वोल्गा नदी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| वोल्गा | |
उल्यानोव्स्क शहारातून वाहणारी व्होल्गा नदी |
|
| उगम | त्वेर ओब्लास्त, रशिया २२५ मी. |
| मुख | कॅस्पियन समुद्र |
| लांबी | ३,६९२ कि.मी. |
| देश | रशिया |
| उपनद्या | कामा नदी, ओका नदी |
| सरासरी प्रवाह | आस्त्राखान: ८,०६० मी³/से |
| पाणलोट क्षेत्र | १३,८०,००० किमी² |
व्होल्गा नदीवरील सारातोव्ह पूल
व्होल्गा (रशियन: Во́лга) ही रशियामधील एक प्रमुख नदी आहे. ३,६९२ किमी लांबीची वोल्गा ही युरोपातील सर्वाधिक लांबीची तसेच सर्वाधिक जलप्रवाह व सर्वात मोठे पाणलोट क्षेत्र असलेली नदी आहे. वोल्गाला अनेकदा रशियाची राष्ट्रीय नदी असे म्हटले जाते. रशियातील २० मोठ्या शहरांपैकी ११ मोठी शहरे व्होल्गाच्या खोऱ्यात वसलेली आहेत. त्यापैकी एक आणि या नदीच्या नावावरून ओळखले जाणारे व्होल्गोग्राद शहर व्होल्गा नदीकिनाऱ्यावर वसलेले आहे.
रशियातील सेंट पीटर्सबर्ग शहराच्या आग्नेयेस ३२० किमीवर समुद्रसपाटीपासून २२५ मीटर उंचीवर उगम पावणारी ही नदी कास्पियन समुद्राला मिळते.
मोठी शहरे [संपादन]
हेही पहा [संपादन]
बाह्य दुवे [संपादन]
| विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |