाद
- >> (कृउपया उत्तरे देतांना पाल्हाळ लाऊ नये. थोडक्यात व मुद्याचे(च) उत्तर द्यावे.
- विश्वकोश हा तर्कसंगत भूमीका मांडण्या करता आहे. व्यक्तिगत आरोप आणि चारीत्र्यहनन नकरण्याचे निय्म पाळल्या नंतर, तुम्ही तुमची बाजू कशी मांडता याचे तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझे मत/तर्क मांडण्याच्या शैलीचे माझे स्वातंत्र्य आहे.एखादा मुद्दा समजला नाही तर त्याबद्दल इच्छा झाल्यास पृच्छा करावी. "पाल्हाळ लाऊ नये. थोडक्यात व मुद्याचे(च) उत्तर द्यावे. " हि भाषा आणि दृष्टीकोण अंहकारवादी, मी शहाणा म्हणणारा अवहेलनात्मक आहे अशा दृष्टीकोणांना मी दुर्लक्षीत करतो आणि करत राहीन.
- शिवाय मी माझ्यावरच्या माझ्या लेखनाची लांबी जेव्हा फार अधिक असते तेव्हा "उत्तराचा विस्तृत भाग" नावाचा साचा वापरण्याची सवय सुद्धा केली आहे.
- दुसरे आपल्या या टिकेचे स्वरूप व्यक्तिगत आणि विषयांतरास कारणीभूत ठरणारे आहे.
- >>:द्या सुवीधा. लगेच सगळे गैरवापरच करतील असे कशा वरून?
- १) आपण माझा मुद्दा नीट वाचलाही नाही आणि लक्षातही घेतला नाहीत असे दिसते. मी सुविधा देण्यास नाही म्हटलेले नाही .चांगल्या तांत्रीक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता मी इतरांपेक्षाही अधीक उत्सुक आहे. त्यामुळे संतोष दहिवळांनी चर्चेस तोंड फोडले याचा मला मनोमन आनंदच झाला आहे.
- २) मराठी माणसांनी या सुविधा प्रणाली लिहिल्याच नाहीत तेव्हा ते याचा गैरवापर करतील असा प्रश्न नाही. (लेखन चालू)माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) ०९:३४, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- नमस्कार ,
- माहितगारजी, समजा एखादा आरोग्य आणि कृषी मंत्री आहे त्याने त्याच्या राज्यातील शेतकर्यांच्या हितासाठी जेनेटीकली मॉडीपाईड बेणे/ शेतात शिंपडावयाचे एखादे केमीकल अथवा औषधी निर्माण करण्यासाठी त्याच्याच राज्यातील डोक्टर शेती तज्ञ शेतकरी यांना चालना देऊन अशी निर्मिती करणे अपेक्षित आहे. पण समजा त्याच्या राज्यातील ही सर्व मंडळी निर्बुद्ध आहेत अशावेळी शेजारच्या देशातील वा राज्यातील अशी मॉडीपाईड बेणे/ शेतात शिंपडावयाचे एखादे केमीकल अथवा औषधी आपल्या राज्यातील शेतकर्यांच्या हितासाठी मागवणे अपेक्षित असते(लोकशाहीत) पण समजा असा एखादा आरोग्य आणि कृषी मंत्रीच निर्बुद्ध असेल तर त्याच्या राज्यातील शेतकरी परत त्याला मंत्रीपद देत नाहीत (ते त्याला पाडतात) असे आपल्या मंत्रीपदाच्या बाबतीत करता येण्याची शक्यता आहे का? बहुधा नसावीच.(कारण आपली मते उभी करण्याची क्षमता मी जाणून आहे) च्चिक्कट्टून्न राहा. -संतोष दहिवळ (चर्चा) १०:५२, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- बरं दुर्लक्ष्य करा. मी काय करणार करून? ही काही टिका नव्हती. उगाच तुमचा वेळ कशाला यात घालवायचा? म्हणून तसे लिहिले होते. मागच्या वेळी ही तुम्ही माझा उपमर्द करण्याचा प्रयत्न केला होता. पण त्या वेळीही मी ते नजरेआड केले होते. सामान्य सदस्य आहे म्हणून तुम्ही असे येता जाता लाथाडू नये असे म्हणतो. अशा प्रकारा विरुद्ध इतरत्र दाद मागत फिरता आले असते. पण माझा येथे येऊन राजकारण करत बसण्याचा हेतुच नाही. त्यामुळे 'हु केअरस्? गेला प्रतिसाद गाढवाच्या क्षांडीत' म्हणून मी दुर्लक्षच केले होते. पण आता सांगण्याची वेळ आली आहे की इतर सभासदांशी कसेही बोला. पण माझ्या बरोबर बोलतांना सदस्य या नात्याने योग्य मान राखून बोलावे.
संतोषराव, काय असतात या सुवीधा? कशा निर्माण करायच्या? मी मदतीला तयार आहे. कळवावे. -निनाद.
- श्रीमान निनादजी, आपण मराठी विकिपिडियावर जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगता आहात त्याच सर्वात अधीक रक्षण मीच केल आहे. प्रतिसाद देताना सर्वात अधीक संयम दाखवणारा प्रचालकही मीच आहे.
- मुद्याचे(च) मधे कंसातला च आणि "पाल्हाळ लाऊ नका" आशा आगाऊ सुचनांमुळे आपण केवळ माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना दिली यात आपला उपमर्द कसा होतो? आपणा कडून समोरच्या व्यक्तिची अवहेलना होते आहे हे लक्षात आणून दिले. हे असे अहंकारामूळे होते आहे असे मला वाटले पण तसे नसावे हे आपल्या आताच्या "उगाच तुमचा वेळ कशाला यात घालवायचा? म्हणून तसे लिहिले होते." संवादावरून जाणवते या संवादात मला संभावितपणा जाणवतो आहे.आपले गैरसमज दुर करण्याच्या दृष्टीने आपल्या मागच्या चर्चेत आपल्या व्यक्तिगत पानावर येऊन मी दिर्घ स्पष्टीकरण मांडले होते त्या चर्चेचा वस्तुत: इथे काही संबंध असावयास नको होता .आपण आपली जुनी दुखणी अजून विसरला नाहीत याची मला कल्पना नव्हती. आपल्याला मागच्यावेळी आपल्या व्यक्तिगत चर्चा पानावर येऊन पूर्णत: सौजन्यपूर्ण दिलेले स्पष्टीकरण आपण एखाद्या मुक्या प्राण्याच्या क्ष ठिकाणी वगैरे घातले हे वाचून मी सखेद स्तंभीत झालो आहे.विकिपीडियावरील सभ्य भाषेच्या संकेतात प्राणी वाचक उल्लेख बसत नाहीत याची मी आपणास सौजन्यपूर्ण आठवण देत आहे.
- आपला चर्चेतील मागील आणि या वेळचा एकुण सहभाग बघता आपण विषयाबद्दल पुरेशी माहिती करून घेण्याची तसदी न घेता प्रतिक्रीया देत आहात असे स्पष्टपणे जाणवते आहे. या प्रतिक्रीयातून आपण अप्रत्यक्षपणे टोकाच्या भूमीका घेऊ इच्छिता असा माझा ग्रह होऊ लागला आहे."माझा येथे येऊन राजकारण करत बसण्याचा हेतुच नाही." या आपल्या वाक्या बद्दल आता मात्र मी साशंक झालो आहे.हे दोन प्रसंग सोडले तर आपले माझ्याशी वाकडे असावे एवढा माझा आपल्याशी प्रत्यक्क्ष खूप संपर्क आला असे झालेले नाही तरी सुद्धा आपण माझ्या बद्दल गैरसमज का ठेऊन आहात या बद्दल आपण आपल्या सवडी आवडीनुसार मोकळे पणाने चर्चा करू शकता.
