बास-नोर्मंदी
Appearance
बास-नॉर्मंदी Basse-Normandie | ||
फ्रान्सचा प्रदेश | ||
| ||
बास-नॉर्मंदीचे फ्रान्स देशामधील स्थान | ||
देश | फ्रान्स | |
राजधानी | कां | |
क्षेत्रफळ | १७,५८९ चौ. किमी (६,७९१ चौ. मैल) | |
लोकसंख्या | १४,६७,४२५ | |
घनता | ८२.६ /चौ. किमी (२१४ /चौ. मैल) | |
आय.एस.ओ. ३१६६-२ | FR-P | |
संकेतस्थळ | [१] |
बास-नोर्मंदी (फ्रेंच: Basse-Normandie; नॉर्मन: Basse-Normaundie; इंग्लिश लेखनभेदः लोअर नॉर्मंडी) हा फ्रान्स देशाचा एक भूतपूर्व प्रदेश आहे. १९५६ साली ऐतिहासिक नोर्मंदी प्रांताचे दोन तुकडे करून ओत-नोर्मंदी व बास-नोर्मंदी हे दोन प्रदेश स्थापन करण्यात आले. परंतु २०१६ साली हे दोन्ही विभाग पुन्हा एकत्रित करून नॉर्मंदी ह्या नव्या प्रदेशाची निर्मिती करण्यात आली.
दुसऱ्या महायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांनी जून ६, १९४४ रोजी बास-नोर्मंदीमधून नाझी जर्मनीवर मोठा हल्ला चढवला. ह्या दरम्यान झालेल्या धुमश्चक्रीत येथील प्रदेशाचे अतोनात नुकसान झाले होते.
विभाग
[संपादन]खालील तीन विभाग बास-नोर्मंदी प्रदेशाच्या अखत्यारीत येतात.
- ऑर्न (Orne)
- काल्व्हादोस (Calvados)
- मांच (Manche)
बाह्य दुवे
[संपादन]- (फ्रेंच) प्रादेशिक समिती Archived 2005-04-06 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |