सायबेरियन रेल्वे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रशियाच्या नकाशावर लाल रंगाने दाखवलेला सायबेरियन रेल्वेचा मार्ग

सायबेरियन रेल्वे (रशियन: Транссибирская магистраль) हा रशिया देशामधील पूर्व-पश्चिम धावणारा व सायबेरिया प्रदेशाला युरोपियन रशियासोबत जोडणारा एक मोठा रेल्वेमार्ग आहे. राजधानी मॉस्कोपासून ह्या मार्गाची सुरुवात होते. ९,२८८ किमी धावणाऱ्या ह्या रेल्वेमार्गाचे दुसरे टोक रशियाच्या अतिपूर्वेकडील व्लाडिव्होस्टॉक ह्या शहरात आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ह्या रेल्वेमार्गाचे बांधकाम सुरू झाले व १९१६ साली सैबेरियन रेल्वेची सुरुवात झाली. मॉस्को ते व्लादिवोस्तोक हे अंतर ही रेल्वेगाडी ६ दिवस व ४ तासांत पूर्ण करते.

व्लाडिव्होस्टॉकमध्ये सायबेरियन रेल्वेचे टर्मिनस
सायबेरियन रेल्वेचा मार्ग
KBHFa
यारोस्लाव्स्की स्थानक, मॉस्को
BHF
२८४ यारोस्लावल
WBRÜCKE
२८९ व्होल्गा नदी
BHF
९५७ पर्म
KBHFe
९२८९ व्लादिवोस्तॉक

बाह्य दुवे [संपादन]