- माझ्या बरोबर बोलतांना सदस्य या नात्याने योग्य मान राखून बोलावे. हि जशी आपली (आणि सदस्यांची) माझ्याकडून अपेक्षा आहे तशीच अपेक्षा मीही ठेऊन असतो याचे स्मरण ठेवावे. (लेखन चालू)माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२५, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- निनाद,
- सुविधा या संपादकांचा वेळ वाचणणारी साधने(कळयंत्रे) असतात. मीच थोडासा तांत्रिक बदल करुन आयात केलेली एक सुविधा माझ्याच खुष्कीच्या मार्गाने वापरुन येथील एका प्रचालकांनी त्यांच्या एकूण योगदानाच्या ५६.२७% म्हणजे तब्बल ६१५९ संपादने केली आहेत. यात माझी टिमकी वाजवण्याचा हेतू नाही तर माहितगारांनी security विषयक मोठे प्र्श्न उपस्थित केला म्हणून नमूद करावेसे वाटले इतकेच. वेळ मिळाल्यास या सुविधांबाबतची सांख्यिकी(६१५९ संपादनांचीही) येथे मांडण्याचा प्रयत्न करील. - संतोष दहिवळ (चर्चा) १५:३१, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- नमस्कार माहितगार, संतोषजी,
- इतर विकी वरील साधने मरठी विपी वर आयात करण्यात मला तरी कुठलाही security विषयक प्रश्न आहे असे वाटत नाही. संतोष यांनी अनेक साधनांचा अभ्यास करुन त्या आमलात आणल्या आहेत. उदा. HotCat, Twinkle, AWB ई. साधने आयात करण्यासाठी आपण संतोष यांन आयातदार व आंतरविकि आयातदार हा role द्यावा असे वटते. मराठी विपी वर सध्या आयातदार व आंतरविकि आयातदार या role मध्ये कोणताही सदस्य नाही आहे, या मुळे हे गरजेचेच आहे. संतोषजी, आपली हरकत नसली तर, मी या साठी विकिपीडिया:कौल/आयातदार व विकिपीडिया:कौल/आंतरविकि आयातदार येथे कौल टाकू इच्छितो. - प्रबोध (चर्चा) १६:५५, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- नमस्कार प्रबोध,
- काही महिन्यांपूर्वी अभिजीत साठे यांनी असाच माझ्या नावाने प्रचालक पदासाठी कौल लावला होता त्यानंतर लगेचच संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडवत ज्या पद्धतीने घटना-घडामोडी व चर्चा घडल्या त्याचा अनुभव गाठीशी आहे(मी कोण, कुठला, काय करतो, काय खातो, काळा की गोरा हेही प्रबोधजी तुमच्यासारखेच अभिजीतला माहित नसावे असेच माझ्याही बाबतीत अभिजीतचे आणि तुमचेही असावे पण केवळ माझे काम पाहून त्यांनी कौल मांडला आणि तुम्ही कौल मांडण्याची तयारी केली असावी यातच मला ही पदे मिळाली. या विषयावर मी कुठेही आत्तापर्यंत टिप्पणी केलेली नव्हती अगदी अभिजीतनेही मला माझे मत मागितले होते पण ते कौल टाकल्यानंतर पण त्यानंतर ज्या वेगाने घटना घडवल्या गेल्या ते पाहून त्यांना मत देण्याचेही टाळले होते) आणि तसेही आयातदार व आंतरविकि आयातदार याविषयी मी पूर्णत: अनभिज्ञ असल्याने हे काम मला करता येणे अशक्य आहे. संकुचित मनोवृत्तीचे दर्शन चार महिन्यापूर्वीच्या काळातील विकिपीडियावरील घटना-घडामोडी-चर्चा आपण अभ्यासल्यास आपल्यालाही होऊ शकेल. असो. हा कौलाचा विषय इथला नाही नाहीतर मूळ चर्चा बाजूला राहून संभाव्य विषयांतर झाकले आहे हा साचा तयारच आहे. - संतोष दहिवळ (चर्चा) २१:५२, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माझ्या बरोबर बोलतांना सदस्य या नात्याने योग्य मान राखून बोलावे. हि जशी आपली (आणि सदस्यांची) माझ्याकडून अपेक्षा आहे तशीच अपेक्षा मीही ठेऊन असतो याचे स्मरण ठेवावे. (लेखन चालू)माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १४:२५, ७ फेब्रुवारी २०१३ (IST)
- त्यानंतर लगेचच संकुचित मनोवृत्तीचे दर्शन घडवत ज्या पद्धतीने घटना-घडामोडी व चर्चा घडल्या त्याचा अनुभव गाठीशी आहे>> आतातर प्रचालकपदाचा नविन उमेदवार सुध्दा आला आहे, ज्ञानदानाच्या (काम न करता अर्थातच) कामाला लागला आहे. थोड्याच दिवसात नविन प्रचालक मिळणार आहे आपल्याला.
- Mrwiki reforms (चर्चा) ०१:१२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
मित्रांनो, कृपया आपापसातील भांडणे थांबवून काही constructive कामे करू या का? संतोष, सुविधांबद्दल तुम्ही इथे सर्वात जाणकार असल्यामुळे कोणकोणत्या सुविधा सर्वांसाठी उपलब्ध असाव्यात त्यांची यादी करता का? त्यावर सदस्यांचा कौल घेऊन त्या सर्वांसाठी उपलब्ध करता येतील. HotCat definitely सर्वांना उपलब्ध करून देता येईल.
- क्षितिज पाडळकर (चर्चा) ०२:१२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- क्षितिज,
- हे म्हणजे तुम्ही माझाच प्रश्न परत मलाच विचारल्यासारखे झाले आहे >>सर्वांसाठी उपलब्ध करता येतील<< >>सर्वांना उपलब्ध करून देता येईल<<
- हेच तर मी मांडले आहे >>सर्व सदस्यांना उपलब्ध असाव्यात<< >>उपलब्ध करुन द्यायला हव्यात<< फक्त आपण शब्दात थोडासा बदल केला. माझ्याच (तुमच्या) प्रश्नाला मी उत्तर द्यायचे झाल्यास मी एवढेच म्हणेल या कामात येणारे अडथळे (गतिरोधक) सपाट करायला हवेत. आणि सुविधांच्या याद्यांचे दुवे तर सुरुवातीलाच दिले आहेत. - संतोष दहिवळ (चर्चा) १२:४०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- Oh common, मी तुम्हाला विरोध थोडीच केला, उलट पाठिंबाच दिला आहे आणि एक मार्गपण सुचवला (कौल घेण्याबद्दल)
- चला, तुमचे चालू द्या, मला जे gadgets आवडतील ते मी वापरत जाईल. या भांडणांतून सामान्य संपादकांसाठी काही चांगले निघाले तर उत्तमच.
- क्षितिज पाडळकर (चर्चा) २३:१८, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- संतोषजी, सध्या आपले आपले काम होणे महत्वाचे आहे. तुम्हाला आयातदार व आंतरविकि आयातदार हा role दिल्याने ही कामे पटापट झाली असती असे वाटते, परंतु असे केल्याने जर आणखी वाद होणार असतील तर हा विषय सध्या बाजुला ठेवुन मी हॉट कॅट साधन आयात करण्यासाठी प्रचालकांना निवेदन केले आहे.
- माहितगार (व इतर प्रचालक), आपणास जर या निवेदनावर सदस्यांचा कौल घ्यायचा असेल, तर क्रुपया सुयोग्य चावडी अथवा कौल पानावर असा कौल टाकावा हि विनंती - प्रबोध (चर्चा) १२:२२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- प्रबोधजी,
- जिथ पर्यंत मी प्रचालक म्हणून गोष्ट करावी अशी अपेक्षा आहे तर माझी अपेक्षा साधी सोपी आहे , एखाद्दा मराठी सॉफ्टवेअर तज्ञाने मराठी विकिपीडियावर .js सुविधेबाबत लेखी म्हणावे
- ".js च्या कोणत्याही प्रणाली वापरल्याने virus अथवा hacking किंवा इतर security issues शक्यच नसतात हे मी माझ्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानावर सर्व मराठी विकिपीडियन्सना आश्वस्त करतो"
किंवा
- " मी विशीष्ट ............. हि .js आधारीत प्रणाली सुविधा virus अथवा hacking किंवा इतर security issues च्या दृष्टीने तपासली आहे,किमान प्रथमदर्शनी हि सुविधा सार्वजनीक वापराच्या दृष्टीने सुरक्षीत आहे,हे मी माझ्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानावर सर्व मराठी विकिपीडियन्सना आश्वस्त करतो"
- किंवा
- सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडच्या प्रचालकाने हे काम कराव आणि मोकळ व्हाव.
