प्राण्यांचे आवाज
Appearance
चिमणी - चिव चिव (चिवचिवाट)
मांजर- मियाऊ-मियाऊ
सिंह - डरकाळी (गुर्गुरणे)
- कावळा - कावकाव
- कुत्रा - भुंकणे, केकाटणे, गुरगुर
- कोकिळ- कुहूकुहू, गाणे
- कोल्हा - कोल्हेकुई
- कोंबडा - बांग देणे, आरवणे, कुकूऽऽऽ चकू करणे
- कोंबडी - पकपक, पक पक पकाक पक
- गाढव - खिंकाळी, ओरडणे, रेंकणे
- गाय-म्हैस -रेंकणे, हंबरणे
- घोडा - खिंकाळी, फुरफुरणे
- चिमणी - चिवचिवाट, चिव-चिव
- डास - गुणगुणणे
- डुक्कर - घुरघुर, गुरगुर
- तरस - हसणे
- दयाळ - गाणे
- पारवा - घुमणे, गुटर्रर्रऽऽऽगू
- पाल - चुकचुकणे
- बदक : पकपक, क्व्यॅक-क्व्यॅक
- बुलबुल - गाणे
- बेडूक - डराव-डराव
- बैल-रेडा - डुरकणे, डिरकणे
- भुंगा - गूंऽऽऽगूं करणे, गुंजारव, गुंजन
- मांजर - म्याव-म्याव
- माणूस - आकांत करणे, आक्रोश करणे, टाहो फोडणे, मुसमुसणे, रडणे, रुदन, विलाप, स्फुंदणे,
- माशी - घोंघावणे
- मूल - आक्रंदन, आक्रोश, आरोळी देणे, ओरडणे, किंचाळी मारणे, टाहो फोडणे, बोंब मारणे, मुसमुस, हंबरडा फोडणे,
- मैना - गाणे
- रातकिडा - किरकिरणे
- वाघ - डरकाळी,गुरगुरणे
- शेळी-मेंढी - बें बें
- साप, नाग - फुस्स करणे, फिसकारणे
- सिंह - गर्जना करणे
- हत्ती - चित्कारणे
- कोकीळ - कुहूकुहू,
- घुबड -घुत्कारणे, घुमणे
- घार - किलकिलणे,
वाहनांचे आवाज
[संपादन]- आगगाडी - झुकझुक, धाड धाड
- आगगाडीचे इंजिन - कूऽऽक
- घाट चढणारा ट्रक - रें रें
- मोटार = पों पों करणे, पम् पम् करणे, पीप पीप करणे