माशी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माशी हा घरांमध्ये आढळला जाणारा उडणारा कीटक आहे. हा किटक मोठ्या प्रमाणावर रोगराई पसरवणारा आहे. हा किटकप्रकार "डिप्टेरा' गटात आहे. डाय म्हणजे दोन आणि टेरा म्हणजे पंख, या दोन शब्दांच्या एकत्रीकरणातून डिप्टेरा हा शब्द बनला आहे. अर्थातच माश्‍यांच्या शरीरावर पंखांच्या दोन जोड्या असतात. माशी आपले पंख दर सेकंदाला दोनशे वेळा हलवते. माशीचा उडण्याचा वेग ताशी सात किलोमीटर्स इतका असतो. सगळ्यात लहान आकाराच्या माशी एका इंचाच्या विसाव्या भागाइतकी छोटी असते. सगळ्यात मोठी माशी साधारण तीन इंच लांबीची असते. माशी फक्त द्रवपदार्थ खाते. नांगी नसल्यामुळं माशी दंश करू शकत नाही. पावसाळ्यातील वातावरण हे तापमान, दमटपणा, जमिनीतील ओलावा हे माशीसाठी पोषक असते. एका वेळी मादी १०० ते १५० अंडी घालते. त्यातून २४ ते ४८ तासात माश्या जन्माला येतात. माश्‍यांच्या प्रादुर्भावाने पशूंच्या आरोग्यावर तसेच उत्पादनावरही परिणाम होतो.

प्रकार[संपादन]

  • घरमाशी (मस्का) - ही माशी आकाराने मध्यम, सहा-सात मि.मी. लांब असते. तिचा रंग राखाडी असतो. पाठीवर चार काळे उभे पट्टे असतात, तर पोटाचा भाग पिवळसर असतो. माशी कुजलेले, सडलेले पदार्थ, मानवी विष्ठा इत्यादी ठिकाणी अंडी घालते.
  • तबेला माशी (स्टोमॉक्‌सीस) - ही माशी आकाराने पाच ते सहा मि.मी. असते. पाठीवर तीन काळे, उभे पट्टे, पोटावर दोन ते तीन काळे ठिपके असतात.
  • गोमाशी (हिप्पोबॉस्का) - ही माशी रंगाने लालसर किंवा पिंगट विटकरी असते. साधारणपणे 10 मि.मी. (१ सें.मि.) एवढ्या आकाराची असते.
  • घोडामाशी (टेबॅनस) - या माशीला सोंडे किंवा आंधळी माशी असेही म्हणतात. मोठ्या आकाराची, मोठे डोळे, गर्द रंग आणि काही वेळा पोटावर विविध रंगांचे चट्टे किंवा पट्टे असतात. पाणथळ जागेवर झाडाच्या फांद्यांवर, पानांच्या खालच्या पृष्ठभागावर एका वेळी शेकड्यांनी अंडी चिकटवतात. यातल्या अळ्या खाली पडून चिखलातून मोठ्या होतात. ही माशी चावते.
  • शिंग माशी(हिमॅटोबिया) - या माशीला म्हैस माशी असेही म्हणतात. ही आकाराने तीन ते चार मि.मी. असते. रंगाने राखाडी छातीवर अनेक गर्द पट्ट्या असतात. या चावऱ्या माशा आहेत.

हे ही पाहा[संपादन]


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

बाह्यदुवे[संपादन]