- संकल्प द्रविडांचे स्वत:चेच वर्गिकरण या विषयावर सर्व शृत प्रेम आहे . त्यांनी " अभ्यास करून मत कळवतो." म्हणणे त्यापुर्वीच्या (इतर तांत्रिक सुविधेच्या चर्चातून) अभय नातूंनी .js संदर्भाने security प्रॉब्लेम्सच्या द्र्ष्टीने reservations नोंदवणे यामुळे, virus अथवा hacking किंवा इतर security issues असतील तर सुविधा सार्वजनीक स्वरूपात उपलब्ध करणाऱ्याची कायदेशीर जबाबदारी बनण्याची शक्यता असते. त्यामुळे मी उपरोक्त अपेक्षा करत असेन तर यात काही वावगे आहे असे मला वाटत नाही.
- मला बाकी burocratic कौल वगैरेंची या बाबत फार गरज आहे असे वाटत नाही.संतोषजींचे स्वत:चेही सॉफ्टवेअर क्षेत्रात मित्र आहेत त्यांनी माझी ".js आधारीत प्रणाली सुविधा virus अथवा hacking किंवा इतर security issues च्या दृष्टीने मित्रांशी चर्चा केली आणि सार्वजनीक करण्यास हरकत नाही एवढे कळवले तरी माझ्या दृष्टीने पुरेसे होते.संतोषजींकडून सध्या इतर विषयांची अनावधानाने सरमिसळ होते आहे . हा प्रश्न इतर विषयांची सरमिसळ न करता सोडवला गेला तर मलाही आनंदच आहे.
- सुरुवातीला माहितगारांनी "मराठी विकिपीडियावर सुविधा (special:Gadgets) उपलब्ध करुन दिल्या तर virus अथवा hacking किंवा इतर security issues असतील तर माझी कायदेशीर जबाबदारी बनण्याची शक्यता असल्याने माझे मराठी विकिपीडियावरील प्रशासक आणि प्रचालक हे दोन्हीही अधिकार काढून घेण्यात येऊन मला या जबाबदारीतून मुक्त करावे." अशी विनंती मेटावर टाकल्यास माझ्या सॉफ्टवेअर क्षेत्रातील मित्रांचा सल्ला मी येथे टाकणे माझ्या दृष्टीने पुरेसे आहे. - संतोष दहिवळ (चर्चा) १५:१२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- संतोषजी,गेली बरेच महिने मी लिहीलेल्या प्रत्येक वाक्याचा आपण तिरका विपरीत अर्थ काढणे चालवले आहे हे सखेद नमुद करावे लागते आहे. आपले हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का या आपल्या हेतुत अशी दुष्टता असेल तर मी आपल्यावर सध्या तरी विश्वास ठेवण्यास असमर्थ आहे.माझ्या अपेक्षा प्रचालक पदाच्या जबादारीच्या निर्वाहनाचा भाग आहेत मी माझी पदे आपल्या उपकाराने मिळवलेली नाहीत तरी सुद्धा आपल्या अस्विकरणीय सल्ले देण्याच्या उपद्व्यापा बद्दल आभारी आहे. माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १६:२०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माहितगार,
- >>एक मंत्री म्हणून सार्वजनिक स्वरूपात अशी गोष्ट अमलात आणावयाची तर तथाकथीत बेणे ,केमीकल, औषध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खरोखर निरूपद्रवी आहे का याची खात्री, मी माझ्या राज्यातील डोक्टर शेती तज्ञ यांचा सल्ला घेऊनच करणार.<<
- सांख्यिकी पाहात असताना माझ्या असे लक्षात आले की तुमच्याच मंत्रीमंडळातील एका सहकार्याने तथाकथीत बेणे ,केमीकल, औषध (सुविधा) वापरुन ६१५९ संपादने आजतागायत केली आहेत. तर त्यांनी वारलेले हे बेणे ,केमीकल, औषध सार्वजनिक हिताच्या दृष्टीने खरोखर निरूपद्रवी आहे का याचा सल्ला आपण त्यांना विचारुन घ्यावा. ते तज्ञ असण्याची शक्यता आहे कारण त्यांची प्रचालकपदी वर्णी आपणच संकल्प द्रविडांना सांगून केली होती (विकिचौकटीबाहेर) असे आपणच कुठेतरी लिहिल्याचे स्मरते. -संतोष दहिवळ (चर्चा) १३:२०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- सर्वप्रथम, .js च्या प्रणाली वापरल्याने virus अथवा hacking किंवा इतर security issues होतात अथवा नाही, या बाबत आपण एव्हढी चिकित्सा का करतो आहोत? हा प्रश्न आपण विपी च्या तज्ञ programmers वर सोडूयात की. शिवाय, आपण हे तर मान्य कराल ना की, विपी वरिल सुरक्षेची काळजी आपल्या सगळ्यांपेक्षा विपीच्या technical team ला जस्त आहे? मग, जर त्यांनी एखदी सुविधा दिली असेल, तर ती वापरण्यासाठी निश्चितच safe असणार! हि सर्व साधने वापरुन आपण करत असलेली manual कामे automate होतात. आणि, इतर भाषेतील विपी ही साधने वापरतात एव्हढे कारण माझ्यासाठी पुरेसे आहे. "Technically" आपण जेव्हा हॉट कॅट किंवा इतर कुठल्याही साधनाची script commons वरुन आयात करता, तेव्हा त्या script ची सर्व जबाबदारी त्यच्या source ची असते. या script ने कुठलाही उत्पात घातला तर तो १) सर्व भाषेतील विपी वर होईल व, २) त्याची जबाबदारी commons वर असेल. तरीही जर आपण प्रचालक या नात्याने हि साधने आयात करण्यात comfortable नसाल, तर आपण या बाबत एक कौल घ्यावा, म्हणजे हा निर्णय आपला (प्रचालकाचा) नसुन सदस्यांचा असेल. To be on the safer side, आपण प्रचालक या नात्याने साधने आयात करताना सरळ एक disclaimer टाकून द्या, म्हणजे प्रचालक या नात्याने आपणावर (अथवा इतर प्रचालकांवर) कोणतीही जबाबदारी नसेल. नहीतर सगळ्यात बेश्ट म्हणजे, संतोष दहिवळ, शंतनू या सारख्या तांत्रिक बाबतीतील तज्ञ मंडळींना आयातदार व आंतरविकि आयातदार हा role द्यावा, म्हणजे ही मंडळी नव्या साधनांचा सखोल अभ्यास करून ती मरठी विपी वरील इतर सदस्यांना उपलब्ध करून देतील. इथे सगळ्यात basic मुद्दा हा आहे, की आपल्याला (अथवा इतर प्रचालकांना) प्रचालक या नात्याने ही साधने सोइसकररित्या सर्वांना वापरता येतील याची सोय करायची आहे. आपण हे न केल्याने सदस्या हि साधने वापरु शकत नाही आहेत का? माझ्यासकट इतर बरेच सदस्य आजच्या घडीला हॉट कॅट वापरतात, मग यामध्ये security, virus, hacking हे प्रश्न उद्भवत नाहीत का? कळावे - प्रबोध (चर्चा) १७:३१, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माहितगार,
- >>एखाद्दा मराठी सॉफ्टवेअर तज्ञाने मराठी विकिपीडियावर .js सुविधेबाबत लेखी म्हणावे
- ".js च्या कोणत्याही प्रणाली वापरल्याने virus अथवा hacking किंवा इतर security issues शक्यच नसतात हे मी माझ्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानावर सर्व मराठी विकिपीडियन्सना आश्वस्त करतो"
- किंवा
- " मी विशीष्ट ............. हि .js आधारीत प्रणाली सुविधा virus अथवा hacking किंवा इतर security issues च्या दृष्टीने तपासली आहे,किमान प्रथमदर्शनी हि सुविधा सार्वजनीक वापराच्या दृष्टीने सुरक्षीत आहे,हे मी माझ्या सॉफ्टवेअरच्या ज्ञानावर सर्व मराठी विकिपीडियन्सना आश्वस्त करतो"
- संतोषजींचे स्वत:चेही सॉफ्टवेअर क्षेत्रात मित्र आहेत त्यांनी माझी ".js आधारीत प्रणाली सुविधा virus अथवा hacking किंवा इतर security issues च्या दृष्टीने मित्रांशी चर्चा केली आणि सार्वजनीक करण्यास हरकत नाही एवढे कळवले तरी<<
- माहितगारजी, हे असे अस्वीकारणीय सल्ले देण्याचा मक्ता तुम्हीच घेतला आहे काय? तरीही तुम्ही असे अस्विकारणीय सल्ले देण्याचा उपद्व्याप केल्याबद्दल तुमचेही आभार. माझ्या मित्रांचे लेखी आश्वासन कशासाठी? या सुविधा काय त्यांनी बनवलेल्या आहेत काय? या सुविधा ज्या मिडियाविकिने बनवल्या आहेत (सोप्या भाषेत ज्या मिडियाविकिचे सॉफ्टवेअर मराठी विकिपीडिया व अन्य ६८६ विकि वापरतात) त्या मिडियाविकिला जाऊन विचाराना.
- >>हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का<<
- चर्चा लावण्याचा मूळ उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या देण्यात येणारे अडथळे (गतिरोधक) दूर करणे हा पहिल्यापासून स्पष्ट आणि साफ आहे. संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु? - संतोष दहिवळ (चर्चा) १८:३६, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- >>माझ्या मित्रांचे लेखी आश्वासन कशासाठी?
- मी तुमच्या मित्रांचे लेखी आश्वासन कुठे आणि केव्हा मागितले आहे , जे नाही लिहिलेले वाचणे आणि मनाने जोडणे असे आपल्या कडून होते आहे . आपण स्वत्: तज्ञ असाल आपल्यावर विश्वास ठेवतो आपण आपल्या तज्ञ मित्रांशी चर्चा केली फोनवर कळवले इमेल ने कळवले तरी विश्वास ठेवतो. कळवणे शब्दाचे मराठी भाषेतील उपयोग चांगल्या अर्थाने समजावून घ्यावेत हि नम्र विनंती.
- >> संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु?
- तुमचा अभ्यास झालेला आहे तर शंका निरसनात काचकुच आणि गतिरोधक सपाट करण्याची व्यक्तिगत भाषा, सगळा त्रागा आब्बि आदळ आपट कशा करता होते आहे ? आपणास दिर्घ प्रतिसादांचा तिटकारा आहे पण माझी शैली माझी आहे.मी वर प्रबोधजींना दिलेला दिर्घ प्रतिसाद अर्थाचे अनर्थ करत नकरता वाचून घेण्याबद्दल पुन्हा एकदा विचार करावा हि सुद्धा नम्र विनंती.
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २०:५२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माहितगार,
- >>एखाद्दा मराठी सॉफ्टवेअर तज्ञाने मराठी विकिपीडियावर .js सुविधेबाबत लेखी म्हणावे
- हा एखाद्दा कोण? तो माझा मित्र नसेल हे तुम्ही कशावरुन म्हणता. ठिक आहे थोडावेळ मी मानतो तो एखाद्दा माझा मित्र असणार नाही पण त्या एखाद्दाचे लेखी आश्वासन कशासाठी? असे मी म्हटले तर जे नाही लिहिलेले ते वाचणे आणि मनाने जोडणे हे खोटे होईल काय? >>सगळा त्रागा आब्बि आदळ आपट कशा करता होते आहे ?<< हे जसेच्या तसे तुमच्यासाठी - संतोष दहिवळ (चर्चा) २१:२८, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- विकिपीडियावर लिहिले जाते ते "लेखी"च असते, फक्त तुमच्या भाषेत 'विकिचौकटीत' असे घ्यावे.एखाद्दा मराठी सॉफ्टवेअर तज्ञाने म्हणजे कोणत्याही मराठी सॉफ्टवेअर तज्ञाने,( तो तुमचा मित्र असला तरी त्याच्या वर मला बंदी घालण्याचे कारण नाही,पण इथे तुमचे 'मित्र' अभिप्रेत नव्हते) . तुमच्या करता (संतोष दहिवळांकरता इतरांपेक्षा अधीक विश्वास म्हणून तुम्ही कसे ही कळवा तुम्ही स्वत: तज्ञ असण्याची जरूरी नाही मित्रांशी चर्चा करून कळवा ) एवढा सगळा मोठेपणा मोकळीक दाखवूनही अर्थाचे अनर्थ करण्याची आगळीक आपण हाकनाक करून स्वत्:च्या मनातले गैरसमाजांना खत पाणी का घालता आहात .खत आणि पाणी दोन्ही गोष्टी तुम्हाला मला आणि विकिपीडिया समुदायाला कशा पडत आहेत?
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २२:४२, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माहितगार,
- तुमच्या उपकार आणि विश्वासाविषयी येथील चर्चेचा आधार घेऊनच
- >>मागच्याच वर्षाभरात सदस्य सिझर यांची एक विनंती होती त्यांचे स्वत:चे तांत्रीक पार्श्वभूमी आहे तरीही मी तांत्रीक चावडीवर इतर तज्ञांचे काही मते आहेत का या करिता वाट पाहिली कुणाचे काही आक्षेप आले नाही मराठी सिझर यांच्यावर विश्वास ठेऊन काम आमलात आणले.<<
- हा तुमचा खरोखरच मोठेपणा आहे की तुम्ही सिझरवर विश्वास ठेवून मिडियाविकित बदल करुन त्यांना (म्हणजे सगळ्यांनाच) ती सुविधा अधिकृत करुन दिली. अधिकृत या अर्थाने की ती मिडियाविकीचा भाग बनली.
- या अधिकृत सुविधेचा वापर करुन मराठी विकिपीडियावर झालेल्या संपादनांची संख्या ० (शून्य)
- आता माझ्या अनधिकृत सुविधांविषयी (अनधिकृत या अर्थाने की अजूनतरी मराठी मिडियाविकीत ही extensions जोडलेली नाहीत.)
- हॉटकॅट - ही अनधिकृत सुविधा वापरून झालेली संपादने ७४६८
- मी स्वत: हॉटकॅट ही सुविधा वापरुन केलेली संपादने ५२० + ११९
- अन्य एका सदस्याने हॉटकॅट ही सुविधा वापरुन केलेली संपादने ६१५९
- अन्य एका सदस्याने हॉटकॅट ही सुविधा वापरुन केलेली संपादने ६२
- अन्य एका सदस्याने हॉटकॅट ही सुविधा वापरुन केलेली संपादने ७१
- अन्य एका सदस्याने हॉटकॅट ही सुविधा वापरुन केलेली संपादने ५२४
- अन्य एका सदस्याने हॉटकॅट ही सुविधा वापरुन केलेली संपादने १३
- संदर्भसंहीता - ही अनधिकृत सुविधा वापरून झालेली संपादने ३७
- मी स्वत: संदर्भसंहीता ही सुविधा वापरुन केलेली संपादने ३६
- अन्य एका सदस्याने संदर्भसंहीता ही सुविधा वापरुन केलेली संपादने १
- विकिएडिट - ही अनधिकृत सुविधा वापरून झालेली संपादने १००
- ट्विंकल - ही अनधिकृत सुविधा वापरून झालेली संपादने २३
- बाह्यसंपादक - ही अनधिकृत सुविधा वापरून झालेली संपादने २७
- मी स्वत: बाह्यसंपादक ही सुविधा वापरुन केलेली संपादने २७
- उपकाराची भाषा मला संकुचित मनोवृत्तीची वाटते आणि विश्वासाच्या भाषेत बोलायचे झाले तर एकूणच आत्तापर्यंत अधिकृत सुविधा वापरुन झालेली संपादने ० (शून्य) तर अनधिकृत सुविधा वापरुन झालेली संपादने ७६५५ असे असल्याने सध्यातरी अधिकृतवर विश्वास ठेवावा की अनधिकृतवर(कोणी कोणावर) याबाबत मी काही बोलत नाही हे मी ज्याचे त्याच्यावर (वाचणारावर) सोपवतो. - संतोष दहिवळ (चर्चा) २२:३०, ८ फेब्रुवारी २०१३ (IST)
- >>हि चर्चा लावण्याचे मूळ उद्देश स्वच्छ आहेत का<<
- >>चर्चा लावण्याचा मूळ उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या देण्यात येणारे अडथळे (गतिरोधक) दूर करणे हा पहिल्यापासून स्पष्ट आणि साफ आहे. संयोगाने पहिलाच गतिरोधक तुमचा येत असेल तर त्याला मी काय करु? -
- तुम्हाला पहिला प्रतिसाद देतो मदतीचे हात देतो, त्यांना तुम्ही गतीरोधक म्हणता आहात ? (हे तुम्ही केवळ माझ्या बाबतीत नाही इतरांच्याही बाबतीत करता आहात ) .माझा आपल्याला जुना प्रतिसाद पहा:
- >>माझा जुना प्रतिसाद>>नमस्कार आपण नोंदवलेला बग पाहीला, बग नोंदवण्याबद्दल पुढाकार घेतल्या बद्दल अभिनंदन. इंग्रजी व इतरही विकिपीडियातील इतरही चांगल्या सुविधा मराठी विकिपीडियावर आणण्यास पुढाकार घेतल्यास स्वागतच आहे.इंग्रजी शिवाय इतर भाषातील विकिपीडिया जसे जर्मन फ्रेंच इत्यादी सुद्धा वेग वेगळ्या सुविधा राबवून घेत असतात त्यांचे अध्ययन गुगलच्या ट्रांसलेशन सुविधेच्या आधारे करता येऊ शकते. नविन फळीतील/पिढीतील लोक पुढाकार घेत आहेत हे अधिकाधीक व्हावे म्हणजे मराठी विकिपीडियाची प्रगती अधिक वेगाने होईल
- असा प्रतिसाद देणाऱ्याकडे सर्व सामान्यपणे कस म्हणून पाहिल जात ? आणि माझे मराठी विकिपीडीयातील माझे बहुसंख्य व्यक्तिंना बहुसंख्य वेळी प्रतिसाद सहाय्य देणारे आणि गोड भाषेतच आहेत.(माझी मत उभ करण्याची क्षमता या गोड भाषेनी विकिचौकटीत तयार झालेल्या सौहार्दपूर्ण मैत्री पर्यंतच मर्यादीत आहे, आणि आपला उद्देश "उद्देश सुविधा उपलब्ध करुन देणे " पर्यंत मर्यादीत आहे तर आपण इतर विषय का चघळलेत ?व्यक्तिद्वेष हा उद्देश नसेल तर , सभ्यपणे पार करता येणारे अडथळे पार पाडताना by hook or crook चा मार्ग कशामुळे ?)
- माझही अर्ध तप सॉफ्टवेअर कंपन्यातच गेल आहे ? मला काय येत आणि काय नाही ? काय आणि केव्हा मागावयास हव याच व्यवस्थीत भान मला आहे .एखादी व्यक्ति स्वत:च्या मर्यादा जाणून कबूल करते , झुकत माप घेते म्हणजे लगेच , नापास होते का काय ? सदसद विवेक बुद्धीने स्वत:च्या माहितीच्या मर्यादा कबुल जबाबदारिचे निर्वहन करण्याकरता माहिती मागणाऱ्यांना निर्बुद्ध ठरवता ? बुद्धी सर्वांनाच असते तशी मलाही आहे,उलटपक्षी तशी ती नसती तर उलट पक्षी तुम्हाला नसलेल्या अडथळ्यांचे भास झाले नसते. परिस्थिती नुसार प्रत्येकाला वेगवेगळे ज्ञान आणि exposure मिळालेले असते.
- माझे सोडा, संकल्प द्रविड विकिपीडियावर केव्हा होते आणि नव्हते याचे हिशेब मांडून तयार आहेत त्यांना आपण पुन्हा आठवण दिली होती काय ? त्यांनाही तुम्ही तुमच्या व्यक्तिद्वेषाचे शिकार केले आहे तेव्हा त्यांनाही वजा करू. तुमचे मित्रवर्य प्रचालक अभिजीत साठेजी अगदी या पानावरच्या चर्चेस तुम्ही सुरवात करून वेगळे वळण देई पर्यंत होतेच ना . आपला मुख्य उद्देश "सुविधा उपलब्ध करुन देणे " एवढाच मर्यादीत आणि स्वच्छ आहे तर प्रचालक अभिजीत साठेजींना विनंती करून पूर्ण करून घेता आला असता , चौकटीत चौकटी बाहेर आपण इतरही प्रचालकांशी संपर्कात असता त्या पैकी कुणाला कधी संपर्क करावा असे वाटले नाही ? मला वाटते तुम्ही ज्यांचा आद्य-व्यक्तिद्वेष करत त्या मंदाररावांनीही आपले काम बहुधा कोणतेही प्रश्न न विचारता केले असते का हे किमान गंमत म्हणून तरी तपासावयाचे होते.राहुल आणि मंदार आणि बहुधा अभिजीतजींनीही माझ्या सारखा आपणास नकोसा होणारा क्वालिटी चेकचा आग्रह धरला नसताच.
- आपण गतिरोधक काढण्यापुर्वी ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून आश्वस्त करण्याचा शंका निरसनाचा करून घेता येईल का ? याचा अंधूकसा किरणसुद्धा का दडपत आहोत ? संतोषजी आपण सर्वांना सुविधेचे दागिने देऊ इच्छिता आहात, ते दागिने खुप सुंदर आहेत , यापुर्वी सुंदर लोकांनी घातले आणि आपल्या कडच्या वापरणाऱ्यांचे सौंदर्य खुलणारच आहे यात मला काही वाद नाही. मी दागिन्यातल सोन २४ कॅरटच असल पाहिजे त्यात तांब आहे का पितळ या कशाचीही चौकशी करत नाही आहे .फक्त आपण जे दागिने देतो आहोत ती तयार होताना त्यात काही हानीकारक त्वचेस लाख नाही हे तपासता येईल का ?बाकीचे लाखो लोक सोन्याचे कॅरेट लाख न पहाता वापरत असतील नसतील आपल्या गावात येणाऱ्या सोन्याची सोन्याच्या सुरक्षीत ठेवले जाण्याची काळजी संबंध गावानी घेतली तर फायदा कुणाचा? का सोन्याच्या सुरक्षेची काळजी घ्या म्हणणारा कोतवालच चुकीचा ? आयात होणाऱ्या गव्हा सोबत गाजर गवताच बियाण येत नाही आहे हे बघता येईल का ?माणसाला अन्न वस्त्र निवाऱ्या नंतर सुरक्षा सर्वात महत्वाची समजली जाते, जर तुम्ही इतके महिने आणि मी इतकी वर्ष एखाद्या गोष्टी शिवाय कळ काढली आहे तर संतोषजी उलटपक्षी आम्हाला हव आहे, जे हव आहे ते चांगल तपासून सुरक्षीत हव आहे अस तुम्ही माझ्या खांद्याला खांदा लावून म्हणावयास हव होत .हे होऊ शकल नाही कारण 'सुविधा उपलब्ध करुन देणे' एवढा मर्यादीत न ठेवता व्यक्तिद्वेषाच्या काटेरी कुंपणाला हात घातलात .तेही ठिक पण व्याख्या '(सुरक्षीत)सुविधा उपलब्ध करुन देणे' अशी केली असतीत तर माझा मदतीचा हात समजणे अधीक सुलभ झाले असते.
संतोषराव व्यक्तिद्वेषाच्या काटेरी निवडूंगातून बाहेर येऊन पहा इथले तथाकथीत गतीरोधक अत्यांत लवचिक आणि मित्रपूर्ण आहेत, सध्यातरी गतीरोधकाच्या उंचीचा आधार घेऊन काटेरी निवडूंगात अडकलेल्या आमच्या लाडक्या मित्राला सोडवता येईल का याचा प्रयत्न खरेतर जास्त महत्वाचा आहे.केवळ संकेत पाळण्या करता पाळण्या पेक्षा निवंडूंगातून बाहेर पडण्या करता पुढे आलेल्या हातांवर संशय न बाळगता हात हातात घ्या , नावा प्रमाणे संतोष आजूबाजूला विकिपीडियावर सर्वत्र वातावरणात बागडताना पहावयास मिळेल.
- तुम्ही अभिजीत साठ्यांना मदत केली किंवा प्रचालक पदाचा प्रस्ताव मांडला तर तुम्ही-नरसिकर वाईट होता का ? किंवा तुमचा प्रस्ताव मांडणारे अभिजीत साठे वाईट होतात का , किंवा तुम्ही अजून कुणाच नाव घेतल तर ते नाव तुमच्या तोंडातन बाहेर पडल तर वाईट म्हणून इतरांनी द्वेष करावयाचा का ? या आणि अशा कारणा करता मी तरी कूणाकडे व्यक्तिगत रोख करत नाही.तसा आपण सिझर बद्दल करत नसणार असा विश्वास आहे. एखादी सुविधा चालू करून दिल्या नंतर लक्षदा वापरली गेली तर आनंदच आहे , ती शुन्य वापरली म्हणून सुविधा मागणारा देणारा आणि न वापरणारे दोषी आहेत किंवा आपण केल्या प्रमाणे तुलना इथे लागू होते असे वाटत नाही.
- तुम्ही हव्या असलेल्या .js सुविधा सदस्य त्यांना अधिकृत उपलब्ध युजर स्पेस मध्ये स्वत्:च्या रिस्कवर स्वत:पुरती वापरतात म्हणून त्यात अनधिकृत असे काही आहे असे मला वाटत नाही. पण .js सुविधा मी सामायिक करतो तेव्हा ती असंख्य लोकांच्या ब्राऊजर मधून अकल्पितपणे लोड होणार असेल .त्यात आपण सर्वांना सुविधे सोबत रिस्क कंपलसरीली शेअर करण्या पुर्वी एक पाऊल थांबून risk evaluation शास्वती शंका निरसन कालमाना प्रमाणे तपासणी सुरक्षीतता या गोष्टी दिल्या जाणाऱ्या सुविधेचा अविभाज्य भाग असू नयेत असे का ?
(लेखन चालू )माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १०:०२, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माहितगार,
- मूळ विषयाला खुबीने बगल देऊन मीच कसा चक्रव्यूहात अडकलो आहे असे भासवण्याचा तुम्ही चालवलेला केविलवाणा प्रयत्न अत्यंत खेदजनक आहे.
- >>चौकटी बाहेर आपण इतरही प्रचालकांशी संपर्कात असता<<
- असे म्हणून माझी प्रतिमा मलीन करणे हेही आश्चर्यकारक आणि अत्यंत खेदजनक आहे.
- इतर प्रचालक किती? तुम्ही धरुन इनमिन १०. त्यांच्याशी असलेले विकिचौकटीबाहेरचे संपर्क मी नीतिसंकेतांना धरुन येथे देत आहे
- अभय नातू - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - नाही), (विपत्र (ई मेल) - १), (विपत्र कुणी कुणाला - मी अभयला (तेही अभयने मला ई मेल करण्याची विनंती केली होती म्हणून)
- माहितगार - (प्रत्यक्ष परिचय - एकदा(माझ्या सॉफ्टवेअर मित्राच्या कार्यक्रमात), (दूरध्वनी संपर्क - ५ किंवा ६ वेळेस, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - मी माहितगारांना ), (विपत्र (ई मेल) - नाही),
- संकल्प द्रविड - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ३ वेळेस, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - संकल्पने मला), (विपत्र (ई मेल) - २), (विपत्र कुणी कुणाला - दोन्हीही संकल्पने मला)
- राहूल देशमुख - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ३ किंवा ४ वेळेस, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - राहूलने मला ), (विपत्र (ई मेल) - २), (विपत्र कुणी कुणाला - दोन्हीही राहूलने मला)
- अभिजीत साठे - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
- नरसीकर - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - १, पहिला दूरध्वनी कुणी कुणाला - मी नरसीकरांना), (विपत्र (ई मेल) - ०)
- कौस्तुभ - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
- कोल्हापूरी - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
- श्रीहरी - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
- सुभाष राऊत - (प्रत्यक्ष परिचय - नाही), (दूरध्वनी संपर्क - ०), (विपत्र (ई मेल) - ०) अर्थात कोणताही संपर्क नाही.
- या संपर्कात झालेल्या विषयासंबंधीचे इत्यंभूत तपशीलही मी येथे देऊ इच्छित आहे तरीही ज्यांच्याशी माझा संपर्क झाला आहे त्यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी मला त्यांच्याशी झालेल्या संपर्काचे इत्यंभूत तपशील मला जाहीर करण्याची परवानगी द्यावी. किंवा स्वत:हून जर ते जाहीर करत असतील तर माझ्याशी झालेल्या संपर्काविषयीची संपूर्ण माहिती त्यांनी जाहीर करण्यास मी पूर्ण परवानगी त्यांना देत आहे. आणि अशी परवानगी मला मिळत नसेल आणि माझी प्रतिमा मलीन करणे चालूच राहिले तर सर्व नीतिसंकेत झुगारुन योग्य वेळी योग्य ठिकाणी मी हे सर्व तपशील जाहीर करील. - संतोष दहिवळ (चर्चा) १२:२१, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- मूळ उद्देश 'सुविधा उपलब्ध करुन देणे ' एवढा मर्यादीत होता तर कोणत्याही सेंसेशनलायझेशन शिवाय चावडी/तांत्रिक वर स्मरण> प्रचालकांना निवेदन > फारतर एखाद्या प्रचालकाच्या चर्चा पानावर विनंती विषय संपला . खर कि नाही ? या पानावर तर या पानावर , 'सुविधा उपलब्ध करुन देणे ' एवढच उद्दीष्ट चर्चेच असेल तर तुमचे दोन चांगले मुद्दे मी स्वकारतो, माझा एक चांगला मुद्दा तुम्ही स्विकारता हे झाल हेल्दी डिस्कशनची पद्धती . वरची संपूर्ण चर्चा वाचणाऱ्या कुणासही लक्षात येईल कि मी, तुमचे आणि इतरांचे चांगले मुद्दे मोकळ्या मनाने स्विकारतो आहे.तुमचे मात्र एका गोष्टीची चर्चा केली की दुसरीकडे विषय नेणे चालु आहे.जर तुमचे तर्क दृष्टीकोण १००% पुर्वग्रहांनी प्रेरीत असतील तर त्यात तार्कीक उणीवा असतील, आणि त्या स्पष्ट केल्या आहेत.त्यांना बगल देण्याकरता आपण विषयांतराचा मार्ग स्विकारता आहात का व्यक्तिविद्वेषाने ?
- या पानावर चौकट शब्दावर सर्च दिला तर तो प्रथमत: कुणी काढला तुम्ही का मी ? चला माझ्या प्रश्नात बदल करतो "आपण इतरही प्रचालकांशी संपर्कात असता त्या पैकी कुणाला कधी संपर्क करावा असे वाटले नाही ? सुविधा हवी असण्याचे महत्वा बद्दल एवढी खात्री आहे तर प्रचालक श्री अभिजीत साठेजींना विनंती का नाही केली (चौकटीतही उपलब्ध होते ना, होते की नव्हते) ? या प्रश्नांना कोण बगल देत आहे ?"; चौकट माणसा करता आहे का माणूस चौकटीकरता ? इतरांवर सोडा तुमचा स्वत:वर तरी विश्वास आहे कि नाही ? १ वेळा करा का चार वेळा चौकटी बाहेर आपल्याला संपर्क करता येतो ना ? तुम्ही चौकटी बाहेर संपर्क केला म्हणजे काही वाईट केले असे कुठे म्हटले आहे का? प्रणाली सुविधांची बद्दल आश्वस्तता येण्याची गरज नाही इतपत इमर्जन्सी आहे तर तोडा की चौकट. कूणाही कळत्या माणसाला इमर्जन्सी कशाला म्हणावे आणि कशाला म्हणू नये याचे तारतम्य असते असे अभिप्रेत धरले जाते.
- आपले जन्मो जन्मीचे तथाकथीत हाडवैर :) काही क्षणांकरता बाजूस ठेऊन चौकटीस अधिक व्यवस्थीत समजून घेण्याचा प्रयत्न करा.
- माझ्या मते कोणत्याही समाजास, सामाजीक संकेतांची आणि चौकटींची गरज जेवढी आहे तेवढी काळानुरूप केली आणि बदलली पाहीजे. संकेत आणि चौकटी जशाच्या तशा आयात करून अधंपणे अमलात आणण्या पेक्षा समजून घेऊन समाजाला सजग करून गरजे प्रमाणे वापरावयास हव्यात. (लेखन चालू)माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १९:५६, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- माहितगार,
- मी यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील. एक मुद्दा स्पष्ट करतो येथे ज्यावेळी मी आपल्याला नावानीशी प्रतिसाद दिला आहे त्यावेळी आपल्या प्रतिसादानंतर तो जशास तसा या स्वरुपाचा दिलेला आहे. >>तुमचे मात्र एका गोष्टीची चर्चा केली की दुसरीकडे विषय नेणे चालु आहे<< एका गोष्टीची चर्चा केली की ही गोष्टच तुमची विषय सोडून असते दुसरीकडे विषय नेणे चालु आहे म्हणजे माझ्या मूळ विषयाकडे मी तो वळवतो आहे कारण चर्चा दुसरीकडे भरकटवत नेल्यावर काय होऊ शकते(जी तुमची खुबी आहे) हे मी येथे २००६ पासून असल्याने पूर्ण जाणून आहे. आता वर तुम्ही मांडलेला मुद्दा याच्याकडे गेला का? त्याला विचारले का? विनंती केली का? येथे कुणीही कुणाचा नोकर नाही जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे सवडीप्रमाणे येतो. त्यांच्याकडे जाऊन विचारायला, विनंती करायला ते माझे नोकर नाहीत की मी त्यांचा नोकर नाही. मी येथे चर्चेसाठी माझा मुद्दा मांडला आहे त्यांना वाटले तर येथे येतील जसे तुम्ही आला मी तुम्हाला येथे येण्याचे आमंत्रण दिले नव्हते ना! तुम्ही इतरांची नावे घेऊन त्यांना बळजबरीने येथे ओढण्याचा का प्रयत्न करत आहात? आणि हो काही माझ्या व्यक्तिद्वेषाचे शिकार झाले आहेत तर काहींचा आद्य व्यक्तिद्वेष करत होतो तर काहींच्या नावांचा अद्वातद्वा वापर करुन माझ्याविषयी व्यक्तिद्वेषाची बीजे इतरांच्या मनात रुजवण्याच्या आपल्या कुटील कारस्थानाचा मी निषेध करतो. पुन्हा एकदा स्पष्ट करतो सुविधा उपलब्ध करुन देणे किंवा त्या उपलब्ध करण्यात येणारे अडथळे(गतिरोधक) दूर करणे हा माझा हेतू स्पष्ट आणि साफ आहे (राहील आणि राहणारच) तसेच यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील. - संतोष दहिवळ (चर्चा) २०:४१, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- संतोषचे नाव मी प्रचालकपदासाठी सुचवले होते त्याचे पुढे काय झाले? I think Santosh has excellent grasp on Wiki technology and he can contribute significantly in its improvement. - अभिजीत साठे (चर्चा) २१:२९, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- >>मी यापुढे येथे फक्त संबंधित विषयावरच लिहिणार आहे
- प्रत्यक्षात तसे वागलात तर हि आनंदाची बातमी आहे.असे म्हणेन.
- >>आपण कितीही विषय वळवायचा प्रयत्न केला तरी माझे त्याकडे दुर्लक्ष राहील.
- माझी गाडी सध्या तुमच्या गाडीच्या मागे धावते आहे, पहिल वळण कोण घेते आहे जगजाहीर आहे..>>दुसरीकडे विषय नेणे चालु आहे म्हणजे माझ्या मूळ विषयाकडे मी तो वळवतो आहे<< आपण आपल्या तथाकथीत मुख्य विषयाबाबत मांडलेल्या मुख्य मुद्दांकडे सुद्धा दुर्लक्ष करून पुर्वग्रह दुषीत व्यक्तिद्वेषावर भर दिला आहे याला तुम्ही मुळ विषयाकडे जाणॅ म्हणता का काय? मुख्य विषयात सुरक्षे बाबत आश्वस्त करण्याच मी आवाहन केल आहे . ते धनुष्य कस पेलता येईल याचा विचार करा.
- >> जो तो आपापल्या मर्जीप्रमाणे सवडीप्रमाणे येतो........... ते माझे नोकर नाहीत
- मी इथे वगळून दाखवलेल्या शब्दा सहीत आपणास उमगले तर आनंद होईल. लोक एकमेकांकडे नोकर असतील तरच विनंती करण्या करता जातात हि माझ्याकरता बातमी आहे.आपल्या अशा उत्तराचे खरे कारण आपण निरुत्तर झाला आहात हे खरे आहे कि नाही हे इतरांना न सांगता स्वत:च्या मनासच विचारावे.
- >>मी येथे २००६ पासून असल्याने
- २००६ पासूनच्या केवळ नकारात्मक खुब्याच ठाऊक आहेत.मी आपल्यातल्या चांगल्याची वेळोवेळी कौतुक सुद्धा केले आहे.(तसे आपण करावे अशी अपेक्षा कुणीपण आपल्या कडून करणार नाही कारण आपण कुणाचे नोकर नाही आहात बरोबर ना ?) आपल्याला माझ्यातल्या चुकीच्या गोष्टी २०११ पुर्वी कधी नोंदवाव्याशा नाही वाटल्या बरोबर ना? माझ्या आधी इतर एखादी व्यक्ति प्रचालक होऊच कशी शकते याचा मनातून राग अद्यापही खदखदतो आहे त्यामुळे ज्यांच्यावर राग आहे त्यांच्या कोणत्याही गोष्टी जगन्मान्य अपराध समजून त्यांच्यावर प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यक्तिगत हल्ले करत रहाणे हा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे बरोबर ना?
- >>तुम्ही इतरांची नावे घेऊन त्यांना बळजबरीने येथे ओढण्याचा का प्रयत्न करत आहात?
- या चर्चेत मंदार कुलकर्णींचा काय संबंध होता ? आपणच त्यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष या चर्चेत ओढले ते बळजबरीनेच ना ?
- >>हो काही माझ्या व्यक्तिद्वेषाचे शिकार झाले आहेत तर काहींचा आद्य व्यक्तिद्वेष करत होतो
- मान्य केल्या बद्दल आभारी आहे.
- >>काहींच्या नावांचा अद्वातद्वा वापर करुन माझ्याविषयी व्यक्तिद्वेषाची बीजे इतरांच्या मनात रुजवण्याच्या आपल्या कुटील कारस्थानाचा मी निषेध करतो.
- sorry gentelman मी कुणाच्याही नावाचा अद्वातद्वा वापर केलेला नाही जवळपास प्रत्येक नावा सोबत जी' हे आदरार्थी वचन वापरलेले आहे.काही असेल तर उलटपक्षी खोटी माहिती लिहून तुमचेच कारस्थान पहिल्या पानवरून पुढे चालु आहे.मी मात्र आपल्या बद्दल समोर आणि माघारी मना पासून कौतुकाचेही शब्द लिहितो आहे. आपल्या बद्दल कुटील काय कारस्थानही करण्याचा प्रश्न नाही.तुमच्या विरुद्ध कारस्थाने करण्या करता मला इथे कोणी कोट्यावधिची जायदाद देण्यास बसले नाही. संतोषभाऊ स्वप्नातून जागे व्हा . व्यक्तिद्वेषाच्या स्वत्:च पसरलेल्या जंजाळातून बाहेर या.
- >>अडथळे(गतिरोधक)
- सशाची गोष्ट आहे झाडाचे पान पडले कि आभाळ कोसळले म्हणावयाची आम्ही ही आपल्या या लांडगा आला मनोवृत्ती कडे दुर्ळक्ष करतो.
- >> सुविधा उपलब्ध करुन देणे
- आपल्या या सर्व गोष्टीतून निष्पन्नतेची हमी असलेल्या गोष्ट साध्य होण्या करता आपणास शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सुरक्षा विषया बाबत सजग होण्या आवाहन .
माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) २१:५६, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- .js म्हणजेच जावास्क्रीप्ट आपण पहिल्यांदाच मिडियाविकित टाकणार आहोत का?
- जर उत्तर नाही असेल तर
- या .js स्क्रिप्ट मिडियाविकित टाकताना कोणकोणत्या सुरक्षा चाचण्या केल्या गेल्या? कुणाकुणाचे लेखी घेण्यात आले? याचा अहवाल उपलब्ध आहे का? उपलब्ध असल्यास तो मला कुठे पाहण्यास/वाचण्यास मिळेल? अशा कोणत्याही सुरक्षा चाचण्या, लेखी घेण्यात आले नसेल, अहवाल उपलब्ध नसतील तर यावेळी सुरक्षा चाचणीचा आग्रह कशासाठी? - संतोष दहिवळ (चर्चा) २१:३३, ९ फेब्रुवारी २०१३ (IST)
- प्रथमत: मुख्य विषयास अनुसरून मुद्देसूद चर्चा विषय उपस्थित केल्या बद्दल धन्यवाद.
- मी सुरक्षा चाचण्या केल्या गेल्या आहेत असा दावा केलेला नाही, केल्या जाण्याची गरज प्रतिपादीत केली आहे.तशी ती पुर्वी मराठी विकिपीडियाच्या चावड्यांवरून केली आहे. गरज केवळ सुरक्षा चाचण्यापर्यंत मर्यादीत ठेवलेली नव्हती.तर .js आणि .css चा इंग्रजी तसेच इतरही विकिपीडियांशी कंपॅरेटीव्ह स्टडी व्हावा आणि इंग्रजीच नव्हे इतरही विकिपीडियावरील चांगल्या सुविधा याव्यात. केवळ चावडीवर नव्हे टेक्नीकल माणूस दिसला कि कर या विषया वर चर्चा असा प्रयत्न असे.
- मिडियाविकी:Common.js चा शेवटचा एडीट पहा security fix: असे त्याचा आढावा दाखवतो म्हणजे security issues असू शकतात. (लेखन बाकी)
- मराठी विकिपीडियावर मी सुद्धा कधी काळी आपल्या प्रमाणेच मराठी टंकन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आग्रह धरला होता.अभय नातू नाही म्हणत आणि मी आणि कोल्हापुरी आग्रह धरत असू. कोल्हापुरी जुने प्रचालक होते गोष्ट न विचारताही केली असती किंवा आपल्या भाषेत गतीरोधक सपाट वगैरे करण्याची भाषा वापरली असती पण त्या वेळी तरी आम्ही तसे केले नव्हते. (या संबंधाने माझी आणि अभय नातूंशी झालेली जुनी चर्चा शोधून पहावी,विषय हाताळण्याच वेगळेपण लक्षात येईल) .पण म्हणून सुरक्षा चाचण्यांचे महत्व कमी होत नाही.(लेखन अपूर्ण)माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा)
हेतू स्पष्ट आणि साफ ठेवून अडथळा पार करुन एक सुविधा सर्वसामान्य सदस्यांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. दुसर्या गतिरोधकाच्या वेळी पुन्हा भेटूच. - संतोष दहिवळ (चर्चा) ०१:५५, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- तुमचा तथाकथीत अडथळा शौर्य पुर्वक पूर्ण केल्या बद्दल मी आपले अभिनंदन आणि खेद एकाच वेळी व्यक्त करतो. मी वर पुन्हा पुन्हा स्पष्ट केल्या प्रमाणे सुविधा उपलब्ध होऊन मलाही हव्या होत्या. खुपणारी खेदाचीगोष्टी एकुण खालील प्रमाणे आहे.
- मराठी तंत्रज्ञांनी सुरक्षा संदर्भाने तीळभर तरी या निमीत्ताने सजग व्हावे आणि पुढाकार घ्यावा असा प्रोत्साहीत करण्याचा प्रयत्न होता, ते झाले नाही (यात तांत्रिक पार्श्वभूमी असलेल्या प्रचालकांनी सुद्धा आत्मपरिक्षण करावयास हवे).
- दुसऱ्यांच्या आतंराळ यानातूनच राकेश शर्मा आणि सुनिता विल्यम्स ना पाठवून आम्हाला उचंबळून येत.अणू भट्टी आमच्या देशात हवी, मंत्री आपल्या देशातल्या तंत्रज्ञांना सांगतो आहे कि अरे जरा सुरक्षे करता तपासून घ्या . तर आमचे तंत्रज्ञ आणि जनता वात पेटवणारा बाहेर देशातून घेऊन येतात. मराठी विकिपीडिया दहावे वर्ष साजरे करू इच्छिणाऱ्यांना आत्म परिक्षण करण्याची सुद्धा करण्याची कुठेच इच्छा होऊ नये हे आश्चर्यकारक नाही पण खेद वाटणारे आहे.
- कृपया कूणी कुणावर व्यक्तिगत हल्ले करू नयेत.
- माहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला..? ) (चर्चा) १२:०८, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- अभिनंदन. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:१८, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- संतोष, आशा आहे की आपण प्रचालक ह्या पदाचा लाख उठवून सर्व गतिरोधक सपाट करण्यात पुढाकार घाल. मदत लागल्यास कळवा! अभिनंदन... - अभिजीत साठे (चर्चा) २३:४३, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- अभिनंदन. क्षितिज पाडळकर (चर्चा) ०५:१८, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
दुसरा गतिरोधक
[संपादन]दुसरा , तिसरा , चौथा ...आणि शेवटचा गतिरोधक म्हणजे संतोष दहीवळ हा विक्षिप्त भांडकुदळ व्यक्ती आहे हे सिद्ध झाले आहे. इथे पहा पहा झला रे हा सुरु.... -Ghatikar (चर्चा)
- सदस्य:Neetin kadu has been locked. - संतोष दहिवळ (चर्चा) १७:५९, १६ फेब्रुवारी २०१३ (IST)
वड्याचे तेल वांग्यावर
[संपादन]अरे वो संतोष आबे तुला प्रच्यालक नाही बनवले तर त्याचे प्रशास्कावरील प्रश्टेशन येथे तमाशा करून का काढतो. नौटंकी बंद कर. फुकट डोके दुखी आहे ....! - Neetin kadu (चर्चा) ००:२५, १० फेब्रुवारी २०१३ (IST)
- The perfect politics is ON here. Irrespective of the opposition of many members noted since last 3-4 months, Santosh Dahiwal is been made admin.
Reasons -
- 1. Internal setting of Mahitgar and Santosh,
- 2. Mahitgar came on back foot due to pressure from Santosh.
- 3. Mahitgar could not push his XXXX सदस्य:Czeror, so now pushed another one - Santosh Dahiwal.
- 4. Teri bhi tuch meri bhi chup So much bribe is taken by Mahitgar.....
- Santosh Dahiwal and Manitgar, Better resign now itself before it takes more deep drilled..... Polkhol (चर्चा) १०:२७, ११ फेब्रुवारी २०१३ (IST)
धन्यवाद
[संपादन]हॉटकॅट गॅजेट सदस्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल संतोष यांचे अभिनंदन आणि अनेकानेक धन्यवाद. यामुळे वेगवान वर्गवारीला मदत मिळेल. आता पुढील अजून कोणती गॅजेट उपलब्ध करून देणार? विकएड? खुपच मदत होईल! - निनाद
- मंडळी, संतोषला प्रचालकपद देण्यात यावे अशी मी पुन्हा एकदा मागणी करत आहे. कृपया येथे आपला कौल नोंदवावा. - अभिजीत साठे (चर्चा) ११:०१, १० फेब्रुवारी २०१३ (IST)